Home Blog Page 1365

81.35 कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य : केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय

0

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2023

केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय ) अंतर्गत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे.हा एक ऐतिहासिक निर्णय असून या योजनेने  जगातील सर्वात मोठ्या सामाजिक कल्याण योजनांमध्ये स्थान मिळवले आहे. या योजनेचे उद्दिष्ट   81.35 कोटी लोकांसाठी अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे असून  5 वर्षांसाठी खर्च अंदाजे  11.80 लाख कोटी रुपये  आहे.

लोकसंख्येच्या मूलभूत अन्न आणि पोषणविषयक  गरजा पूर्ण करून कार्यक्षम आणि लक्ष्यित कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृढ वचनबद्धता या निर्णयातून दिसून येते. अमृत काळात  या प्रमाणात अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे महत्वाकांक्षी आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी समर्पित प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

दिनांक 1.1.2024 पासून 5 वर्षांसाठी पीएमजीकेएवाय  अंतर्गत मोफत अन्नधान्य (तांदूळ, गहू आणि भरड  धान्य ) अन्न सुरक्षा मजबूत करेल आणि लोकसंख्येच्या गरीब आणि असुरक्षित घटकांच्या कोणत्याही आर्थिक अडचणींचे शमन करेल.   सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधल्या   5 लाखांहून अधिक रास्त भाव दुकानांच्या जाळ्याच्या माध्यमातून  मोफत अन्नधान्य वितरणात  ही योजना राष्ट्रव्यापी एकसमानता प्रदान करेल.

ओएनओआरसी-वन नेशन वन रेशन कार्ड(एक देश एक शिधा पत्रिका )- उपक्रमांतर्गत लाभार्थींना देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून मोफत अन्नधान्य घेण्याची  परवानगी मिळेल आणि राहणीमान सुलभ होणे शक्य होईल. डिजिटल इंडिया अंतर्गत तंत्रज्ञान आधारित सुधारणांचा भाग म्हणून स्थलांतरीतांना राज्यांतर्गत आणि आंतरराज्य सुवाह्यता  पात्रता मिळवून देण्यात येणार असल्याने हा उपक्रम स्थलांतरितांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.  देशभरात एक देश एक शिधा पत्रिका अंतर्गत मोफत अन्नधान्य, सुवाह्यतेची समान अंमलबजावणी सुनिश्चित करेल आणि निवड आधारित मंच अधिक बळकट करेल.

पीएमजीकेएवाय अंतर्गत  अन्नधान्य वितरणासाठी पुढील पाच वर्षांकरिता अन्न अनुदान सुमारे 11.80 लाख कोटी रुपये असेल.  अशा प्रकारे  केंद्र  सरकार लक्ष्यित लोकसंख्येला मोफत अन्नधान्य पुरवण्यासाठी  पीएमजीकेएवाय  अंतर्गत अन्न अनुदान म्हणून पुढील पाच वर्षांच्या कालावधीत अंदाजे 11.80 लाख कोटी रुपये खर्च करेल.

पीएमजीकेएवाय  अंतर्गत 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्याची तरतूद, राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दीर्घकालीन वचनबद्धता आणि दूरदृष्टी दर्शवते. मोफत अन्नधान्याच्या तरतुदीमुळे समाजातील बाधित वर्गाच्या कोणत्याही आर्थिक अडथळ्याचे  शाश्वत रीतीने शमन होईल  आणि लाभार्थ्यांना शून्य खर्चासह दीर्घकालीन किंमत धोरणाची हमी राहील.

लाभार्थ्यांचे कल्याण लक्षात घेऊन आणि लक्ष्यित लोकसंख्येसाठी अन्नधान्याची उपलब्धता, किफायतशीरता  आणि सुलभता या  दृष्टीने अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी तसेच  राज्यांमध्ये एकसमानता राखण्यासाठी, पीएमजीकेएवाय  अंतर्गत पाच वर्षांसाठी मोफतअन्नधान्य पुरवणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशातील अन्न आणि पोषण सुरक्षा बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समर्पित वृत्ती  आणि वचनबद्धता दर्शवणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे.

