क्रीडा क्षेत्रातील आघाडीच्या शाळेमध्ये सिटी प्राइड स्कूल, निगडी आणि लॉयला हाय स्कूल, पाषाण या शाळा रनर अप
· विद्या व्हॅली स्कूल, सूसच्या अवंतिका रंजीत खेरने जिंकली ‘गोल्डन गर्ल’ची ट्रॉफी, तर विद्या व्हॅली सूस स्कूलचा मल्हार सागर देशमुख ठरला गोल्डन बॉय
पुणे– पुण्यामध्ये नुकतीच एसएफए चॅम्पियनशीपची सांगता झाली. पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपमधील ‘क्रीडा क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाच्या शाळेचा’ प्रतिष्ठित सन्मान विद्या व्हॅली स्कूल, सूसने जिंकला. या शाळेने एकूण ३० सुवर्ण, १३ रौप्य आणि १५ ब्राँझ पदके व २३८ गुण जिंकले. वेगवेगळ्या खेळांतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपमध्ये विद्या व्हॅली स्कूल, सूसच्या अवंतिका रंजीत खेरने दोन सुवर्ण पदकांसह गोल्डन गर्ल हा पुरस्कार जिंकला, तर याच शाळेच्या मल्हार सागर देशमुखनेही २ सुवर्ण पदके जिंकत गोल्डन बॉय हा पुरस्कार मिळवला.
संयुक्त सचिव, महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन, सचिव पीसीएमसी आर्चरी असोसिएशनच्या सोनल बुंदेले यांनी सांगता समारंभात खेळाडूंचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, ‘एसएफए चॅम्पियनशीपपुण्यातीलखेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ बनले असून या चॅम्पियनशीपमध्ये १२,००० खेळाडू सहभागी झाले होते. गुणवत्ता हेरून खेळाची संस्कृती रूजवण्याची एसएफएची बांधिलकी कौतुकास्पद आहे. पदके आणि विजयाच्या पलीकडे जात एसएफए खेळाच्या माध्यमातून विजेत्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. एसएफए सकारात्मक स्थित्यंतर घडवून पुण्यातील क्रीडा विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बांधली आहे.’
पुण्यात एसएफए चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये ६०० शाळांतील १२०० मुले सहभागी झाली होती. या चॅम्पियनशीपमध्ये प्रत्येक खेळातील पुण्यातील आघाडीच्या शाळेचाही शोध घेतला गेला.
या समारंभात आदिती मुटाटकर, कॉमनवेल्थ गेम्स पदकविजेत्या, ५ वेळा राष्ट्रीय विजेत्या, प्रोग्रॅम प्रमुख – अथलीट अँड वुमन इनिशिएटिव्ह, सिंपली स्पोर्ट फाउंडेशन म्हणाल्या, ‘तळागाळातील क्रीडा स्पर्धांची पुरस्कर्ती या नात्याने मी एसएफए चॅम्पियनशीपचे तरुण खेळांडूचे खेळ कौशल्य सुधारण्यापलीकडे जाऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठीच्या प्रयत्नांचे कौतुक करते. एसएफएने तळागाळात विकास घडवण्यासाठी हाती घेतलेली मोहीम आणि क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासाठी दिले जात असलेले योगदान खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. मला खात्री आहे, की इतर शहरांतील चॅम्पियनशीप्स आपल्या देशाला क्रीडा क्षेत्रातील दमदार गुणवत्ता मिळवून देतील.’
या चॅम्पियनशीपमध्ये २७० खेळप्रकारांत ४३०० पेक्षा जास्त सामने खेळले गेले व त्यातून तरुण खेळाडूंची गुणवत्ता आणि खिलाडी वृत्ती पाहायला मिळाली. पुण्यातील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या एकूण खेळाडूंमध्ये मुलींचे प्रमाण ३४ टक्के, तर मुलांचे प्रमाण ६६ टक्के होते. अथलेटिक्स आणि बास्केटबॉलमध्ये मुलींचे प्रमाण जास्त होते, तर मुलांनी फुटबॉल, बास्केटबॉल, बुद्धीबळ, पोहणे आणि अथलेटिक्सला पसंती दिली.
प्रत्येक खेळातील विजेत्यांची अंतिम यादी आणि प्रत्येक शाळेच्या कामगिरीचे तपशील www.sfaplay.com.
वर उपलब्ध आहेत.
एसएफए चॅम्पियनशीप, पुणे २०२३- २०२४ मधे क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शाळा
क्रमांक | शाळा | सुवर्ण | रौप्य | ब्राँझ | गुण |
1 | विद्या व्हॅली शाळा, सूस | 30 | 13 | 15 | 238 |
2 | सिटी प्राइड शाळा, निगडी | 16 | 17 | 9 | 158 |
3 | लॉयला हाय स्कूल, पाषाण | 13 | 6 | 11 | 146 |
4 | द बिशप्स को- एड स्कूल, उंड्री | 10 | 9 | 10 | 145 |
5 | द ऑर्किड्स स्कूल, बाणेर | 8 | 8 | 7 | 117 |
एसएफए चॅम्पियनशीपमधील सर्वात कुशल प्रशिक्षक – अशोक गुंजाळ
सर्वाधिक सहभाग : एड्युकॉन इंटरनॅशनल स्कूल, बाणेर – २९५ खेळाडू
एसएफए चॅम्पियनशीप २०२३- २०२४ मधील प्रत्येक क्रीडाप्रकारातील आघाडीच्या शाळा
क्रमांक | खेळ | शाळेचे नाव | गुण |
1 | तिरंदाजी | एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड | 18 |
2 | अथलेटिक्स | सिटी प्राइड स्कूल निगडी | 88 |
3 | बॅडमिंटन | एड्युकॉन इंटरनॅशनल स्कूल, बाणेर | 8 |
4 | बुद्धीबळ | 18 | |
5 | जिमनॅस्टिक | मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर | 22 |
6 | खो खो | 40 | |
7 | स्केटिंग | विबग्योर राइज स्कूल, पिंपळे सौदागर | 29 |
8 | स्पीडक्युबिंग | लॉयला हाय स्कूल पाषाण | 20 |
9 | पोहणे | इंडस इंटरनॅशनल स्कूल पुणे | 37 |
10 | कबड्डी | आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे आणिआर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी | 40 |
11 | कराटे | एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, रहाटणी | 53 |
12 | टेबल टेनिस | डीएव्ही पब्लिक स्कूल, पुणेऔंध | 13 |
13 | तायक्वांदो | विद्या व्हॅली स्कूल, सूस | 111 |
14 | टेनिस | द ऑर्किड्स स्कूल, बाणेर | 8 |
15 | थ्रोबॉल | सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा बुद्रुक | 65 |
16 | व्हॉलीबॉल | नालंदाज इंग्लिश मीडियम स्कूल, धायरी | 50 |