पुणे, दि.२९: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यावेळी उपस्थित होते.
महंमदवाडीच्या गणेश बबन लोंढे आणि टोळीवर मोक्काची कारवाई,अल्पवयीन मुलासह सर्व नव्या तरुणाईची टोळी
मकोका अंतर्गत केलेली ही ९१ वी कारवाई
पुणे-महंमदवाडी येथील गणेश बबन लोंढे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०६ साथीदार यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे. स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरीता मागील वर्षामध्ये सदर टोळीने संघटितपणे व वैयक्तीकपणे, खुनाचा प्रयत्न, चोरी करणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राव्दारे जखमी करणे, बेकायदेशीर जमावजमवणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करुन व हत्यारांचा धाक दाखवुन नागरिकांमध्ये दहशत पसरवणे, दरोडयाची तयारी करणे यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत. या टोळीत १) गणेश बबन लोंढे वय २३ वर्षे रा. साठे चौक, तरवडे वस्ती, महंमदवाडी, पुणे (टोळी प्रमुख) याने त्याचे इतर साथिदार २) विशाल माधव गोरे, वय २० वर्षे, रा. वेदात हाईट्स सोसायटी, तरवडे वस्ती, पुणे ३) मयुर माणिक पुरकास्त, वय १८ वर्षे, रा. कृष्णानगर, बुध्दविहार जवळ, पुणे ४) ऋषीकेश विठ्ठल घाडगे, वय २० वर्षे, रा. तरवडे वस्ती, पुणे ५) शुभम नंदु चव्हाण, वय १९ वर्षे, रा. तरवडे वस्ती, बी-६०४, मोहंमदवाडी, पुणे यांनी केला असुन, नमुद गुन्हयात त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच ६) एक विधिसंघर्षीत बालक (टोळी सदस्य) यास ताब्यात घेवुन बाल न्यायालय येरवडा, पुणे येथे हजर केले आहे. ७) एक wanted आरोपी आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना पोलिसांनी म्हटले आहे कि,’दि.०४/१०/२०२३ रोजी एस. डी. बार अॅण्ड रेस्टॉरन्ट समोर मंहमदवाडी, पुणे येथे फिर्यादी थांबले असताना १) गणेश बबन लोंढे २) विशाल माधव गोरे ३) माणिक पुरकास्त ४) ऋषीकेश विठ्ठल घाडगे यांनी मनोज साळवी कोठे आहे आमचे त्याचे कडे काम आहे अशी विचारणा केली असता मला माहित नसल्याचे फिर्यादी यांनी त्यांना सांगताच त्यांनी फिर्यादी सोबत वाद सुरु केला. त्यावर फिर्यादी यांनी त्यांना जाब विचारताच त्याचा राग आल्याने त्यांचेपैकी एकाने त्याचेकडील धारधार हत्याराने, तुला आता संपवतो असे म्हणुन फिर्यादी यांचे पाठीवर मारुन जखमी केले व त्यातील एका पांढरे रंगाचा शर्ट घातलेल्या लुकड्या मुलाने जमिल पठाण याला त्याचेकडील धारदार हत्याराने डावे कानावर डावे दंडावर व मनगटावर मारुन गंभीर जखमी केले तसेच हॉटेल मॅनेंजर विकास गोमसाळे याचे पाठीवर धारधार हत्यार मारुन त्यास जखमी करुन शिवीगाळ व आरडा ओरड करत त्यांचेकडील मोटर सायकलवरून निघुन गेले, तेव्हा तेथे पळापळ झाल्याने तेथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी हॉटेल मॅनेजर विकास याने हॉटेलचे शटर बंद करुन घेतले व हॉटेल मधील कामगार घाबरुन पळुन गेले. म्हणुन वरिल इसमांनी फिर्यादी यांना व जमील पठाण तसेच विकास गोमसाळे यांना धारधार हत्याराने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणुन फिर्यादी यांनी कोंढवा पोलीस स्टेशन येथे दिले फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नं.१०१९/२०२३, भादविक ३०७,५०४,५०६, ३४ क्रि.लॉ.अॅ.अॅक्ट कलम ७ आर्म अॅ. कलम ४(२५) हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) गणेश बबन लोंढे वय २३ वर्षे रा. साठे चौक, तरवडे वस्ती, महंमदवाडी, पुणे (टोळी प्रमुख) याने त्याचे इतर साथिदार २) विशाल माधव गोरे, वय २० वर्षे, रा. वेदात हाईट्स सोसायटी, तरवडे वस्ती, पुणे ३) मयुर माणिक पुरकास्त, वय १८ वर्षे, रा. कृष्णानगर, बुध्दविहार जवळ, पुणे ४) ऋषीकेश विठ्ठल घाडगे, वय २० वर्षे, रा. तरवडे वस्ती, पुणे ५) शुभम नंदु चव्हाण, वय १९ वर्षे, रा. तरवडे वस्ती, बी-६०४, मोहंमदवाडी, पुणे यांनी केला असुन, नमुद गुन्हयात त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच ६) एक विधिसंघर्षीत बालक (टोळी सदस्य) यास ताब्यात घेवुन बाल न्यायालय येरवडा, पुणे येथे हजर केले आहे. ७) एक पाहिजे आरोपी आहे.
नमुद आरोपी नामे गणेश बबन लोंढे (टोळी प्रमुख) याने त्याचे साथीदारांसह संघटित गुन्हेगारी टोळी तयारी केली असुन, सदर टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती साठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून, संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार करून, दुखापत किंवा हमला इत्यादी करण्याची धमकी देवुन किंवा हमला इत्यादी करण्याची पुर्वतयारी करून स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरीता मागील १० वर्षामध्ये सदर टोळीने संघटितपणे व वैयक्तीकपणे, खुनाचा प्रयत्न, चोरी करणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राव्दारे जखमी करणे, बेकायदेशीर जमावजमवणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करुन व हत्यारांचा धाक दाखवुन नागरिकांमध्ये दहशत पसरवणे, दरोडयाची तयारी करणे यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशन येथे शरीरा विरुध्दचे व माला विरुध्दचे गुन्हे दाखल असुन, त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) चा प्रमाणे कलम वाढविण्यासाठी सदर मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष सोनवणे यांनी मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०५, पुणे, श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता.