चरित्राबरोबरच चारित्र्य निर्मितीवर भर द्यावा- स्वामी बोधमायानंद

पुणे,दि.२९ नोव्हेंबर: “भारतीय प्राचीन वारसा अद्भूत निर्मितीने परिपूर्ण आहे. त्याचे जतन, दस्तऐवजीकरण आणि प्रसार करण्याची नितांत गरज आहे. प्राचीन भारतातील विज्ञान आधारित पद्धती आणि ज्ञानाच्या आधारावर आजच्या युवकांचे चारित्र्य निर्माण होईल. त्यासाठी शिक्षकांनी शाळेत चरित्र शिकवण्या बरोबरच  चारित्र्य निर्मितीवर अधिक भर  द्यावा.”असा सल्ला हैदराबाद येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ ह्यमून एक्सलन्सचे संचालक स्वामी बोधमायानंद यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावर बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच डॉ. अभिजित सोनावणे, असिम पाटील आणि डॉ. रोहिणी पटवर्धन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
स्वामी बोधमायानंद म्हणाले,” भारतीय ज्ञान प्रणाली ही प्राचीन काळापासून भारतात उच्च पातळीवर विकसित झालेली ज्ञानाची पद्धतशीर संस्था आहे. यामध्ये विविध समुदायांनी पिढ्यानपिढ्या विकसित केलेल्या परिष्कृत आणि जतन केलेल्या सर्व परंपरेचा समावेश आहे. भारतीय संस्कृतीचे वेगळेपण रामायण, महाभारत, पुराण  आणि अनेक भारतीय तत्वज्ञानाचे मूलभूत ग्रंथ हे वैदिक कालखंडांपासून  विविध क्षेत्रातील भक्ती परंपरेत आहेत.  ज्ञान,  कर्म आणि भक्ती योग अत्यंत महत्वपूर्ण आहे.”
“शैक्षणिक स्तरावर सरकारी नीति बदलणे गरजेचे आहे. तसेच शिक्षकांना त्यांच्या विषयातील सखोल ज्ञान असावे. आज गुगल मोठ्या प्रमाणात माहिती देऊ शकतो परंतू गुरू होऊ शकत नाही. भारताचे पूर्ननिर्माण करण्यासाठी अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयाने शिक्षण देण्याची गरज आहे.”
तत्पूर्व सकाळच्या सत्रात डॉक्टर्स फॉर बेगर्स या पदवी परिचीत डॉ. अभिजित सोनावणे यांनी सांगितले की,”मार्कांपेक्षा गुणवत्ता महत्वाची आहे. आपल्यातील गुण शोधून त्यावर आयुष्यभर कार्य करावे. व्यक्तीमत्व आणि कॅरेक्टर वर ते म्हणाले की जग तुमच्याकडे बघत असेल ते व्यक्तीमत्व आणि ज्या वेळेस तुमच्याकडे कोणीही बघत नसेल त्यावेळी आपण जे वागतो, बोलतो त्याला कॅरेक्टर असे म्हणू शकतो. प्रत्येकाची सुखाची कल्पना ही वेगळी असते.  ज्याच्या घरी आई-वडील असतात तोच जगातील सर्वात सुखी व्यक्ती आहे. माणसाने यशस्वी होण्यापेक्षा समाधानी व्हावे. देव होण्यापेक्षा माणूस व्हावे आणि एखाद्याची वेदना ओळखून माणुसकीचा धर्म पाळावा.”
असिम पाटील यांनी सांगितले की आध्यात्माशिवाय जीवन जगणे व्यर्थ आहे. विठ्ठलाच्या नावाने सुरू होणाऱ्या माझ्या दिवसाचा शेवट हरीपाठाने होतो. त्यामुळे माझे जीवन सुखमय झाले. आजच्या काळात तंत्रज्ञानाबरोबर मानवता जोडली तर यश आपल्या पदरी नक्कीच पडेल. त्यानंतर डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी वृद्धांच्या जीवनात येणाऱ्या  विविध समस्यांची उकल केली.
प्रा.डॉ.अर्चना चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गणेश राधाकृष्ण यांनी आभार मानले.

150हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये घोटाळा:पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

भविष्यनिधी निरीक्षकाची तक्रार

पीएफमध्ये गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास येताच मारुती नवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करून, पीएफची रक्कम स्वतःच्या फायद्या करिता वापरली असल्याचा आरोप करत मारुती नवले यांच्याविरोधात कोंढवा पोलिसांत भविष्यनिधी निरीक्षक यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे-पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्याविरोधात पुणे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेतील 150हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.दाखल तक्रारीनुसार, मारुती नवले यांची कोंढव्यात सिंहगड सिटी स्कूल नावाची संस्था आहे. येथे दीडशेहून अधिक कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 22 पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आले होते. मात्र, कपात रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता मारुती नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे पीएफ विभागाच्या भविष्यनिधी निरीक्षक यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, भविष्यनिधी कार्यालयाच्या पथकाने सिंहगड सिटी स्कूल शाळेला भेट देऊन 5 जुलै 2022 रोजी तपासणी केली होती. यावेळी शाळेतील लेखापाल यांच्याकडे भविष्य निधी संदर्भातील सर्व कागदपत्र मागवण्यात आले. ज्यात पगारशीट, बँके डिटेल्स, व्यावसायिक कर, बॅलेन्स शीट सह इतर कागदपत्रे शाळेकडून सादर करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. दरम्यान, पगारपत्रकामध्ये दाखवण्यात आलेल्या नोंदीनुसार 115 ते 116 कर्मचारी यांचे ऑक्टोबर 2019 ते जून 2022 पर्यंत मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीचे 74 लाख 68 हजार 636 रुपये कपात करण्यात आले होते. परंतु, यापैकी 3 लाख 75 हजार 774 रुपये एवढीच रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. तसेच, 70 लाख 92 हजार 862 एवढी उर्वरित रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यातच आली नाही.

छेड काढणाऱ्याची तक्रार करायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार,दोघा भावांना अटक

पुणे- छेडकाढणाऱ्या तरुणाची त्याच्या मोठ्या भावाकडे तक्रार घेऊन गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे.पीडित 15 वर्षीय तरुणी पुण्याच्या कोथरुड परिसरात राहते. ती शिकवणीला जात असताना तिच्या क्लासजवळ राहणारा एक तरुण तिची छेड काढत होता. त्यामुळे त्याची तक्रार करण्यासाठी ती त्याच्या मोठ्या भावाकडे गेली असता संबंधित तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आराेपी किशाेर परमेश्वर केदार (वय-23) व नकुल परमेश्वर केदार (21, दाेघे रा.काेथरुड,पुणे) या आराेपींना अटक केली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलगी ही दररोज क्लासला ये-जा करते. त्यावेळी क्लासच्या जवळ राहणारा नकुल केदार हा तरुण तिची वारंवार छेड काढून तिला त्रास देत हाेता. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून संबंधित मुलगी त्याचा भाऊ किशाेर केदार याच्याकडे तक्रार करण्यास गेली होती. त्यावेळी आराेपीने तिला जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला. तसेच माझ्या भावाची तक्रार करते का? तुला राहायचे की नाही, अशी धमकी दिली. मी सांगेल तेव्हा माझ्याकडे यायचे, आली नाही तर तुझे काय करायचे ते बघताे, तुम्ही कुणीच माझे काही वाकडे करु शकत नाही, असेही आरोपीने पीडितेला धमकावले. याप्रकरणी पुढील तपास काेथरुड पाेलिस करत आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांनीच 2014मध्ये सरकार घालवले,काँग्रेसच्या वाताहतीला तेच जबाबदार-राधाकृष्ण विखे पाटील 

मुंबई-मुख्यमंत्री असताना मला राज्य सहकारी बँकेबद्दल काही कडक निर्णय घ्यावे लागले. त्याची राजकीय किंमत मला भोगावी लागली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले, असे वक्तव्य काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केले होते. यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे.पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर आज विखे-पाटील म्हणाले, २०१४मध्ये सरकार घालवण्याचे काम पृथ्वीराज चव्हाणांनीच केले. काँग्रेसच्या वाताहातीला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत. याशिवाय पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावर खासदार सुनील तटकरेंनीही टीका केली आहे. सुनील तटकरे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणी आहेत, असा माझा समज होता. पण, हल्ली त्यांना विनोद का सुचतो आहे, ते काही कळत नाही. त्यांची असे बोलण्यामागची भूमिका काय हे माहिती नाही.

याशिवाय २०१४नंतर पुन्हा काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार आले असते तर मराठा आरक्षण टीकले असते, असाही दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्वातंत्र्याच्या ५० वर्षानंतर प्रथमच आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हाती घेतला होता. मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. मात्र, नंतर न्यायालयात त्याला आव्हान देण्यात आले व आमचे सरकार पडले. नंतर कोर्टाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला. आम्ही कायदेशीर अभ्यास करुनच हा निर्णय घेतला होता. त्यामुळे आमचे सरकार टीकले असते तर कोर्टात आम्ही आणखी चांगल्या रितीने बाजू मांडली असती व आरक्षण टीकले असते.पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यावर विखे पाटील म्हणाले, सत्ता गेल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत चव्हाणांना शहाणपण सूचत आहे. पण, यात काहीही तथ्य नाही. तर, सुनील तटकरे म्हणाले, सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकले नाही, असे म्हणण्याला काहीही अर्थ नाही. हल्ली पृथ्वीराज चव्हाण विनोद का करत आहे, हे समजत नाही.

