नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2022
- एनएचपीसीने आपल्या एकट्याच्या, निव्वळ नफ्यामध्ये 12% वाढ नोंदवली आहे
- कंपनीने 2483 कोटी रुपयांचा पीएटी म्हणजेच देय करानंतरचा सर्वाधिक अर्धवार्षिक नफा नोंदवला आहे.
- एनएचपीसीची आपल्या 24 उर्जा निर्मिती केंद्रांच्या माध्यमातून एकूण 7071 मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण करण्याची स्थापित क्षमता आहे.
एनएचपीसी लिमिटेड या भारतातील प्रमुख जलविद्युत निर्मिती कंपनीने अतिशय उत्तम कार्यपालन आणि व्यवसायाने सहा महिन्यामध्ये ‘ स्टँडअलोन’ म्हणजेच या एकट्या कंपनीने आपल्या निव्वळ नफ्यात 12% वाढ नोंदवली आहे. या सहा महिन्यांमध्ये एनएचपीसीला देय करानंतर 2483 कोटी रुपये नफा झाला आहे. कंपनीने हा सर्वाधिक अर्धवार्षिक स्वतंत्र नफा (देयकरानंतरचा) नोंदवला आहे. कंपनीने मागील सहामाहीमध्ये स्वतंत्रपणे देय करानंतर 2217 कोटी रूपयांचा नफा कमावला होता.
या सहामाहीसाठी एकत्रित देय करासह एनएचपीसीचा हिस्सा 2575 कोटी रुपये आहे. मागील सहामाहीचा विचार करता हा हिस्सा 15 टक्क्यांनी जास्त आहे. मागील सहामाहीचा संयुक्त देय करासह एनएचपीचा हिस्सा 2243 कोटी रुपये होता.
वीज निर्मितीचा विचार केला तर चालू तिमाहीमध्ये आणि सहामाहीमध्ये वीज निर्मिती अनुक्रमे 10138 दशलक्ष युनिट्स आणि 18303 दशलक्ष युनिट्स इतकी झाली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीमध्ये कंपनीच्या उर्जा केंद्रांचे एकूण वीज निर्मितीच्या प्रमाण सर्वाधिक होते. एनएचपीसी या स्वतंत्र वीज निर्मिती केंद्रांचा विचार केला, तर अनुक्रमे 99.87 आणि 99.23 टक्के इतकी वीज निर्मिती करण्यात आली. हे प्रमाण सर्वोच्च आहे.
एनएचपीसीच्या कार्यकारी मंडळाची बैठक दि. 10 नोव्हेंबर, 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 30 सप्टेंबर, 2022 ला संपलेल्या तिमाही आणि सहामाहीमधील वित्तीय परिणामांना- निकालांना मान्यता देण्यात आली.
एनएचपीसी लिमिटेड ही भारतातील प्रमुख जलविद्युत कंपनी आहे. एनएचपीसीची आपल्या 24 उर्जा केंद्रांसह एकूण स्थापित क्षमता 7071 मेगावॅट अक्षय ऊर्जा (पवन आणि सौरसह) निर्मितीची आहे. यामध्ये उपकंपनीव्दारे करण्यात येणा-या 1520 मेगावॅट विजेचाही समावेश आहे.