पुणे प्रार्थना समाजाचा वार्षिकोत्सव : संस्थेचे १५३ व्या वर्षात पदार्पणकॉकलिया पुणे संस्थेला डेव्हिडा रॉबर्ट्स पुरस्कार
पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस ४ डिसेंबर रोजी १५३ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सोमवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. प्राज इंडस्ट्रीजचे डाॅ.प्रमोद चौधरी यांना डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार,सुमेधा चिथडे यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, कॉकलिया पुणे संस्थेला डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे चिटणीस डॉ. दिलीप जोग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुणे प्रार्थना समाजाचे खजिनदार प्रशांत पाडवे उपस्थित होते. दिनांक ४ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार हा पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणाºया संस्थेस देण्यात येतो. समाजातील वेगवेगळ््या घटकांमधील सामंजस्यासाठी काम करणाºया व्यक्तीला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार देण्यात येतो. तर डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्कार सामाजिक कार्य तसेच विशेष बालकांसाठी काम करणाºया संस्थेला किंवा व्यक्तीला देण्यात येतो.
शुक्रवार दिनांक १ डिसेंबर सायंकाळी ७ वाजता रोजी उपक्रमोपासना होणार आहे. शनिवार दिनांक २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय अर्थ विज्ञान वर्धिनी चे मानद संचालक डाॅ. अभय टिळक यांचेरहस्य भागवत धर्माचे आणि प्रार्थना समाजाचे या विषयावर व्याख्यान होणार असून सायंकाळी ७ वाजता समर्चना स्कूल आॅफ डान्स तर्फे नृत्य सादरीकरण होणार आहे. रविवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘मला उमजलेला प्रार्थना समाज’ हा परिसंवाद होणार आहे. यामध्ये समीर चौधरी, धनराज निंबाळकर सहभागी होणार आहेत. याच विषयावर मराठी विश्वकोश मंडळ वाईचे अध्यक्ष प्रा. राजा दिक्षीत यांचे व्याख्यान होणार आहे. याच दिवशी बुधवार पेठेतील प्रार्थना समाजाच्या वास्तूत दिपोत्सव देखील करण्यात येणार आहे.