युनिव्हर्स या प्लॅनेट स्मार्ट सिटीच्या भारतातील पहिल्या प्रकल्पाची जवळजवळ पूर्णपणे विक्री
पुणे, : प्रॉपटेक आणि ईएसजी-कंप्लायंट रिअल इस्टेट उपायसुविधा एकत्रित करणार्या किफायतशीर गृहनिर्माण बाजारपेठेतील आघाडीची जागतिक कंपनी प्लॅनेट स्मार्ट सिटीने कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (KPDL) सह भागीदारीत पुण्यातील हिंजवडी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमधील आपल्या प्रमुख ‘युनिव्हर्स’ प्रकल्पाची जवळपास एकूण सर्व विक्री झाल्याचे जाहीर केले आहे. प्लॅनेट स्मार्ट सिटीचा हा देशातील पहिलाच विकास प्रकल्प असताना सप्टेंबर २०२३ च्या अखेरीस ८८% पेक्षा जास्त निवासी युनिट्स आणि ९१% पेक्षा जास्त व्यावसायिक युनिट्सची विक्री होऊन हा मैलाचा दगड असाधारण यश दर्शवितो.
‘युनिव्हर्स’ हा प्लॅनेट स्मार्ट सिटीने डिसेंबर २०२० मध्ये भारतात सादर केलेला पहिला प्रकल्प असून एकूण निवासी युनिट्समध्ये १.३ दशलक्ष हून अधिक चौरस फूट आणि व्यावसायिक युनिट्समध्ये ८५,००० चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र आहे. महामारीच्या दुसर्या लाटेमुळे निर्माण झालेली आव्हाने असूनही ‘युनिव्हर्स’ आधीच ९०० कोटी रुपयांहून अधिकची विक्री करण्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्रातील निवासी गृहनिर्माण बाजारपेठेची गतिशीलता आणि गृहखरेदीदारांचा प्रचंड प्रतिसाद यातून ही अतुलनीय कामगिरी झाली आहे. प्लॅनेट स्मार्ट सिटी द्वारे संपूर्ण प्रकल्पात लागू केलेल्या विस्तृत सुविधा आणि नाविन्यपूर्ण स्मार्ट उपायांचे मोल या गृहखरेदीदारांना आहे.
प्रकल्पाचे यश भारताच्या सीमेपलीकडे विस्तारले असून जीसीसी प्रदेशातील आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार त्यांच्या अद्वितीय विक्री मुद्द्यांना आणि मालमत्तेचे मूल्य वाढवण्याच्या संभाव्यतेला प्रतिसाद देत आहेत.
प्लॅनेट स्मार्ट सिटीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मार्को पिलिया म्हणाले, “भारतातील आमच्या पहिल्या प्रकल्पाची यशस्वी विक्री ही जागतिक स्तरावर प्लॅनेट स्मार्ट सिटीसाठी एक अतुलनीय कामगिरी आहे. ही कामगिरी आमच्या व्यवसाय मॉडेल आणि मूल्य प्रस्तावाची उत्तम पावती आहे. भारतातील सर्वोत्तम डेव्हलपर्ससह सहकार्य केल्याने आम्हाला निवासी बाजारपेठेत उच्च नावीन्यपूर्णता, भविष्याची तरतूद आणि आमच्या ग्राहकांसाठी योग्य बजेट रेंज प्रदान करण्याची अनुमती मिळते.”
कोलते-पाटील डेव्हलपर्स लि.चे ग्रुप सीईओ श्री. राहुल तळेले म्हणाले, “युनिव्हर्स प्रकल्पाला ग्राहकांनी दिलेली मजबूत स्वीकृती ही भारतीय बाजारपेठेत नाविन्यपूर्ण रिअल इस्टेट सोल्यूशन्स आणण्याच्या कोलते-पाटील यांच्या क्षमतेला मिळालेली आणखी एक मान्यता आहे. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ब्रँडसह सहयोग करत शाश्वतता आणि स्मार्ट उपायांवर लक्ष केंद्रित करून ग्राहकांसाठी सखोल मूल्य निर्माण करण्यास आम्हाला सक्षम करते. युनिव्हर्स प्रकल्प हा शहरी जीवनशैलीचा नमुना म्हणून तयार केला गेला असून तो आताच्या काळातील दोन प्रमुख ट्रेंड: प्रॉपटेक आणि ईएसजीचा अवलंब करत आहे. पुढे जाऊन, आमच्या पोर्टफोलिओमध्ये विस्तीर्ण कॅनव्हासवर या प्रकल्पाच्या यशाची प्रतिकृती बनेल याची आम्हाला खात्री आहे.”
प्रकल्पाच्या गतीमान विक्रीला ANAROCK मालमत्ता सल्लागार यांच्याबरोबरील महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदारीमुळे समर्थन मिळाले असून त्यांनी या प्रकल्पाच्या व्यावसायिक यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
ANAROCK ग्रुपच्या निवासी विक्रीच्या अध्यक्षा अदिती वाटवे म्हणाल्या, “प्लॅनेट स्मार्ट सिटीसोबत त्यांच्या भारतातील पहिल्या प्रकल्पावर काम करणे हे खूप आनंददायी आहे. लाइफ रिपब्लिकसाठी, आम्ही आमच्या मालकीच्या SaaS प्रणीत प्रॉपटेक रिअल इस्टेट मार्केटिंग सोल्यूशन्सचा संपूर्ण विस्तार खुला केला आहे. याद्वारे आम्ही उत्तम निवासी जीवनशैली उपायसुविधा शोधत असलेल्या खरेदीदारांपर्यंत अचूकपणे पोहोचू शकतो.”