अतिप्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव शुक्रवारपासून

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन
पुणे : गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. अशा कसबा पेठेतील पुण्याचे अतिप्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव दिनांक १ ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त उत्सव व श्री दत्तयाग महायज्ञ होणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि.१) सकाळपासून स्थापित देवतांचे आवाहन, पूजन, श्रीदत्त मालापाठ व आरती होणार आहे. दिनांक २ ते ४ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ यावेळेत स्थापित देवता पूजन व श्री दत्त मालापाठ आणि दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ यावेळेत श्री दत्त मालापाठ, आरती व ४ डिसेंबर रोजी पूर्णाहुती, आरती होईल. 
तर, मंगळवारी (दि.५) सकाळी ७.३० वाजता लघुरुद्र, महापूजा व आरती, दुपारी १२ वाजता अष्टोत्तरी शत नामावली, आरती आणि रात्री १२ वाजता मुख्य जन्मसोहळा होईल. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत आहे. भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. भाविकांनी उत्सवात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले.

स्मार्ट सिटी पुण्यातील महत्वपूर्ण प्रकल्पाची विक्री ९०० कोटी रु. हून अधिकपर्यंत पोहोचणार

युनिव्हर्स या प्लॅनेट स्मार्ट सिटीच्या भारतातील पहिल्या प्रकल्पाची जवळजवळ पूर्णपणे विक्री

पुणे: प्रॉपटेक आणि ईएसजी-कंप्लायंट रिअल इस्टेट उपायसुविधा एकत्रित करणार्‍या किफायतशीर गृहनिर्माण बाजारपेठेतील आघाडीची जागतिक कंपनी प्लॅनेट स्मार्ट सिटीने कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (KPDL) सह भागीदारीत पुण्यातील हिंजवडी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमधील आपल्या प्रमुख ‘युनिव्हर्स’ प्रकल्पाची जवळपास एकूण सर्व  विक्री झाल्याचे जाहीर केले आहे. प्लॅनेट स्मार्ट सिटीचा हा देशातील पहिलाच विकास प्रकल्प असताना सप्टेंबर २०२३ च्या अखेरीस ८८% पेक्षा जास्त निवासी युनिट्स आणि ९१% पेक्षा जास्त व्यावसायिक युनिट्सची विक्री होऊन हा मैलाचा दगड असाधारण यश दर्शवितो.

‘युनिव्हर्स’ हा प्लॅनेट स्मार्ट सिटीने डिसेंबर २०२० मध्ये भारतात सादर केलेला पहिला प्रकल्प असून एकूण निवासी युनिट्समध्ये १.३ दशलक्ष हून अधिक चौरस फूट आणि व्यावसायिक युनिट्समध्ये ८५,००० चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र आहे. महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे निर्माण झालेली आव्हाने असूनही ‘युनिव्हर्स’ आधीच ९०० कोटी रुपयांहून अधिकची विक्री करण्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्रातील निवासी गृहनिर्माण बाजारपेठेची गतिशीलता आणि गृहखरेदीदारांचा प्रचंड प्रतिसाद यातून ही अतुलनीय कामगिरी झाली आहे. प्लॅनेट स्मार्ट सिटी द्वारे संपूर्ण प्रकल्पात लागू केलेल्या विस्तृत सुविधा आणि नाविन्यपूर्ण स्मार्ट उपायांचे मोल या गृहखरेदीदारांना आहे.

प्रकल्पाचे यश भारताच्या सीमेपलीकडे विस्तारले असून जीसीसी प्रदेशातील आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार त्यांच्या अद्वितीय विक्री मुद्द्यांना आणि मालमत्तेचे मूल्य वाढवण्याच्या संभाव्यतेला प्रतिसाद देत आहेत.

प्लॅनेट स्मार्ट सिटीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मार्को पिलिया म्हणाले, “भारतातील आमच्या पहिल्या प्रकल्पाची यशस्वी विक्री ही जागतिक स्तरावर प्लॅनेट स्मार्ट सिटीसाठी एक अतुलनीय कामगिरी आहे. ही कामगिरी आमच्या व्यवसाय मॉडेल आणि मूल्य प्रस्तावाची उत्तम पावती आहे. भारतातील सर्वोत्तम डेव्हलपर्ससह सहकार्य केल्याने आम्हाला निवासी बाजारपेठेत उच्च नावीन्यपूर्णता, भविष्याची तरतूद आणि आमच्या ग्राहकांसाठी योग्य बजेट रेंज प्रदान करण्याची अनुमती मिळते.”

