मुंबई, २४ नोव्हेंबर, २०२३: भारतात घर हे लोकांच्या जीवनाचे केंद्र असते. भारतीय हे उत्सव प्रिय असल्याने सातत्याने बाहेर सार्वजनिक समारंभ, उपहारगृह, थिएटर किंवा मैफिलीमध्ये सहभागी होत असतात. मात्र घराबाहेर असताना आपल्या घराच्या सुरक्षिततेबद्दल त्यांच्या मनात कायम एक पुसटशी भीती देखील असते. गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉइसचा एक व्यवसाय गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टम्सने केलेल्या ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ या नवीन संशोधनानुसार हे समोर आले आहे. मोकळेपणाने व निर्भयतेने राहता यावे म्हणून घराच्या सुरक्षिततेसाठी भारतीय करत असलेल्या तंत्रज्ञानाच्या निवडीबद्दल आणि भारतीयांची जीवनशैलीबद्दल हा अभ्यास नवीन माहिती देतो.
या संशोधनातून समोर आलेली एक महत्त्वाची माहिती म्हणजे, सर्वेक्षणातील ४२% प्रतिसादकांनी सांगितले की, ते एखाद्या समारंभात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात असताना आपल्या घराच्या किल्ल्यांची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा किल्ल्यांसंबंधी काही समन्वय साधण्यासाठी कार्यक्रम अर्धवट सोडून घरी परत आले आहेत. यावरून हे दिसून येते की, घरात जाण्यासाठी लोकांना बऱ्याचवेळा इतरांवर अवलंबून रहावे लागते आणि त्यासाठी कधीकधी अगदी कार्यक्रम सोडून घरी जाणे देखील त्यांना भाग पडते.
एका लोकप्रिय इव्हेंट टिकिट पोर्टलनुसार, साल २०२२ मध्ये जवळपास १९,००० मनोरंजनात्मक कार्यक्रमांमधून सुमारे ८ दशलक्ष लोक बाहेर पडले. ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ च्या अभ्यासाने दिलेली माहिती या पोर्टलच्या माहितीशी पूरक आहे; कारण या संशोधनानुसारदेखील ५४% प्रतिसादकांनी रात्री
उशिरापर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना त्यांच्या शेजाऱ्यांकडून मध्यरात्री अतिरिक्त किल्ली घेण्यासाठी त्यांना त्रास देण्याच्या कल्पनेबद्दल अस्वस्थता व्यक्त केली. याशिवाय, ४१% प्रतिसादकांनी सांगितले की, घरात नसताना जर अचानक त्यांच्या लक्षात आले की गॅस किंवा गिझर चालू आहे तर ते ताबडतोब घरी परत येतील.
गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टम्सनेचे व्यवसाय प्रमुख श्री. श्याम मोटवानी यांच्या मते, “‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ च्या संशोधनातून समोर आलेली ही प्राथमिक माहिती, ग्राहकांच्या त्यांच्या घरासंबंधी असलेल्या सर्वाधिक जिव्हाळ्याच्या पैलुबाबत म्हणजेच घरच्या सुरक्षिततेबाबत काय भावना आहेत या विषयावर प्रकाश टाकते. या संशोधनातील माहितीने घराच्या सुरक्षेबाबत लोकांचे काय प्रश्न आणि काय अपेक्षा आहेत आणि आम्ही त्यांना कसे पूर्ण करू शकतो हे आम्हाला स्पष्टपणे दाखवले आहे. भारतीय आपल्या घराच्या सुरक्षेसाठी अजूनही बाह्य घटकांवर अवलंबून आहेत हे जरी स्पष्ट दिसून येत असले तरी आता ते आजच्या धावपळीच्या जगात शांत, चिंतामुक्त आणि मनमोकळे जगता यावे म्हणून विश्वसनीय तांत्रिक उपाय सुद्धा शोधत आहेत. ‘विश्वास’ या शब्दाचा जणू समानार्थी शब्द म्हणजे गोदरेज लॉक्स. या गोदरेज लॉक्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा समजून घेतो आणि त्यानुसार घराच्या सूरेक्षेचे नवीन, अत्याधुनिक, डिजिटल उपाय विकसित करतो; जे आमच्या ग्राहकांना सुविधा आणि सुरक्षितता दोन्ही देतात आणि त्याचबरोबर त्यांना चिंतामुक्त मनमोकळे जगण्याची मुभा देखील देते.”
सुविधा आणि सुरक्षितता मिळविण्यासाठी माणसे स्मार्ट होम उपकरणांचा अवलंब करताना नेमके कसे विचार करतात आणि कसे वागतात हे समजून घेणे हे ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. हे सर्वेक्षण मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर आणि भोपाळ या ५ शहरांमधील २००० लोकांना घेऊन करण्यात आले आहे.