सदर प्रकरणी छाननी करून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नं. १०१९/२०२३ भादविक ३०७,५०४,५०६,३४ क्रि. लॉ. अॅ. अॅक्ट कलम ७ आर्म अॅ.कलम ४ (२५) या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजन कुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, शाहुराजे साळवे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०५, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग विभाग, पुणे, श्री. शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), संदीप भासले, संजय मोगले, सहा. पोलीस निरीक्षक, राजेश उसगावकर, गणेश तोरगल, पोलीस उप-निरीक्षक, इकबाल शेख, पोलीस अंमलदार, जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, नितीन चव्हाण, प्रदिप बेडीस्कर यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर,रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे कारणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ९१ वी कारवाई आहे
उत्तरकाशी बोगद्यातून मजुरांना बाहेर काढले….
12 नोव्हेंबरपासून उत्तराखंडच्या सिल्कियारा-दांदलगाव बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. 33 मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. सायंकाळी 7.50 वाजता पहिल्या मजुराला बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवण्यात आले. उर्वरित देखील लवकरच बाहेर काढले जातील.कामगार बाहेर येताच स्थानिकांनी मिठाईचे वाटप केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सिल्कियारा बोगद्यातील दुर्घटनेत अडकलेल्या ४१ मजुरांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आल्याने मी आनंदी आहे. अनेक यंत्रणांनी केलेले हे संघटित प्रयत्न आहेत. गेल्या काही वर्षांतील महत्त्वाच्या बचावकार्यापैकी हे बचावकार्य महत्त्वाचे ठरले. विविध विभाग आणि प्रत्येत यंत्रणांनी एकमेकांना पूरक सहकार्य केले. इतर अनेक आव्हानांना तोंड देत असतानाही सर्वांच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले.
बचाव पथकाचे सदस्य हरपाल सिंग यांनी सांगितले की, पहिला ब्रेक थ्रू संध्याकाळी 7.05 वाजता सापडला. लवकरच सर्व कामगार बाहेर येतील.उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कामगारांशी संवाद साधला.

या कामगारांच्या सुटकेच्या मोहिममध्ये जिनेव्हा येथील इंटरनॅशनल टनेलिंग अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख अरनॉल्ड डिक्स यामध्ये सहभागी झाले. अरनॉल्ड डिक्स हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे आहेत.अरनॉल्ड डिक्स यांनी आज सकाळी बचावक कार्य यशस्वी होत असल्यानं समाधान वाटत असल्याचं म्हटलं होतं. ऑगर मशीन ४८ मीटरपर्यंतचं खोदकाम केल्यानंतर बंद पडली होती. त्यानंतरचं खोदकाम रॅट होल मायनर्स यांच्याकडून करण्यात आलं.
अरनॉल्ड डिक्स हे या मोहिमेत २० नोव्हेंबरपासून सहभागी झाले होते. अरनॉल्ड डिक्स हे इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशन, जिनेव्हाचे अध्यक्ष आहेत. मात्र, त्यांच्याकडे भूगर्भशास्त्र, अभियांत्रिकी आणि कायदा विषयाच्या पदव्या आहेत. त्यांनी विज्ञान आणि कायदा विषयाची पदवी मोन्साह विद्यापीठ मेलबर्न येथून मिळवली आहे.
अरनॉल्ड डिक्स हे गेल्या ३० वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत भूमिगत सुरक्षेसंदर्भातील कामांमध्ये त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे. कतार रेड क्रिसेंट सोसायटीशी ते २०१६ ते २०१९ दरम्यान संबंधित होते.२०२० मध्ये देखील एक त्यांनी भूमिगत बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी सुरु असलेल्या मोहिमेत सहभाग घेतला होता.
काँग्रेसच्या आंदोलनाचा दणका:शिवाजीनगर एसटी स्थानकाचे काम मार्गी लागले-माजी आमदार मोहन जोशी
पुणे – काँग्रेस पक्षाने आंदोलनाचा दणका दिल्यामुळे शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी आणि महामेट्रोच्या खर्चात बांधण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे.
प्रवाशांची सोय आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी होण्यासाठी १५ दिवसांत निर्णय घेतला जावा, अशा मागणीसाठी माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर दि. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी आंदोलन करण्यात आले होते. हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर मुख्य मंत्र्यांनाच पुण्यात अडवू, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला होता.
महामेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करण्यात आले होते. महामेट्रोचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले तरी एसटी स्थानक पूर्ववत करण्याबाबत निर्णय होत नव्हता. एसटी स्थानकाचा आराखडा मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर झाला होता. परिवहन खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांची गाडी अडविण्याचा इशारा देण्यात आला होता. काँग्रेस पक्षाने आंदोलनानंतरही प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे राज्य सरकारला निर्णय घेणे भाग पडले, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
एसटी प्रवाशांची सोय व्हावी तसेच एसटी स्थानकाचे स्थलांतर पुणे -मुंबई महामार्गावर वाकडेवाडी जवळ झाल्याने तेथील वाहतुकीची समस्या बिकट झाली होती, ती समस्याही सुटावी, अशा दुहेरी हेतूने काँग्रेसने हा प्रश्न हाती घेतला होता. अशी माहिती माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात दिली आहे.
अशा प्रकारे होणार रेस्क्यू…16 दिवस अडकलेल्या 41 मजुरांना बोगद्यातून बाहेर येण्यास उरला काही अवधी
12 नोव्हेंबरपासून उत्तराखंडच्या सिल्कयारा-दांदलगाव बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पाईप आत जाण्यासाठी काही अंतर बाकी आहे. यानंतर रॅम्प बांधण्यात येणार आहे. यानंतर 16 दिवस अडकलेल्या 41 मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात येणार आहे.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनन म्हणाले – खोदकाम पूर्ण झाल्यानंतर पाइपपर्यंत बोगद्यात रॅम्प तयार केला जाईल. रॅम्प बनवण्यात काही अडचण आल्यास शिडी बसवण्यात येईल. याद्वारे कामगारांना पाइपवर नेले जाऊ शकते. पाइपवर पोहोचल्यावर कामगारांना स्ट्रेचरवर झोपवले जाईल आणि दोरीच्या साहाय्याने ओढून बाहेर काढले जाईल. एका कामगाराला बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी 3 ते 5 मिनिटे लागतील.एकदा सर्व पुरुषांना बाहेर काढल्यानंतर, त्यांच्यासाठी आवश्यक वैद्यकीय पायाभूत सुविधा तयार केल्या गेल्या आहेत, त्यांच्या वैद्यकीय कल्याणासाठी कोणतीही शिथिलता ठेवली जाणार नाही. जिल्हा रुग्णालयात 30 खाटांची सुविधा तर जागेवरच 10 खाटांची सुविधा तयार आहे. स्टँडबाय चिनूक हेलिकॉप्टर जवळच्या हेलिपॅडवर उपलब्ध आहे. मात्र, ते रात्रीच्या वेळी उडवले जाणार नाही. तातडीची गरज असल्यास, कामगारांना ऋषिकेशला आणण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जाऊ शकतो. कामगारांच्या आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य देण्यासाठी साइटवर ट्रायज केले जाईल. कामगारांनी अनुभवलेल्या दीर्घ कालावधीच्या अलगावमुळे उद्भवू शकणारे संभाव्य बदल लक्षात घेऊन त्यांचे 48 – 72 तास निरीक्षण केले जाईल.
रुग्णवाहिकेशिवाय बोगद्याच्या आत स्ट्रेचर आणि गाद्या पोहोचवण्यात आल्या आहेत. येथे रुग्णालय बांधण्यात आले आहे. बचावकार्यानंतर कामगारांना येथे ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांना 30-35 किमी दूर असलेल्या चिन्यालिसौर येथे नेले जाईल. जेथे 41 खाटांचे विशेष रुग्णालय बांधण्यात आले आहे. जर कोणत्याही मजुराची प्रकृती बिघडली, तर त्याला तत्काळ एअरलिफ्ट करून एम्स ऋषिकेशमध्ये पाठवले जाईल.चिन्यालीसौर विमानतळावर चिनूक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही मजुराची प्रकृती खालावल्यास त्याला हेलिकॉप्टरने तत्काळ ऋषिकेश एम्समध्ये पाठवले जाईल.
तत्पूर्वी, सिल्कयारा बाजूकडून आडवे ड्रिलिंग करण्यात गुंतलेले उंदीर खाण कामगारांनी उत्खनन पूर्ण केले आणि अपघाताच्या 17व्या दिवशी दुपारी 1.20 वाजता पाईपमधून बाहेर आले. त्याने सुमारे 21 तासांत 12 मीटर मॅन्युअल ड्रिलिंग केले. 24 नोव्हेंबर रोजी ऑगर मशीन कामगारांच्या ठिकाणापासून फक्त 12 मीटरवर तुटली. त्यामुळे बचावकार्य थांबवावे लागले.यानंतर उर्वरित ड्रिलिंगसाठी लष्कर आणि रॅट मायनर्सना पाचारण करण्यात आले. मंगळवारी सकाळी अकरा वाजता अधिकाऱ्यांनी कपडे व दप्तर तयार ठेवण्यास सांगताच कामगारांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. लवकरच चांगली बातमी येत आहे.
शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी, कामगारांच्या ठिकाणापूर्वी केवळ 12 मीटर आधी मशीनचे ब्लेड तुटले. त्यामुळे बचावकार्य थांबवावे लागले. 12 नोव्हेंबर रोजी निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे बोगद्यात काम करणारे ४१ मजूर आत अडकले होते. उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी सोमवारी संध्याकाळी देशवासियांना केले. त्यांची सुटका करण्यात सरकार कोणतीही कसर सोडत नसल्याचे ते म्हणाले.
16 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी 86 मीटर लांबीचे व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू आहे. आतापर्यंत 31 मीटर खोदकाम झाले आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष सचिव पीके मिश्रा, गृह सचिव अजय के भल्ला आणि उत्तराखंडचे मुख्य सचिव एसएस संधू हे देखील बोगद्यातील बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी पोहोचले.
बचाव कार्याबाबत महत्वाची अद्ययावत माहिती :
1. एनचआयडीसीएलचे जीवनरक्षणासाठीचे प्रयत्न:
- ताजे शिजवलेले अन्न आणि ताजी फळे ठराविक अंतराने दुसऱ्या लाईफ लाइन (150 मिमी व्यास) सेवेचा वापर करून बोगद्याच्या आत पोहोचवली जात आहेत.
- एसडीआरएफने उपलब्ध मनुष्यबळासह व्हिडिओ संप्रेषण स्थापित केले आहे आणि एनडीआरएफने थेट लाईन संपर्क स्थापित केला आहे.
2. एनएचआयडीसीएल द्वारे हॉरीझॉन्टल बोरिंग (आडवे खोदकाम)
- आतापर्यंत एकूण 58 मीटर पर्यंत पाईप आत ढकलण्यात आला आहे.
3.सतलज जल विद्युत निगम- द्वारे बचावासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग (उभे खोदकाम) (1.0 मीटर व्यास):
- ड्रिलिंग काम सुरू झाले असून वार्तांकनाच्या वेळेपर्यंत 45 मीटर चे काम पूर्ण झाले.
4.टीएचडीसीएल द्वारे बरकोट बाजूला आडवे ड्रिलिंग:
- टीएचडीसी ने बरकोट बाजूला बचाव बोगद्याचे बांधकाम सुरू केले आहे.
- 28.11.2023 रोजी 0500 वाजता सातवा स्फोट करण्यात आला.
- बोगद्याची एकूण निष्पादित लांबी 13.20 मीटर आहे. पुढे, खोदकाम सुरु आहे.
- 18 रीब्सच्या फॅब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे.
5.आरव्हीएनएल द्वारे लंब-क्षैतिज ड्रिलिंग:
- मजुरांना वाचवण्यासाठी आडव्या ड्रिलिंगसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्म बोगद्यासाठी लागणारी उपकरणे नाशिक आणि दिल्लीहून घटनास्थळी पोहोचली आहेत.
- प्लॅटफॉर्म बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे. मजबुतीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
6.सिल्क्यरा टोकाला आरव्हीएनएल द्वारे उभे ड्रिलिंग (8 इंच व्यास):
- बीआरओ ने 1150 मीटरचा प्रवेश रस्ता पूर्ण केला आहे आणि आरव्हीएनएल ला सुपूर्द केला आहे. ड्रिलिंगसाठी बीआरओ ने घटनास्थळी मशीन आणले.