कोलते-पाटील डेव्हलपर्स लि.चे ग्रुप सीईओ श्री. राहुल तळेले म्हणाले, “युनिव्हर्स प्रकल्पाला ग्राहकांनी दिलेली मजबूत स्वीकृती ही भारतीय बाजारपेठेत नाविन्यपूर्ण रिअल इस्टेट सोल्यूशन्स आणण्याच्या कोलते-पाटील यांच्या क्षमतेला मिळालेली आणखी एक मान्यता आहे. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ब्रँडसह सहयोग करत शाश्वतता आणि स्मार्ट उपायांवर  लक्ष केंद्रित करून ग्राहकांसाठी सखोल मूल्य निर्माण करण्यास आम्हाला सक्षम करते. युनिव्हर्स प्रकल्प हा शहरी जीवनशैलीचा नमुना म्हणून तयार केला गेला असून तो आताच्या काळातील दोन प्रमुख ट्रेंड: प्रॉपटेक आणि ईएसजीचा अवलंब करत आहे. पुढे जाऊन, आमच्या पोर्टफोलिओमध्ये विस्तीर्ण कॅनव्हासवर या प्रकल्पाच्या यशाची प्रतिकृती बनेल याची आम्हाला खात्री आहे.”

प्रकल्पाच्या गतीमान विक्रीला ANAROCK मालमत्ता सल्लागार यांच्याबरोबरील महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदारीमुळे समर्थन मिळाले असून त्यांनी या प्रकल्पाच्या व्यावसायिक यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

ANAROCK ग्रुपच्या निवासी विक्रीच्या अध्यक्षा अदिती वाटवे म्हणाल्या, “प्लॅनेट स्मार्ट सिटीसोबत त्यांच्या भारतातील पहिल्या प्रकल्पावर काम करणे हे खूप आनंददायी आहे. लाइफ रिपब्लिकसाठी, आम्ही आमच्या मालकीच्या SaaS प्रणीत प्रॉपटेक रिअल इस्टेट मार्केटिंग सोल्यूशन्सचा संपूर्ण विस्तार खुला केला आहे. याद्वारे आम्ही उत्तम निवासी जीवनशैली उपायसुविधा शोधत असलेल्या खरेदीदारांपर्यंत अचूकपणे पोहोचू शकतो.”

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार

0

मुंबई दि. २९ :- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे.

विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी  नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विविध विभागाचे मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशन गुरुवार दि ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ या कालावधीत घेणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे एकूण दिवस १४ असून, यामध्ये प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, तर सुट्या (शनिवार व रविवार मिळून) ४ दिवस आहेत.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश

मुंबई दि. २९ :- गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या.

आज मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने राज्यातील पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबत सादरीकरण केले. पंचनामे प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे औपचारिक निर्देश महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन) विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना कालच दिल्याची मंत्रिमंडळाने नोंद घेतली. राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचे एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड हे तालुके बाधित असून यातील ५३ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे., पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला तालुक्यातील ३२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस व फळपिके, धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील ४६ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, कापूस, हरभरा, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील २ हजार २३९ हेक्टर क्षेत्रातील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे, जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड, भडगाव तालुक्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रातील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, पारनेर, राहाता येथील १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, मक्याचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १५ हेक्टर क्षेत्रातील भात पिकाचे नुकसान झाले आहे., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई व मका पिकांचे नुकसान झाले आहे,

जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, जाफराबाद तालुक्यातील ५ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, केळी, कांदा, खरीप ज्वारी, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी, बीड तालुक्यातील २१५ हेक्टर क्षेत्रातील कांदा, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील १०० हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम मानवत सोनपेठ, सेलू तालुक्यातील १ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहे, बुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणा, नांदुरा, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव, शेगाव, मोताळा, नांदुरा तालुक्यातील ३३ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाचे नुकसान झाले आहे.

मुंबई पोलिसांसह त्यांच्या कुटुंबासाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग

0

मुंबई,दि.२९: मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता ‘प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजने’च्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे येत्या १ डिसेंबर रोजी ताडदेव येथे सकाळी १०.३० आणि वरळी येथे सकाळी ११.३० वाजता कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी माध्यमातून बृहन्मुंबई मधील ताडदेव, वरळी, नायगाव, कलिना आणि मरोळ या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाईल. आयटी, गारमेंट, ब्युटी ॲण्ड वेलनेस, ऑटोमोटिव्ह ॲण्ड फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील एकूण १० प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. यामध्ये पोलिस आणि पोलिसांच्या कुटुंबातील सदस्य याचा लाभ घेऊ शकतील. किमान ३०० तास ते कमाल ५०० तासांचे कौशल्य प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील. वय वर्षे १८ ते ४५ वयोगटातील महिला, पुरुष आपल्या आधार ओळखपत्राच्या आधारे प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतील. या प्रशिक्षणासाठी एन.आय.सी च्या माध्यमातून बायोमेट्रिक पद्धतीने प्रशिक्षणार्थींची हजेरी घेण्यात येणार आहे. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारास सरकारतर्फे (NSQF) एनएसक्यूएफ स्टॅण्डर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थीला रोजगार संधी, शिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध असतील. एखाद्या प्रशिक्षणार्थीला स्वयंरोजगार करावयाचा असल्यास त्याचे मार्गदर्शन करण्यात येईल, सरकारी योजना आणि त्याचे लाभ कसे घ्यावयाचे याचे देखील मार्गदर्शन प्रशिक्षणादरम्यान करण्यात येईल.

१ डिसेंबर रोजी ताडदेव पोलीस वसाहत मैदान, वसंतराव नाईक मार्ग, ताडदेव मुंबई येथे सकाळी १०.३० वाजता आणि मुंबई पोलीस कौन्सिलिंग ॲण्ड प्लेसमेंट सेंटर एल विभाग ३, वरळी येथे सकाळी ११.३० वाजता या कार्यक्रमाचे उदघाटन होईल. या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, आयुक्त डॉ.रामास्वामी एन., सशस्त्र पोलीस दलाच्या अपर पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह, पोलिस सह आयुक्त एस.जयकुमार, मुख्यालयाच्या पोलीस उपआयुक्त डॉ. महेश्वर रेड्डी या उपस्थित राहतील.

विद्या व्हॅली स्कूल, सूसने पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपमध्ये जिंकला ‘क्रीडा क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाच्या शाळेचा’ प्रतिष्ठित सन्मान

      क्रीडा क्षेत्रातील आघाडीच्या शाळेमध्ये सिटी प्राइड स्कूल, निगडी आणि लॉयला हाय स्कूल, पाषाण या शाळा रनर अप

·       विद्या व्हॅली स्कूल, सूसच्या अवंतिका रंजीत खेरने जिंकली ‘गोल्डन गर्ल’ची ट्रॉफी, तर विद्या व्हॅली सूस स्कूलचा मल्हार सागर देशमुख ठरला गोल्डन बॉय

पुणे– पुण्यामध्ये नुकतीच एसएफए चॅम्पियनशीपची सांगता झाली. पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपमधील ‘क्रीडा क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाच्या शाळेचा’ प्रतिष्ठित सन्मान विद्या व्हॅली स्कूल, सूसने जिंकला. या शाळेने एकूण ३० सुवर्ण, १३ रौप्य आणि १५ ब्राँझ पदके व २३८ गुण जिंकले. वेगवेगळ्या खेळांतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपमध्ये विद्या व्हॅली स्कूल, सूसच्या अवंतिका रंजीत खेरने दोन सुवर्ण पदकांसह गोल्डन गर्ल हा पुरस्कार जिंकला, तर याच शाळेच्या मल्हार सागर देशमुखनेही २ सुवर्ण पदके जिंकत गोल्डन बॉय हा पुरस्कार मिळवला.

संयुक्त सचिव, महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन, सचिव पीसीएमसी आर्चरी असोसिएशनच्या सोनल बुंदेले यांनी सांगता समारंभात खेळाडूंचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, एसएफए चॅम्पियनशीपपुण्यातीलखेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ बनले असून या चॅम्पियनशीपमध्ये १२,००० खेळाडू सहभागी झाले होते. गुणवत्ता हेरून खेळाची संस्कृती रूजवण्याची एसएफएची बांधिलकी कौतुकास्पद आहे. पदके आणि विजयाच्या पलीकडे जात एसएफए खेळाच्या माध्यमातून विजेत्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. एसएफए सकारात्मक स्थित्यंतर घडवून पुण्यातील क्रीडा विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बांधली आहे.

पुण्यात एसएफए चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये ६०० शाळांतील १२०० मुले सहभागी झाली होती. या चॅम्पियनशीपमध्ये प्रत्येक खेळातील पुण्यातील आघाडीच्या शाळेचाही शोध घेतला गेला.

या समारंभात आदिती मुटाटकर, कॉमनवेल्थ गेम्स पदकविजेत्या, ५ वेळा राष्ट्रीय विजेत्या, प्रोग्रॅम प्रमुख – अथलीट अँड वुमन इनिशिएटिव्ह, सिंपली स्पोर्ट फाउंडेशन म्हणाल्या, ‘तळागाळातील क्रीडा स्पर्धांची पुरस्कर्ती या नात्याने मी एसएफए चॅम्पियनशीपचे तरुण खेळांडूचे खेळ कौशल्य सुधारण्यापलीकडे जाऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठीच्या प्रयत्नांचे कौतुक करते. एसएफएने तळागाळात विकास घडवण्यासाठी हाती घेतलेली मोहीम आणि क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासाठी दिले जात असलेले योगदान खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. मला खात्री आहे, की इतर शहरांतील चॅम्पियनशीप्स आपल्या देशाला क्रीडा क्षेत्रातील दमदार गुणवत्ता मिळवून देतील.’

