12 नोव्हेंबरपासून उत्तराखंडच्या सिल्कियारा-दांदलगाव बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. 33 मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. सायंकाळी 7.50 वाजता पहिल्या मजुराला बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवण्यात आले. उर्वरित देखील लवकरच बाहेर काढले जातील.कामगार बाहेर येताच स्थानिकांनी मिठाईचे वाटप केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सिल्कियारा बोगद्यातील दुर्घटनेत अडकलेल्या ४१ मजुरांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आल्याने मी आनंदी आहे. अनेक यंत्रणांनी केलेले हे संघटित प्रयत्न आहेत. गेल्या काही वर्षांतील महत्त्वाच्या बचावकार्यापैकी हे बचावकार्य महत्त्वाचे ठरले. विविध विभाग आणि प्रत्येत यंत्रणांनी एकमेकांना पूरक सहकार्य केले. इतर अनेक आव्हानांना तोंड देत असतानाही सर्वांच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले.
बचाव पथकाचे सदस्य हरपाल सिंग यांनी सांगितले की, पहिला ब्रेक थ्रू संध्याकाळी 7.05 वाजता सापडला. लवकरच सर्व कामगार बाहेर येतील.उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कामगारांशी संवाद साधला.
या कामगारांच्या सुटकेच्या मोहिममध्ये जिनेव्हा येथील इंटरनॅशनल टनेलिंग अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख अरनॉल्ड डिक्स यामध्ये सहभागी झाले. अरनॉल्ड डिक्स हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे आहेत.अरनॉल्ड डिक्स यांनी आज सकाळी बचावक कार्य यशस्वी होत असल्यानं समाधान वाटत असल्याचं म्हटलं होतं. ऑगर मशीन ४८ मीटरपर्यंतचं खोदकाम केल्यानंतर बंद पडली होती. त्यानंतरचं खोदकाम रॅट होल मायनर्स यांच्याकडून करण्यात आलं.
अरनॉल्ड डिक्स हे या मोहिमेत २० नोव्हेंबरपासून सहभागी झाले होते. अरनॉल्ड डिक्स हे इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशन, जिनेव्हाचे अध्यक्ष आहेत. मात्र, त्यांच्याकडे भूगर्भशास्त्र, अभियांत्रिकी आणि कायदा विषयाच्या पदव्या आहेत. त्यांनी विज्ञान आणि कायदा विषयाची पदवी मोन्साह विद्यापीठ मेलबर्न येथून मिळवली आहे.
अरनॉल्ड डिक्स हे गेल्या ३० वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत भूमिगत सुरक्षेसंदर्भातील कामांमध्ये त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे. कतार रेड क्रिसेंट सोसायटीशी ते २०१६ ते २०१९ दरम्यान संबंधित होते.२०२० मध्ये देखील एक त्यांनी भूमिगत बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी सुरु असलेल्या मोहिमेत सहभाग घेतला होता.