शहरातील पार्किंग क्षमता वाढविणार:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

Date:

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक आणि पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेने विविध ठिकाणांवरील पार्किंग सुविधांचा विस्तार करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. त्याअंतर्गत संभाजी महाराज मल्टी लेव्हल पार्किंगची पुनर्बांधणी करून अधिक क्षमतेचे बहुमजली पार्किंग उभारण्याचा विचार सुरू असून, शहरातील इतर प्रमुख भागांमध्येही ‘बांधा वापरा आणि हस्तातंरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर नवीन पार्किंग सुविधा उभारण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

सध्या बंद असलेले संभाजी महाराज मल्टी लेव्हल पार्किंग पाडून त्या जागेवर अधिक वाहनक्षमतेचे आधुनिक बहुमजली पार्किंग उभारण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येचा आणि बदलत्या आकारमानाचा विचार करून नव्या पार्किंगची रचना करण्यात येणार आहे. विशेषतः मोठ्या वाहनांच्या उंचीचा विचार करून बांधकामाचे नियोजन केले जाणार असल्याची त्यांनी सांगितले.

याशिवाय मंडई, नारायण पेठ आणि संभाजी उद्यान परिसरातही पार्किंग सुविधा वाढविण्याचा विचार सुरू आहे. या प्रकल्पांसाठी बीओटी तत्त्वाचा अवलंब करण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे महापालिकेला थेट आर्थिक खर्च करावा लागणार नाही. खासगी सहभागातून पार्किंग सुविधा उभारून त्याचे संचालन ठरावीक कालावधीसाठी संबंधित संस्थेकडे देण्याचा पर्याय प्रशासन विचाराधीन आहे.

शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून वाहनचालकांना पार्किंगसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर पार्किंग क्षमतेत वाढ करण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष भिमाले यांनी सांगितले.

या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. अहवालातील शिफारशींनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असून त्यानंतर संबंधित प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले. शहरातील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर पार्किंग व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने महापालिकेची ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कॉकरोच जनता पार्टी’चे पुण्यात आंदोलन:अभिजीत दिपकेंच्या सरकारकडे 5 महत्त्वाच्या मागण्या

पुणे- कॉकरोच जनता पार्टी’ आता पुण्यात आंदोलन केले . पक्षाचे...

‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’अभिवाचन, नृत्य, नाट्य, संगीतातून उलगडले कुसुमाग्रज

रसिक कलारंजन आयोजित ‘गगनीचा अढळ तारा’ कार्यक्रमास रसिकांची दाद पुणे : ‘गर्जा जयजयकार...

वृक्षलागवडीसाठी क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी दहा लाख ; पावसाळ्यात व्यापक मोहीम

पुणे : शहरात ५० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी...

शिक्षण समितीच्या मार्फत आकांक्षा फाउंडेशनचा प्रस्ताव सादर करण्याच्या भिमालेंच्या सूचना

पुणे : पुणे महापालिकेच्या पाच इंग्रजी माध्यम शाळा पुढील...