संविधान रॅली, व्याख्यान आणि ७३ किलोमीटर सायकलिंग करून संविधान दिन साजरा
पुणे – येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्यावतीने , सहायक समाज कल्याण आयुक्तालय, बार्टी तसेच इतर संस्थांच्या मदतीने कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.विनायक कराळे, सचिव एम.शिवकुमार, सदस्य शिल्पा पाठक , प्रभारी संचालिका डॉ. शर्मिला सहदेव, सीएसआर सेलचे संचालक डॉ. महेश ठाकूर, सीएमएचडीचे अध्यक्ष सहाय्यक प्रा.चेतन दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली २६ नोव्हेंबर हा संविधान दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालय व बार्टीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भिडे वाडा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन पर्यंतच्या संविधान जागृती रॅलीमध्ये कर्वे समाज सेवा संस्थेच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच महाविद्यालयामध्ये संविधान जनजागृतीवर आधारित व्याख्यानाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते
विशेष म्हणजे यावर्षी ७३ व्या भारतीय संविधान दिनानिमित्त समाजकार्य प्रथम वर्षाचे विद्यार्थी रितेश भोयर, विशाल ठाकूर व अक्षय खोल्लम या तीन विद्यार्थ्यांनी ७३ किलोमीटर सायकलिंग करून हा संविधान दिन साजरा केलातसेच कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये संविधान जागृतीपर प्रा.मिलिंद माचाळे यांचे व्याख्यान प्रा चेतन दिवाण यांच्या अध्यक्षेताखाली आयोजित करण्यात आले होते यावेळेस संस्थेच्या समुपदेशन व समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संविधान शपथ घेतली.व्याख्यानकार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल काकडे यांनी केले, सूत्रसंचालन मुकेश सावकारे यांनी केले तर आभार डॉ पद्मश्री पाटील यांनी मानले.ग्रंथपाल मंगेश तळमले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेषत: समाजकार्य व समुपदेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन संविधान जनजागृती केली.