या चॅम्पियनशीपमध्ये २७० खेळप्रकारांत ४३०० पेक्षा जास्त सामने खेळले गेले व त्यातून तरुण खेळाडूंची गुणवत्ता आणि खिलाडी वृत्ती पाहायला मिळाली. पुण्यातील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या एकूण खेळाडूंमध्ये मुलींचे प्रमाण ३४ टक्के, तर मुलांचे प्रमाण ६६ टक्के होते. अथलेटिक्स आणि बास्केटबॉलमध्ये मुलींचे प्रमाण जास्त होते, तर मुलांनी फुटबॉल, बास्केटबॉल, बुद्धीबळ, पोहणे आणि अथलेटिक्सला पसंती दिली.

प्रत्येक खेळातील विजेत्यांची अंतिम यादी आणि प्रत्येक शाळेच्या कामगिरीचे तपशील www.sfaplay.com.

वर उपलब्ध आहेत.

एसएफए चॅम्पियनशीप, पुणे २०२३- २०२४ मधे क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शाळा        

क्रमांकशाळासुवर्णरौप्यब्राँझगुण
1विद्या व्हॅली शाळा, सूस301315 238
2 सिटी प्राइड शाळा, निगडी16179 158
3लॉयला हाय स्कूल, पाषाण13611 146
4द बिशप्स को- एड स्कूल, उंड्री10910 145
5द ऑर्किड्स स्कूल, बाणेर887 117

एसएफए चॅम्पियनशीपमधील सर्वात कुशल प्रशिक्षक – अशोक गुंजाळ

सर्वाधिक सहभाग एड्युकॉन इंटरनॅशनल स्कूल, बाणेर – २९५ खेळाडू

एसएफए चॅम्पियनशीप २०२३- २०२४ मधील प्रत्येक क्रीडाप्रकारातील आघाडीच्या शाळा

क्रमांकखेळशाळेचे नावगुण
1तिरंदाजीएल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड18
2अथलेटिक्ससिटी प्राइड स्कूल निगडी88
3बॅडमिंटनएड्युकॉन इंटरनॅशनल स्कूल, बाणेर8
4बुद्धीबळ18
5जिमनॅस्टिकमिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर22
6खो खो40
7स्केटिंगविबग्योर राइज स्कूल, पिंपळे सौदागर29
8स्पीडक्युबिंगलॉयला हाय स्कूल पाषाण20
9पोहणेइंडस इंटरनॅशनल स्कूल पुणे37
10कबड्डीआर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे आणिआर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी40
11कराटेएसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, रहाटणी53
12टेबल टेनिसडीएव्ही पब्लिक स्कूल, पुणेऔंध13
13तायक्वांदोविद्या व्हॅली स्कूल, सूस111
14टेनिसद ऑर्किड्स स्कूल, बाणेर8
15थ्रोबॉलसिंहगड सिटी स्कूल, कोंढवा बुद्रुक65
16व्हॉलीबॉलनालंदाज इंग्लिश मीडियम स्कूल, धायरी50

जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे अन्नकोट व दीपोत्सव

0

 न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे ५६ प्रकारच्या मिष्टानांचा अन्नकोट

पुणे : सिंहगड रस्त्यावरील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे अन्नकोट व दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी स्वस्तिक, ओंकार यासारख्या दिव्यांनी साकारलेल्या शुभचिन्हांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले़ दोन हजार पणत्यांच्या माध्यमातून परिसर उजळून निघाला़ दीपोत्सवासह अन्नकोट देखील संस्थेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. 
विद्यार्थ्यांना आपल्या सण आणि उत्सवांची माहिती मिळावी, यासाठी याचे आयोजन करण्यात आले होते़ नमकीन पदार्थ, फळे, मिठाई यांसारख्या ५६ प्रकारच्या मिष्टांनांचा अन्नकोट मांडण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 
सुरेखा जाधवर म्हणाल्या, अन्नकोट आणि दीपोत्सवाच्या माध्यमातून सणांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरीता दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आपल्या संस्कृतीतील शुभ चिन्हे, रंगावलीच्या माध्यमातून हा उत्सव अधिक मंगलमय होतो. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी या कार्यक्रमात मोठया संख्येने सहभाग घेतला होता.

सुमेधा चिथडे, डॉ.प्रमोद चौधरी यांना प्रार्थना समाजाचे पुरस्कार जाहीर

पुणे प्रार्थना समाजाचा वार्षिकोत्सव : संस्थेचे १५३ व्या वर्षात पदार्पणकॉकलिया पुणे संस्थेला डेव्हिडा रॉबर्ट्स पुरस्कार

पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस ४ डिसेंबर रोजी  १५३ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सोमवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. प्राज इंडस्ट्रीजचे डाॅ.प्रमोद चौधरी यांना डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार,सुमेधा चिथडे यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, कॉकलिया पुणे संस्थेला डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे चिटणीस डॉ. दिलीप जोग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पुणे प्रार्थना समाजाचे खजिनदार प्रशांत पाडवे उपस्थित होते. दिनांक ४ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.  
डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार हा पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणाºया संस्थेस देण्यात येतो. समाजातील वेगवेगळ््या घटकांमधील सामंजस्यासाठी काम करणाºया व्यक्तीला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार देण्यात येतो. तर डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्कार सामाजिक कार्य तसेच विशेष बालकांसाठी काम करणाºया संस्थेला किंवा व्यक्तीला देण्यात येतो. 
शुक्रवार दिनांक १ डिसेंबर सायंकाळी ७ वाजता रोजी उपक्रमोपासना होणार आहे. शनिवार दिनांक २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय अर्थ विज्ञान वर्धिनी चे मानद संचालक डाॅ. अभय टिळक यांचेरहस्य भागवत धर्माचे आणि प्रार्थना समाजाचे या विषयावर व्याख्यान होणार असून सायंकाळी ७ वाजता समर्चना स्कूल आॅफ डान्स तर्फे नृत्य सादरीकरण होणार आहे. रविवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘मला उमजलेला प्रार्थना समाज’ हा परिसंवाद होणार आहे. यामध्ये समीर चौधरी, धनराज निंबाळकर सहभागी होणार आहेत. याच विषयावर मराठी विश्वकोश मंडळ वाईचे अध्यक्ष प्रा. राजा दिक्षीत यांचे व्याख्यान होणार आहे. याच दिवशी बुधवार पेठेतील प्रार्थना समाजाच्या वास्तूत दिपोत्सव देखील करण्यात येणार आहे.

पुणे पेशवा लघुपट महोत्सवात ‘ भट्टी’ ने पटकाविला प्रथम क्रमांक

भारतभरातून ८० लघुपटांचा सहभाग 
पुणे :  पुणे पेशवा लघुपट महोत्सवात  भट्टी’ लघुपटाने प्रथम क्रमांक पटकाविला. या लघुपट महोत्सवात देशभरातील ८० लघुपट सहभागी झाले होते. त्यामधून ४७  शॉर्ट फिल्म स्क्रिनींगसाठी निवडण्यात आल्या. महोत्सवाचे आयोजन घोले रस्त्यावरील नेहरु सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते.

अनुप सुजाता ढेकणे हे महोत्सवाचे दिग्दर्शक होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे डॉ. प्रवीण भोळे, अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर,माजी नगरसेविका गायत्री खडके, दिग्दर्शक प्रीतम पाटील, राजेंद्र आलमखाने उदघाटन प्रसंगी उपस्थित होते. सहदिग्दर्शक म्हणून राम दत्ताकला, नियंत्रक म्हणून श्रीनिवास गायकवाड, तर सभासद म्हणून मुबारक तांबोळी, प्रदीप गरड, रिहान शेख, समर्थ सोनावणे, राजेंद्र कुलकर्णी, राजेंद्र पालवे यांनी काम पाहिले. महोत्सवाचे यंदा पहिले वर्ष होते.

पारितोषिक वितरणासाठी मेघराज भोसले, गणेश इनामदार, संग्राम भोसले उपस्थित होते. वीरेंद्र वळसंगकर आणि मितेश ताके यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. भट्टी लघुपटाने महोत्सवात प्रथम तर रेखा, लालीपॉप यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविले. आधाशी लघुपटाने पुणे पेशवा चॉईस अवॉर्ड हा पुरस्कार पटकाविला.

चिथिका लघुपटाला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार, रेखा लघुपटाला सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार, लालीपाॅप चित्रपटाला सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफर  कॉलम लघुपटाला तर सर्वोत्तम लेखक पुरस्कार भट्टी, सर्वोत्तम बालकलाकार पुरस्कार झीलमील आणि पाखरं लघुपटाने पटकाविला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर आगमन

पुणे, दि.२९: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यावेळी उपस्थित होते.