- आरव्हीएनएल ला विद्युत जोडणी प्रदान करण्यात आली आहे.
- उभ्या ड्रिलिंगसाठी प्लॅटफॉर्म पूर्ण झाला आहे.
- 26.11.2023 रोजी 0400 वाजता ड्रिलिंग सुरू झाले आणि 72 मीटर काम पूर्ण झाले.
7.ओएनजीसी द्वारे बरकोट टोकाकडे उभे ड्रिलिंग (24 इंच व्यास).
- ओएनजीसी ने पुरवलेली एअर हॅमर ड्रिलिंग रिगची सर्व संबंधित सामग्री ऋषिकेश येथे पोहोचली आहे, कारण ड्रिलिंगसाठी रिग ठेवण्यासाठी बीआरओ द्वारे मार्ग आणि जागा तयार केली जात आहे.
8.टीएचडीसीएल/लष्कर/कोल इंडिया आणि एनएचआयडीसीएल च्या संयुक्त टीमद्वारे मॅन्युअल-सेमी मेकॅनाइज्ड पद्धतीने ड्रिफ्ट टनेल:
- 22 फ्रेम्स तयार करण्यात आल्या आहेत.
ललित पाटील प्रकरणात कारागृह रक्षकही गजाआड
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने येरवडा कारागृहातील रक्षकास अटक केली. ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते (वय ५७ ,रा. रक्षकनगर, खडकी) याला मंगळवारी अटक करण्यात आली.त्यानंतर कारागृह रक्षक यास अटक करण्यात आली. मोईस अहमद शेख (वय ३०, रा. मूळ रा. देगलूर, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहेशेवते आणि शेख यांना अटक करुन मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १ डिसेंबरपर्यंत पोलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले
ललित पाटील हा ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेत होता. २ ऑक्टोबर रोजी तो बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. त्यादिवशी कारागृह रक्षक शेख वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये बंदोबस्तात होता. शेखने ललितला पसार होण्यास मदत केल्याचे तपासात उघडकीस झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली..शेखच्या मोबाइल क्रमंकावरुन २ ऑक्टोबर रोजी ललितने ॲड. प्रज्ञा कांबळे, अभिषेक बलकवडे, विनय आराहाना यांच्याशी संपर्क साधला होता. याप्रकरणात कांबळे, बलकवडे, आरहाना यांनाही अटक करण्यात आली होती..
नासाच्या प्रमुखांनी डॉ जितेंद्र सिंह यांची घेतली भेट, इस्रोसोबत संयुक्त उपग्रह प्रक्षेपित करण्याबाबत दोघांमध्ये झाली चर्चा
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2023
पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, (NISAR) नावाचा मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह भारत आणि अमेरिका संयुक्तपणे प्रक्षेपित करतील, असे नासाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज नवी दिल्लीत डॉ जितेंद्र सिंह यांची भेट घेतली.

निसार(NISAR) ला भारताच्या जीएस एलव्ही वरून प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य आहे. निसारवरून येणारी माहिती प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील भू परिसंस्था, पर्वत आणि ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेश, समुद्रातील बर्फ आणि महासागरांचे किनारे यांचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतील.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर ऐतिहासिक चांद्रयान-3 उतरल्याबद्दल डॉ जितेंद्र सिंह यांचे अभिनंदन करताना, नेल्सन यांनी डॉ जितेंद्र सिंह यांना नासाचे रॉकेटचा वापरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) भारताच्या पहिल्या अंतराळविषयक कार्यक्रमाला गती देण्याचे आवाहन केले.
उद्या बेंगळुरू येथे भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा यांना भेटण्यास उत्सुक असल्याचे नेल्सन यांनी यावेळी सांगितले .

या बैठकीला अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी हे देखील उपस्थित होते.
भालचंद्र नेमाडे लिखित कादंबरी ‘कोसला’ आता झळकणार पडद्यावर
भव्य समारंभात ‘कोसला – शंभरातील नव्याण्णवांस… ‘ चित्रपटाची घोषणा
भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली होती. त्यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. पांडुरंग सांगवीकर नामक तरुणाची ही कथा. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे आलेले अनुभव यांचा प्रवास म्हणजे कोसला. या तरुणाचा जीवनप्रवास सांगणारी ही कादंबरी आता चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच ‘कोसला – शंभरातील नव्याण्णवांस…’ या चित्रपटाची एका भव्य सोहळयात घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडेही उपस्थित होत. यावेळी गायक जयदीप वैद्य आणि तबला वादक केतन पवार यांच्या निर्गुण शास्त्रीय संगीताने या सोहळ्यात रंगत आणली तर अच्युत पालव यांनी कॅनव्हासवर ‘कोसला’ची सुंदर कलाकृती साकारली. आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असून निर्माण स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह निर्माते आहेत.
१९६३ मध्ये वयाच्या २५व्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांनी ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी इंग्रजीसह हिंदी, गुजराती, कन्नड, असामी, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि ओरिया भाषेत अनुवादित करण्यात आली. त्यामुळे या कादंबरीची ओळख केवळ भारतापुरताच मर्यादित राहिली नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. २०१४ मध्ये डॉ. भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा ५० वा ज्ञानपीठ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
चित्रपटाबद्दल साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘’ साहित्या इतकेच माझे चित्रपटांवरही प्रेम आहे. मला चित्रपटांमध्ये पाहाण्याव्यतिरिक्त काही करता आले नाही. मात्र सयाजी शिंदे या मित्रामुळे माझा पाय चित्रपटांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत ‘कोसला’ साठी अनेक जण मला भेटले परंतु त्यांना ते जमले नाही. मला यांच्याबाबतीतही तसेच वाटले. वर्षभरात म्हणतील काही जमत नाही आणि सोडून देतील. परंतु यांची चिकाटी अफाट होती. ते इथपर्यंत पोहोचले. त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत आणि त्यामुळे मला उभारी मिळाली. पुढच्या कांदबऱ्या लिहिण्याचा उत्साह यांनी मला दिला आहे.’’
तर अभिनेते सयाजी शिंदे म्हणतात, ‘’ जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हाच ही कांदबरी आली होती. तेव्हा मी स्वतः या कादंबरीतील उतारे पाठ केले होते. बोलण्यासाठी आणि अभिनयासाठी त्याचा कसा वापर होईल, याचा विचार करायचो. त्यानंतर बराच काळ लोटला. अनेकांचा या कादंबरीवर चित्रपट करण्याचा विचार होता. याच दरम्यान मला मेहुल सरांचा फोन आला. आम्ही नेमाडे सरांसोबत एक-दोन मिटिंग केल्या आणि अखेर नेमाडे सरांनी ‘कोसला’ला संमती दिली. सरांच्या सगळ्या नियंमांचे पालन करत आता या चित्रपटाची सुरूवात होत आहे.’’
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य राठी म्हणतात, ” भालचंद्र नेमाडे हे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावर आम्ही चित्रपट करतोय. यासाठी मी मेहुल शाह यांचे आभार मानेन की, त्यांनी आम्हाला सहकार्य केले. ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. गावातील निरुत्साही वातावरण न आवडणाऱ्या, त्याचा तिटकारा वाटत असतानाही गावासाठी काहीतरी थोर स्वप्न पाहणाऱ्या तरुणाची ही भावनिक कथा आहे. खरंतर चित्रपटाविषयी काही सांगायची गरजच नाही. कारण आपल्यापैकी अनेकांनी ही कादंबरी वाचली आहे. त्यामुळे आता ही कथा प्रेक्षकांना लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे.’ तर गायत्री पाटील म्हणतात, ‘’ भालचंद्र नेमाडे सर जळगावचे आहेत आणि मी सुद्धा. ‘कोसला’ मला भावण्याचे कारण म्हणजे या कांदबरीत महिलांना दिलेला सन्मान. त्यामुळे ही कथा मला विशेष वाटली.’’
हा कांतारा टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे: अभिनेते आणि चित्रपट निर्माते ऋषभ शेट्टी
गोवा28 नोव्हेंबर 2023
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते ऋषभ शेट्टी यांनी आज गोव्यामध्ये आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) आयोजित संवाद सत्रात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. गतिशील आणि दिमाखदार कन्नड चित्रपट सृष्टीचे प्रतिनिधित्त्व करणारे ऋषभ शेट्टी, हे कांतारा या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. कांतारा हा चित्रपट इफ्फी 54 मधील प्रतिष्ठेच्या गोल्डन पीकॉक पुरस्कारासाठी यंदाच्या 15 लक्षवेधी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या तीन भारतीय चित्रपटांपैकी एक आहे.

कांतारा या 150 मिनिटे लांबीच्या कन्नड भाषेतील चित्रपटाने गेल्या वर्षी प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक आणि समीक्षकांना झपाटून सोडले आहे. संस्कृती आणि लोककला प्रकारांना मानवंदना देणाऱ्या कांतारा या चित्रपटात नृत्य आणि भावनांचा अद्भुत मेळ साधत, चित्रित करण्यात आलेला मानव आणि निसर्गामधील गुंतागुंतीचा संघर्ष प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतो, आणि त्याचा प्रभाव दीर्घकाळ रेंगाळत राहतो.
“प्रेक्षक कांताराशी जोडले गेले कारण ही कथा भारताच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे,” शेट्टी म्हणाले. “प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला, आणि खर्या अर्थाने आपलासा केला,” ते पुढे म्हणाले. आपला मूळ गाभा कायम ठेवत, कांताराने पारंपरिक कोला नृत्य आणि ते सादर करणाऱ्या समुदायाला व्यक्त होण्याची नवीन संधी दिली.

ऋषभ म्हणाले की, त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही ते सातत्याने या समाजाच्या संपर्कात आहेत. “ही माझी परंपरा, माझा या विधीवर विश्वास आहे आणि मी या देवाची पूजा करतो. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेतली आणि संस्कृती किंवा समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेतली,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कांताराच्या यशाचे श्रेय श्रद्धेला देत शेट्टी म्हणाले की, स्वतःवर आणि आपण केलेल्या कामावर श्रद्धा असली, तरच खऱ्या अर्थाने चांगले काम करता येते. ते असेही म्हणाले की आपले काम प्रामाणिकपणे करावे, यशाच्या मागे धावू नये.
कन्नड सिनेमाबद्दल बोलताना, ऋषभ शेट्टी यांनी ओटीटी माध्यमाच्या आव्हानाबद्दल सांगितले. हे व्यासपीठ अजूनही कन्नड प्रेक्षकांबाबत सावध भूमिका घेत आहे, आणि कन्नड चित्रपटांसाठी अजूनही खुले नाही, ज्यामुळे कन्नड चित्रपट उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे, असे ते म्हणाले.
आपल्याला जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळायला हवी, असे ते म्हणाले. “चित्रपटाने आपल्याला खूप काही दिले, आपणही कन्नड सिनेमासाठी काही करायला हवे.” शेट्टी यांनी आवाहन केले. भारतीय चित्रपटातील दर्जेदार आशय आज खर्या अर्थाने जगभर पोहोचला आहे, यावर आपला विश्वास असल्याचे ते म्हणाले. “सध्या मोठी क्रांती घडत आहे. भाषेच्या अडथळ्यावर मात करत चांगल्या आशयाला मोठी स्वीकृती मिळत आहे,” शेट्टी म्हणाले.
इफ्फी बरोबर आपण कसे जोडले गेलो, हे सांगताना ऋषभ शेट्टी यांनी नमूद केले की इफ्फी चित्रपट महोत्सवात येण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. चित्रपट महोत्सव, चित्रपट पाहण्याची आणि शिकण्याची संधी देतात, असे ते म्हणाले. इफ्फीसारखे महोत्सव आपल्याला एक विस्तारित कुटुंबच वाटते असे ते म्हणाले. त्यांनी चित्रपट महोत्सवांची प्रशंसा केली आणि छोट्या चित्रपटांना ओळख मिळवून देण्यासाठी या व्यासपीठांचा वापर करायला हवा असे आवाहन केले.
शेट्टी यांनी अलीकडेच कांतारा या चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित प्रीक्वलची घोषणा केली होती, ज्याचे पोस्टर काल प्रकाशित करण्यात आले. त्यांनी हे स्पष्ट केले की, सुरुवातीपासूनच हा चित्रपट दोन भागांमध्ये असावा, अशी कल्पना होती.
दिग्दर्शन, लेखन, अभिनय यापैकी सर्वात प्रिय काय, यावर बोलताना शेट्टी म्हणाले, “दिग्दर्शन हे माझे पहिले प्रेम आहे.” “मी जीवनाच्या अनुभवांवर विश्वास ठेवतो, मी लोकांशी जोडलेला आहे आणि माझ्या चित्रपटांमध्ये ते आणण्याचा प्रयत्न करतो”.
कर्वे समाज सेवा संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा –
संविधान रॅली, व्याख्यान आणि ७३ किलोमीटर सायकलिंग करून संविधान दिन साजरा
पुणे – येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्यावतीने , सहायक समाज कल्याण आयुक्तालय, बार्टी तसेच इतर संस्थांच्या मदतीने कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.विनायक कराळे, सचिव एम.शिवकुमार, सदस्य शिल्पा पाठक , प्रभारी संचालिका डॉ. शर्मिला सहदेव, सीएसआर सेलचे संचालक डॉ. महेश ठाकूर, सीएमएचडीचे अध्यक्ष सहाय्यक प्रा.चेतन दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली २६ नोव्हेंबर हा संविधान दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालय व बार्टीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भिडे वाडा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन पर्यंतच्या संविधान जागृती रॅलीमध्ये कर्वे समाज सेवा संस्थेच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच महाविद्यालयामध्ये संविधान जनजागृतीवर आधारित व्याख्यानाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते
विशेष म्हणजे यावर्षी ७३ व्या भारतीय संविधान दिनानिमित्त समाजकार्य प्रथम वर्षाचे विद्यार्थी रितेश भोयर, विशाल ठाकूर व अक्षय खोल्लम या तीन विद्यार्थ्यांनी ७३ किलोमीटर सायकलिंग करून हा संविधान दिन साजरा केलातसेच कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये संविधान जागृतीपर प्रा.मिलिंद माचाळे यांचे व्याख्यान प्रा चेतन दिवाण यांच्या अध्यक्षेताखाली आयोजित करण्यात आले होते यावेळेस संस्थेच्या समुपदेशन व समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संविधान शपथ घेतली.व्याख्यानकार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल काकडे यांनी केले, सूत्रसंचालन मुकेश सावकारे यांनी केले तर आभार डॉ पद्मश्री पाटील यांनी मानले.ग्रंथपाल मंगेश तळमले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेषत: समाजकार्य व समुपदेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन संविधान जनजागृती केली.
विकसित भारत संकल्प यात्रा:पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर सह सोलापूरातूनही झाला शुभारंभ
पुणे, 28 नोव्हेंबर 2023
देशाच्या आदिवासी तसेच ग्रामीण भागात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचल्यानंतर आजपासून शहरी भागातून देखील या यात्रेचा शुभारंभ झाला. केंद्र सरकारच्या योजनांविषयी जनजागृती करण्यासाठी सुरू झालेला हा उपक्रम दोन महीने सुरू राहणार आहे. लोकांनी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, तसेच अजूनही योजनांच्या लाभापासून दूर असलेल्या नागरिकांपर्यंत शासकीय यंत्रणा पोहचवी असा उद्देश या यात्रेमागे आहे.
आज पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर व सोलापुर शहरांमधूनही ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू झाली.
ग्रामदैवत कसबा गणपती येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा – पुणे शहर मोहीमेचे उद्घाटन आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते व अति. आयुक्त कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिक शहरात यात्रेचा शुभारंभ नाशिक रोड विभागीय कार्यालय येथे नाशिक महानगरपालिका उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, विभागीय अधिकारी सुनिता कुमावत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. शुभारंभ प्रसंगी महिलांचा मोठा सहभाग होता, शासनाच्या आयुषमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, पंडीत दीनदयाल अंत्योदय योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पोषण आहार योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, भारतीय डाक विभागातील योजना या विविध योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यावेळी अनेकांनी नावनोंदणी केली. यात्रेच्या ठिकाणी महिलांची आरोग्य तपासणी रक्त तपासणीची विशेष मोहीम नाशिक महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.


सोलापुरात महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर मधील सिध्दार्थ उद्यानामध्ये देवशाली जिने, नजरिन सय्यद रफी, फिरोज खान इब्राहिम खान, सइनाज शेख जावेद या लाभार्थीच्या हस्ते यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. गरीब – वंचित यांच्यापर्यंत राज्य व केंद्रशासनाच्या योजना पोहचवणे, ही आमची जवाबदारी आहे, असे मत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी विकसित भारत संकल्प यात्राच्या उद्घाटनप्रसंगी मांडले. महानगरपालिकेच्या दहा झोन मधील 47 ठिकाणी ही यात्रा 22 डिसेंबरपर्यंत विविध परिसरात जाणार आहे. शहरासाठीच्या सहा योजनांसह केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती दिली जाणार आहे. याप्रसंगी संकल्प प्रतिज्ञा घेण्यात आली. महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय शिक्षण बदलले तर भारत बदलेल – प्रा. डॉ. राकेश भटनागर
एमआयटी डब्ल्यूपीयूत व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना
पुणे,दि.२८ नोव्हेंबर:”देश बदलायचा असेल तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा आराखडा बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षकांची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्ती निर्माण करून शिक्षकांनी त्यांच्यावर कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे.” असे विचार बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रा.डाॅ. राकेश भटनागर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी युनेस्को चेअर फॉर पीसचे वरिष्ठ सल्लागार प्रा. डॉ. प्रियंकर उपाध्याय हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे , बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे माजी अध्यक्ष ए. जंबूनाथन व वत्सला जंबूनाथन उपस्थित होते.
डॉ. भटनागर म्हणाले,” देशातील शिक्षणाची दिशा बदलणे गरजेचे असून त्यात गुणवत्ता व कौशल्यपूर्ण शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. प्रगत जर्मनी देशात प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते. या देशात आज सर्वोत्तम इंजिनियर आहेत. भारतामध्ये आयआयटी सारख्या शिक्षण संस्थेने सर्वोत्कृष्ट इंजिनियर निर्माण केले परंतू ते इंजिनियर विदेशात जाऊन संशोधन करतात. अशा वेळेस देशातील विद्यापीठांनी उत्तम संशोधक निर्मितीसाठी शिक्षणावर खर्च करावा. संशोधनामुळेच भारत वैक्सीन निर्मितीची राजधानी बनली आहे.”
डॉ. प्रियंकर उपाध्याय म्हणाले,” संपूर्ण जग शांतीच्या शोधात असतांना विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांनी एमआयटीच्या माध्यमातून शांतीची संस्कृती निर्माण केली आहे. जगातील सर्वात मोठ्या डोमच्या माध्यमातून शांतीचा संदेश पसरविला जात असतांना आंतरिक व सामाजिक शांती अत्यंत महत्वाची आहे. तसेच राष्ट्रीय विधायक परिषद या अद्वितीय कार्यक्रमाचे आयोजन करून राहुल कराड यांनी देशातील २ हजार आमदारांचे एकत्र विचार मंथन घडवून आणले.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘मी, माझे पद आणि मनःशांती’ या विषयावर सांगितले की, पद हे मनुष्याच्या मनात अहंकार निर्माण करते. परंतू जीवनात व्यक्ती म्हणून असलेले पद कायम ठेवा. मन शांती ही अध्यात्मातून नाही तर दैनंदिन जीवनातून, सामाजिक आणि कार्यालयीन स्थळावरून होऊ शकतो. भूमिका ही व्यक्तीनुसार बदलावी जेणे करून शांती निर्माण होईल.”
तसेच डॉ. महेश थोरवे यांनी महाराष्ट्र धर्मावर विचार मांडला तर डॉ.एम.वाय गोखले यांचे ही भाषण झाले.
डॉ. मृदुला कुलकर्णी व पराग खानविलकर यांनी सूत्रसंचालन केले.
सई तापकीर ठरल्या महाराष्ट्राची सौंदर्यवती पर्व आठ च्या मानकरी
लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट यांचा
महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा उपक्रम

पुणे (दि. २८ नोव्हेंबर २०२३) महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम पिंपरी चिंचवड शहरातील लॉलीपॉप एंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट या संस्थेच्या वतीने करण्यात येते.
या संस्थांच्या वतीने “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२३” पर्व ८ अंतर्गत महिलांच्या खुल्या गटाच्या आणि लहान मुले आणि मुलींच्या सौंदर्य स्पर्धा रविवारी चिंचवड येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या सौंदर्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत झालेल्या विविध फेऱ्यांमध्ये सई तापकीर या प्रथम क्रमांक मिळवित “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२३” चा मुकुट आणि रोख पंधरा हजार रुपयांचे बक्षीसाच्या मानकरी ठरल्या. नेहा निकाळजे द्वितीय क्रमांक मुकुट आणि रोख बारा हजार रुपये, तृतीय क्रमांक सानिका जवंजाळ यांनी मुकुट आणि रोख दहा हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. विजेत्या स्पर्धकांना ज्येष्ठ कर सल्लागार शाळिग्राम तायडे प्रा. विजय रामाने यांच्या हस्ते सोन्याची नथ, पैठणी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
लहान मुलांच्या गटात प्रथम क्रमांक अंशिका कदम, द्वितीय क्रमांक अनविका मोरे आणि तृतीय क्रमांक अनिकेत साळुंखे यांनी मिळवला. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. नैना वेदपाठक, डॉ. दुर्गा लकडे, सुहास ढवळे आणि प्रा. सूमीता काटकार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर ग्रूमिंग नरेश फुलेलू , क्षितिज गायकवाड आणि इशा राजे यांनी केली. आऊटफिट तृप्ती पवार, वेशभूषा, केशरचना रिया आदमाने आणि प्रिया कानडे यांनी केली. शिल्पा मगरे-गाडेकर, निकिता गायकवाड आणि प्रीती वाघमारे यांनी संयोजनात सहभाग घेतला.
स्वागत लॉलीपॉप इंटरटेनमेंटचे संचालक संजीव जोग, सूत्र संचालन रुचिका भोंडवे आभार कावेरी तांबे यांनी मानले.
तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारावे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई, दि.२८: राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. बैठकीस आमदार दिलीप मोहिते-पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, डॉ. के.एच. गोविंदराज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, गृह (परिवहन) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. एसटी बसस्थानकांच्या इमारतीवर रॅम्पच्या सुविधेसह पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. शिवाय या आराखड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच बसस्थानक परिसरातील रस्त्यांसाठी एसटी महामंडळाची ६५२ चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी एसटीला जागेच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून देऊन जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी, असेही त्यांनी सांगितले.
चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करा
चाकण शहरातील विकासकामांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांना सोयीसुविधा देण्यात नगरपरिषदांना मर्यादा येत आहेत. चाकण शहर व परिसराची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
हुतात्मा राजगुरू स्मारकाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी २४८ कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना पोलीस वसाहतीसाठी आरक्षित जागेच्या ठिकाणी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत करण्याचा सुधारित आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा. त्याचप्रमाणे पंचायत समितीची जुनी जागा आहे, ती जागाही नगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या चाकण, राजगुरूनगर, आळंदी येथील एमआयडीसीमधून १० रस्ते जातात, यापैकी तीन रस्ते मंजूर आहेत, तर चार रस्ते एमआयडीसी क्षेत्राबाहेरील असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मावळ-खेड भागातील नागरिकांनी औद्योगिक क्षेत्रासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील गावांमधील नागरिकांना चांगल्या सोयी देण्यासाठी एमआयडीसी क्षेत्राला जोडणारे रस्ते, पोहोच रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मुख्य रस्ते बनवितानाच पर्यायी रस्त्यांची दुरूस्ती करावी, त्यांची रूंदी वाढवावी. शेतकऱ्यांची मान्यता असल्यास पुणे चक्राकार रोड (रिंग रोड) तयार करताना मरकळ ते गोलेगावदरम्यान सर्विस रोड ९० मीटरऐवजी ११० मीटर करावा. त्यापुढे तो लोणीकंदपर्यंत वाढविण्याबाबत विचार करावा. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनास मान्यता देण्यात येईल.
चाकण एमआयडीसीकडे ४२ एमएलडी पाण्याची मागणी येत आहे. परिसरातील सहा ग्रामपंचायतीला एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा होत असून ३० एमएलडी पाणी शिल्लक आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रस्तावित नवीन उद्योगांसाठी पाणी राखीव ठेवून उर्वरित पाण्यामधून गावांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या तिन्ही नगरपरिषदेचे घनकचरा संकलन प्रकल्प पूर्णतेच्या मार्गावर आहेत. यापुढे केवळ घनकचऱ्यावर प्रक्रिया न करता या प्रकल्पांमधून वीज, गॅस, बांधकामासाठीचे साहित्य यासारखे उत्पादन घेणारे प्रकल्प राबविण्यात यावेत. देशात नावीण्यपूर्ण कल्पना वापरून घनकचरा प्रकल्प उभारले जात आहेत, अशा प्रकल्पांची माहिती घेऊन यापुढील नवीन प्रकल्प राबविण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.
यावेळी राजगुरूनगर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या निवासस्थानाला जलसंपदा विभागाची ८० गुंठे जागा देण्यास मान्यता देण्यात आली. ही जागा कृष्णा खोरे महामंडळाची असून २० लाख रूपये महामंडळाकडे भरून शासनाला जागा ताब्यात घेण्यासही मान्यता देण्यात आली.
४२% भारतीय घराच्या किल्ल्यांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक समारंभ अर्धवट सोडून येतात
मुंबई, २४ नोव्हेंबर, २०२३: भारतात घर हे लोकांच्या जीवनाचे केंद्र असते. भारतीय हे उत्सव प्रिय असल्याने सातत्याने बाहेर सार्वजनिक समारंभ, उपहारगृह, थिएटर किंवा मैफिलीमध्ये सहभागी होत असतात. मात्र घराबाहेर असताना आपल्या घराच्या सुरक्षिततेबद्दल त्यांच्या मनात कायम एक पुसटशी भीती देखील असते. गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉइसचा एक व्यवसाय गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टम्सने केलेल्या ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ या नवीन संशोधनानुसार हे समोर आले आहे. मोकळेपणाने व निर्भयतेने राहता यावे म्हणून घराच्या सुरक्षिततेसाठी भारतीय करत असलेल्या तंत्रज्ञानाच्या निवडीबद्दल आणि भारतीयांची जीवनशैलीबद्दल हा अभ्यास नवीन माहिती देतो.
या संशोधनातून समोर आलेली एक महत्त्वाची माहिती म्हणजे, सर्वेक्षणातील ४२% प्रतिसादकांनी सांगितले की, ते एखाद्या समारंभात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात असताना आपल्या घराच्या किल्ल्यांची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा किल्ल्यांसंबंधी काही समन्वय साधण्यासाठी कार्यक्रम अर्धवट सोडून घरी परत आले आहेत. यावरून हे दिसून येते की, घरात जाण्यासाठी लोकांना बऱ्याचवेळा इतरांवर अवलंबून रहावे लागते आणि त्यासाठी कधीकधी अगदी कार्यक्रम सोडून घरी जाणे देखील त्यांना भाग पडते.
एका लोकप्रिय इव्हेंट टिकिट पोर्टलनुसार, साल २०२२ मध्ये जवळपास १९,००० मनोरंजनात्मक कार्यक्रमांमधून सुमारे ८ दशलक्ष लोक बाहेर पडले. ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ च्या अभ्यासाने दिलेली माहिती या पोर्टलच्या माहितीशी पूरक आहे; कारण या संशोधनानुसारदेखील ५४% प्रतिसादकांनी रात्री
उशिरापर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना त्यांच्या शेजाऱ्यांकडून मध्यरात्री अतिरिक्त किल्ली घेण्यासाठी त्यांना त्रास देण्याच्या कल्पनेबद्दल अस्वस्थता व्यक्त केली. याशिवाय, ४१% प्रतिसादकांनी सांगितले की, घरात नसताना जर अचानक त्यांच्या लक्षात आले की गॅस किंवा गिझर चालू आहे तर ते ताबडतोब घरी परत येतील.
गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टम्सनेचे व्यवसाय प्रमुख श्री. श्याम मोटवानी यांच्या मते, “‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ च्या संशोधनातून समोर आलेली ही प्राथमिक माहिती, ग्राहकांच्या त्यांच्या घरासंबंधी असलेल्या सर्वाधिक जिव्हाळ्याच्या पैलुबाबत म्हणजेच घरच्या सुरक्षिततेबाबत काय भावना आहेत या विषयावर प्रकाश टाकते. या संशोधनातील माहितीने घराच्या सुरक्षेबाबत लोकांचे काय प्रश्न आणि काय अपेक्षा आहेत आणि आम्ही त्यांना कसे पूर्ण करू शकतो हे आम्हाला स्पष्टपणे दाखवले आहे. भारतीय आपल्या घराच्या सुरक्षेसाठी अजूनही बाह्य घटकांवर अवलंबून आहेत हे जरी स्पष्ट दिसून येत असले तरी आता ते आजच्या धावपळीच्या जगात शांत, चिंतामुक्त आणि मनमोकळे जगता यावे म्हणून विश्वसनीय तांत्रिक उपाय सुद्धा शोधत आहेत. ‘विश्वास’ या शब्दाचा जणू समानार्थी शब्द म्हणजे गोदरेज लॉक्स. या गोदरेज लॉक्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा समजून घेतो आणि त्यानुसार घराच्या सूरेक्षेचे नवीन, अत्याधुनिक, डिजिटल उपाय विकसित करतो; जे आमच्या ग्राहकांना सुविधा आणि सुरक्षितता दोन्ही देतात आणि त्याचबरोबर त्यांना चिंतामुक्त मनमोकळे जगण्याची मुभा देखील देते.”
सुविधा आणि सुरक्षितता मिळविण्यासाठी माणसे स्मार्ट होम उपकरणांचा अवलंब करताना नेमके कसे विचार करतात आणि कसे वागतात हे समजून घेणे हे ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. हे सर्वेक्षण मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर आणि भोपाळ या ५ शहरांमधील २००० लोकांना घेऊन करण्यात आले आहे.
