श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन
पुणे : गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. अशा कसबा पेठेतील पुण्याचे अतिप्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव दिनांक १ ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त उत्सव व श्री दत्तयाग महायज्ञ होणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि.१) सकाळपासून स्थापित देवतांचे आवाहन, पूजन, श्रीदत्त मालापाठ व आरती होणार आहे. दिनांक २ ते ४ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ यावेळेत स्थापित देवता पूजन व श्री दत्त मालापाठ आणि दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ यावेळेत श्री दत्त मालापाठ, आरती व ४ डिसेंबर रोजी पूर्णाहुती, आरती होईल.
तर, मंगळवारी (दि.५) सकाळी ७.३० वाजता लघुरुद्र, महापूजा व आरती, दुपारी १२ वाजता अष्टोत्तरी शत नामावली, आरती आणि रात्री १२ वाजता मुख्य जन्मसोहळा होईल. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत आहे. भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. भाविकांनी उत्सवात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले.
अतिप्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव शुक्रवारपासून
Date: