Home Blog Page 1185

सुनेत्रा पवार यांची पहिलीच प्रकट मुलाखत “नटरंग फेम”सोनाली कुलकर्णी घेणार

महाराष्ट्रातील दहा महिला पत्रकारांचा महागौरव पुरस्काराने सन्मान होणार

४ मार्चला डिजिटल मिडियाची बारामतीत राज्यस्तरीय कार्यशाळा

पुणे– डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सिध्दगिरी कणेरी मठ येथे झालेल्या ठरावानुसार राज्यातील पत्रकारांसाठी आयोजित येणाऱ्या कार्यशाळा मालिकेतील पहिली कार्यशाळा येत्या ४ मार्च रोजी बारामती येथे होत आहे.या कार्यशाळेच्या निमित्ताने होत असलेली सौ.सुनेत्रा अजित पवार यांची प्रकट मुलाखत विशेष औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.सौ.सुनेत्रा पवार यांची प्रथमच होत असलेली ही प्रकट मुलाखत नटरंग फेम ख्यातनाम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी घेणार आहे.
महिला दिन सप्ताहाच्या निमित्ताने संघटनेच्यावतीने राज्यातील दहा कर्तबगार महिला पत्रकारांचा महागौरव राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करुन सन्मान केला जाणार आहे.११ हजार रुपये व सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.कार्यशाळेत पत्रकारांची निवडणूक काळातील आचार संहिता, डिजिटल माध्यमाचे अर्थकारण व नवे प्रवाह, गुन्हेगारीच्या बातम्या आणि कायदा आदी विषयांवर तज्ज्ञ मान्यवर विचार मंथन करणार आहेत.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच संघटनेची राज्य कार्यकारिणी व सदस्य परिश्रम घेत आहेत.

१ ते ३ मार्च या कालावधीत ताडोबा महोत्सव

0

मुंबई : वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एकाच दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम प्रस्थापित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना १९५५ साली झाली.  ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. हा महोत्सव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध ठिकाणी होणार आहे. ताडोबा उत्सव शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. हा कार्यक्रम केवळ वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत नाही तर वन्यजीवांसोबत स्थानिक समुदायांची भूमिका देखील अधोरेखित करतो. पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही केवळ आमच्या मौल्यवान परिसंस्थांचेच रक्षण करत नाही तर आर्थिक वाढ आणि स्थानिक समुदाय सशक्तीकरणाच्या संधीही निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्यटनाला चालना देणे, औद्योगिक विकासाला चालना देणे या सर्व बाबी वन्यजीवांच्या अधिवासांचे संरक्षण सुनिश्चित करते, असे ते म्हणाले

या तीन दिवसीय महोत्सवात दररोज विविध वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सकाळी संवादात्मक सत्रे, दुपारी पॅनेल चर्चा आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

निसर्ग प्रश्नमंजुषा. पारंपरिक नृत्य सादरीकरण, लघुपट सादरीकरण आणि श्रेया घोषालचे गीत सादरीकरण उद्घाटनाच्या दिवशी असणार आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, फोटोग्राफी कार्यशाळा, चॅरिटी रन, चर्चासत्रे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. जगातील सर्वात जास्त वृक्षारोपण कार्यक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा या दिवशी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. रिकी केज सारख्या नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने आणि कवी संमेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची या उत्सवात रेलचेल राहणार आहे.

कार्यक्रमाच्या ३ ऱ्या दिवशी, सहभागींना ट्रेझर हंट स्पर्धा, सायक्लोथॉन, चित्रकला स्पर्धा, वन्यजीव प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सीएसआर कॉन्क्लेव्ह यासह विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी  यांच्या समूहाचा गंगा बॅले कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

ना शरद पवारांची स्क्रिप्ट ना माझा कोणताही संबंध! 1% दोषी आढळलो तरी राजकारण सोडेन:राजेश टोपे

मुंबई-मी दंगल घडवणारा माणूस आहे का?ना माझा हात ना शरद पवारांची स्क्रिप्ट,आमचा डीएनए सर्वधर्मसमभावाचा,समाज म्हणून मी मदत केली,जखमींना मदत करण्यासाठी गेलो एक टक्का जरी दोषी आढळलो तरी राजकारण संन्यास घेईन असे सांगत माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेले आरोप धादांत खोटे आणि राजकीय सूडबुद्धीने केले असल्याचा दावा केला आहे. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. मराठा समाजासाठी माणूसकी म्हणून मी काही मदत मी केली आहे. प्रक्षोभक असे काहीही केलेले नाही. माझा या प्रकरणी 1 टक्का दोष आढळला तरी माझी महाराष्ट्रातील जनता देईल ती शिक्षा भोगण्याची तयारी आहे. एवढेच नाही तर मी स्वतः राजकारणातून 100 टक्के संन्यास घेईन, असे राजेश टोपे म्हणाले.

सरकारने सर्व गोष्टींची चौकशी करावी. माझी कोणतीही हरकत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वजण एकजूट आहेत. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की, या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले पाहिजे. आम्ही या प्रकरणी प्रक्षोभक असे कोणतेही कृत्य केले नाही, आमचा डीएनए हा सर्वधर्मसमभावाचा आहे, असे ही राजेश टोपे म्हणाले.

राजेश टोपे म्हणाले की, समाजबांधव जेव्हा आंतरवाली सराटी येथे जातात. त्या ठिकाणी समाज बांधवांप्रती असलेले प्रेम म्हणून स्टॉल लावणे, नाश्ताची मदत करणे अन्य स्टॉल लावणे हे माणूस म्हणून मी काम केले आहे. सर्व समाजासाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे. एवढंच नव्हे राजेश टोपेंना जो मतदार संघ ओळखतो. मुळात आमचा डीएनए हा सर्वधर्मसमभाव म्हणून काम करणारा आहे. मी ज्या पक्षात आहे, त्या पक्षाचा धर्म काय सांगतो किंवा संस्कार देखील तोच सांगतो. शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने आम्ही काम करणारे आहोत.राजेश टोपे म्हणाले की, विधानपरिषदेत माझ्यावर जो काही संशय व आरोप करण्यात आले. तो बिनबुडाचे आरोप आहे. त्यात कुठलाही अर्थ नाही. त्याला राजकारणाच्या दृष्टीने वळवण्याचे काम कोणीही करू नये, एव्हाना त्यात राजकारण करण्याची गरज नाही.माझ्यावर आरोप कुठलीच सत्यता नाही. राजेश टोपे जे ओळखतात. दंगल घडवणारा, दगड फेक करणारा माणूस आहे का, मला जे म्हणायचे आहे की, एसआयटी नेमायची गरज आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आम्ही देखील सामोरे गेलो आहे. सबुरीने आंदोलन घ्यावे लागले. अनेकदा मी अधिकाऱ्यांना देखील संयमाने घेतले पाहिजे, अशी विनंती केली आहे.राजेश टोपे म्हणाले की, लाठीचार्ज झाला पण ज्यांना लागलं होत त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो. लोकप्रतिनिधी म्हणून मी काळजीपोटी त्या ठिकाणी गेलो होतो. काहीतरी संशय निर्माण करणे हे चुकीचे आहे. या चौकशाला मी सामोरे जाईल. माझी काम करण्याची पद्धत आहे ती जनतेला माहित आहे. मुंगी मारलेली नाही अशी संवेदनशील माणसं आहोत. काय अडचण असतील त्या चौकशीतून बाहेर पडेल. पाच किमी अंतरावर माझा कारखाना आहे. त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी जायचे आहे.

मुख्यमंत्री देखील भेटायला आले तेव्हा त्यांचे हेलिकॉप्टर देखील कारखान्याच्या जागेवर उतरवले गेले. ऐकूव गोष्टींवर राजकारण करू नये, राजकारण म्हणून खोट्या नाट्या गोष्टी करणे हे सर्व पक्षीय लोक आहेत. शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादीचे लोक असतात. लोक समाज म्हणून लोक जातात. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जात नाही. सर्व रेकॉर्ड निश्चित लक्षात आणून देवो. प्रक्षोभक म्हणून काहीही केले असेल तर मी कधीही केलेले नाही मी करणार नाही. एक टक्का जर दोषी असलो तरी मी राजकारणातून सन्याशी घेईल, असेही राजेश टोपे म्हणाले.

राजेश टोपे म्हणाले की, यात कोणाचाही समावेश नाही. ना शरद पवारांची स्क्रिप्ट आहे. ना माझा कुठलाही समावेश. माझा संबंध फक्त समाजाला मदत म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो आहे, त्याची चौकशी झाली तरी मी प्रत्येक गोष्टीला सामोरे जाईल, असेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणूक : राज्यभरातील १२९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील १२९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना व निर्देशांनुसार या बदल्यांचे आदेश अतिरिक्त पोलीस महासंचालक (अस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी काढले आहेत. यामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील ४० तर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील १३ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.

पुणे शहर

दत्तात्रय विश्वनाथ भापकर (पुणे शहर ते ठाणे शहर), विनायक दौलतराव गायकवाड (पुणे शहर ते ठाणे शहर), किरण बाळासाहेब बालवडकर (पुणे शहर ते ठाणे शहर), निलीमा नितीन पवार (पुणे शहर ते ठाणे शहर), सुनिल काशिनाथ झावरे (पुणे शहर ते ठाणे शहर), अरविंद खंडेराव माने (पुणे शहर ते सोलापूर शहर), जयराम दशरथ पायगुंडे (पुणे शहर ते नाशिक शहर), सविता भगवाण ढमढरे (पुणे शहर ते ठाणे शहर), दादा सोमनाथ गायकवाड (पुणे शहर ते सोलापूर शहर), विजय भानुदासस खोमणे (पुणे शहर ते सोलापूर शहर), प्रमोद रोहिदास वाघमारे (पुणे शहर ते सोलापूर शहर), भालचंद्र सुभाष ढवळे (पुणे शहर ते सोलापूर शहर), जयदिप प्रकाश गायकवाड (पुणे शहर ते मुंबई शहर), संदिप शांताराम शिवले (पुणे शहर ते ठाणे शहर), विश्वास तुळशिराम इंगळे (पुणे शहर ते ठाणे शहर), विजय रघुनाथ पुराणिक (पुणे शहर ते ठाणे शहर), अनिता रामचंद्र हिवरकर (पुणे शहर ते ठाणे शहर), विष्णू नाथा ताम्हाणे (पुणे शहर ते ठाणे शहर), राजेंद्र शावरसिद्ध लांडगे (पुणे शहर ते ठाणे शहर), संदिप पांडूरंग भोसले (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर), दादासाहेब बाबुराव चुडाप्पा (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर), सुनिल बाबुराव माने (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर), हेमंत चंद्रकांत पाटील (पुणे शहर ते ठाणे शहर), सुनिल पांडुरंग जैतापुरकर (पुणे शहर ते ठाणे शहर), अभय चंद्रनाथ महाजन (पुणे शहर ते ठाणे शहर), राजेंद्र विठ्ठलराव सहाणे (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर), बालाजी अंगदराव पांढरे (पुणे शहर ते ठाणे शहर), सुरज बंडु बंडगर (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर), मंगेश नंदकुमार जगताप (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर), संगिता तुळशीदास पाटील (पुणे शहर ते सोलापूर शहर), प्रियांका महेश शेळके (पुणे शहर ते ठाणे शहर), शबनम निजाम शेख (पुणे शहर ते सोलापूर शहर), जयवंत राघवेंद्रराव राजुरकर (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर), अंकुश भालचंद्र चिंतामण (पुणे शहर ते नाशिक शहर), जगन्नाथ आनंदराव जानकर (पुणे शहर ते नाशिक शहर), संगिता सुशिल माळी (पुणे शहर ते ठाणे शहर), संजय नागोराव मोगले (पुणे शहर ते गडचिरोली), सोमनाथ दत्तात्रय जाधव (पुणे शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर), विक्रम रामसिंग गौड (पुणे शहर ते ठाणे शहर), सुरजसिंग रामसिंग गौड (पुणे शहर ते ठाणे शहर), स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (पुणे शहर ते ठाणे शहर)

पिंपरी चिंचवड शहर

गणेश संभाजीराव जवादवाड (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर), कृष्णदेव कल्पणा खराडे (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर), अमरनाथ रामचंद्र वाघमोडे (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर), शंकर वामनराव अवताडे (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर), संजय देवदत्त तुंगार (पिंपरी चिंचवड शहर ते महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक), अशोक आनंदराव कदम (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर), राम सिद्राम राजमाने (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर), वसंतराव दादासो बाबर (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर), श्रीराम बळीराम पोळ (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर), राजेंद्र जयवंत निकाळजे (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर), बडेसाब ईलाई नाईकवाडी (पिंपरी चिंचवड शहर ते नाशिक शहर), संतोष महादेव कसबे (पिंपरी चिंचवड शहर ते छत्रपती संभाजीनगर शहर), रमेश जानबा पाटील (पिंपरी चिंचवड शहर ते ठाणे शहर)

मित्राची निर्घृण हत्या तर केली कहर म्हणजे हत्येचा व्हिडिओ स्टेटसवरही ठेवला;अल्पवयीन मुलांचे कारस्थान

पुणे- चाकण परिसरात अल्पवयीन मुलांनी आपल्या एका मित्राची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. कहर म्हणजे या आरोपी मुलांनी आपल्या मित्राची हत्याच केली नाही, तर त्याच्या हत्येचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टेटसवरही ठेवला. यामुळे अवघे पुणे हादरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. मृत अल्पवयीन मुलगा आपल्या 2 मित्रांसह मद्यपान करत होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ गोष्टीवरून वाद सुरू झाला. त्यात मृत मुलाने आपल्या मित्राच्या कानशिलात हाणली. हे पाहून मुख्य आरोपी संतापला. त्याने थेट मृताच्या डोक्यात दगड घातला. यात तो जागीच गतप्राण झाला. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतले आहे. मृत अल्पवयीन मुलावर 4 महिन्यांपूर्वीच खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. तर हत्या करणाऱ्यांपैकी एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल होता.आरोपी 2 अल्पवयीन मुलांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. त्यात मुख्य आरोपी मृतकाच्या डोक्यात दगड घालताना दिसून येत आहे. आरोपींनी हा व्हिडिओ आपल्या इन्स्टा अकाउंटवर ठेवला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओच्या आधारावर चाकण पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला तर उपमुख्यमंत्री यांची तिरडी केली:डेक्कन आणि लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल

टिळक रोडच्या दलित शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यासह अनेकांवर गुन्हा दाखल

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी मंगळवारी दिली. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांत काँग्रेस कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ बंटी बाबा शेळके, प्रथमेश विकास आबनावे, एहसान अहमद खान, मुरलीधर सिद्धाराम बुधरामस, राहुल दुर्योधन शिरसाट यांचा समावेश आहे.यातील आबनावे टिळक रस्त्यावरील एका दलित शिक्षण संस्थेचा पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येते .तर लोणीकंद परिसरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिरडी करून जमाव जमवून आंदोलन केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शिवाजीनगर भागातील काँग्रेस भवन येथे सोमवारी सायंकाळी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दिल्ली – हरयाणा सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात एका शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सोमवारी सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकात एकत्रित जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पंतप्रधान यांच्या निषेध घोषणा देत, पंतप्रधानांचा पुतळा पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे बंदोबस्तास असलेले डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत यांनी त्यांना रोखले. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना डेक्कन पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

लोणीकंद परिसरात लोहगाव वाघोली रोड पाचारणे समाज मंदिर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिरडी करून जमाव जमवून आंदोलन केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शनी शिगांरे ( रा.वाघोली, पुणे, योगेश बरडे, ( रा. वाघोली), ओंकार तुपे, (रा. वाघोली पुणे), ज्योती सातव (रा. वाघोली ,पुणे ) व इतर 35 ते 40 अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस शिपाई शंकर महादू क्षिरसागर यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल आहे. आरोपी यांनीलोहगाव वाघोली रोड पाचारणे समाज मंदिर येथे 25 फेब्रुवारी रोजी गैरकायद्याचा जमाव जमवला. पोलिस उपआयुक्त पुणे शहर यांचे कार्यालयीन आदेशानुसार 14 दिवसाकरीता कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे, पुढा-याच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आदेशपूर्ण भाषणे करणे, व परिसरात कायदा व सव्यवस्था धोक्यात यईल अशा पध्दतीने वर्तन करण्यास बंदी आहे. असे असताना देखील सदर आदेश जारी केलेला असताना सदर आदेशाचे उल्लघंन व भंग केल्याने आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोयना (शिव सागर) येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबईदि. २७ :  सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे  येथे शिव सागर जलाशयामध्ये जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्यासाठी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे सामंजस्य करार झाला.

यावेळी  उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी -शर्मा, जलसंपदा विभागाचे उपसचिव अतुल कपोले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सल्लागार सारंग कुलकर्णी उपस्थित होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ५ हजारपेक्षा अधिक स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल आणि पर्यटनातून १०० कोटीपेक्षा अधिक  आर्थिक उलाढाल होईल. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नैसर्गिक वरदान लाभलेला परिसर

शिवसागर जलाशयात जल पर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. कोयना (शिव सागर), ता. जावळी हा परिसर येथील सह्याद्री डोंगराच्या रांगा, गर्द झाडी, निळेशार पाणी, समृद्ध जैवविविधतेचे आगर असलेला, नैसर्गिक वरदान लाभलेला परिसर आहे. नव्याने होणाऱ्या जलपर्यटन केंद्राच्या  माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा, या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने हे जल पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या  प्रकल्पासाठी  ४५ कोटी ३८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

महाराष्ट्राला मोहक ७२० किमीचा सागरी किनारा तसेच निसर्गसंपन्न छोटी – मोठी जलाशये, धरणे, प्रदूषण मुक्त नद्या यांचे वैभव लाभलेले आहे. या ठिकाणी जल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यास आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मोठा वाव आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूबा डायव्हिंग प्रकल्पामुळे सिंधुदुर्गात पर्यटक मोठ्या प्रमाणत आकर्षित झाले. नाशिक बोट क्लबचे प्रचलन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ करीत आहे. बोट क्लब पर्यटकांमध्ये लोकप्रिय झालेले आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे आणि गुजरातमधून नाशिकला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला. हा अनुभव बघता शासनाने महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण आणि जागतिक दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पामुळे महाबळेश्वर, पाचगणी, वाईला येणारा पर्यटक कोयना जलाशयाच्या अवतीभोवती असलेल्या ग्रामीण भागात वळेल, तसेच पर्यटकांचा साताऱ्यात राहण्याचा काळ आणि खर्च करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था वाढीस लागून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात शाश्वत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

देशातील पहिले नाविन्यपूर्ण गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग

या प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी विविध पायाभूत सुविधा आणि जल पर्यटन प्रकार असतील. भव्य पॅव्हेलियन, कॉन्फरन्स हॉल, जलतरण तलाव, भारतातील पहिले नाविन्यपूर्ण गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग, जलसफर मध्ये पर्यटन प्रकल्पात मोठी क्रुझ बोट ज्यामध्ये १०० च्या वर पर्यटक बसून, नाश्ता आणि जेवण याबरोबर कोयना जलाशयाच्या अवतीभोवतीच्या सह्याद्री पर्वत रांगा, हरित जंगले, वन्य जीव याचा आनंद घेऊ शकतात, भारतातील पहिली अत्याधुनिक आणि अलिशान हाउस बोट, सौर उर्जा/बॅटरीवर चालणारी बोट, अत्याधुनिक प्रवासी बोटी, हवेत उडणारी बोट, अत्यंत वेगवान जेट बोट, पॅरासेलिंग बोट, गोड्या पाण्यात पहिल्यांदा सेलिंग यॉट (शिडाची नौका) आणि त्याशिवाय आकर्षक वॉटर स्पोर्टस असतील. अशाप्रकारच्या जल पर्यटनाची आकर्षणे तसेच पायाभूत सुविधा असलेला हा भारतातील पहिला जल पर्यटन प्रकल्प असेल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुढील १० दिवसामध्ये प्राथमिक जल पर्यटन सुरु करण्यात येईल. दुसऱ्या टप्यात (८ महिन्यात) नवीन बोटी आणि इतर जल पर्यटन आकर्षणे यांचा अंतर्भाव करण्यात येईल. तिसरा आणि अंतिम टप्यात (२० महिन्यात) संपूर्ण नवीन भव्य वास्तू, क्रुझ बोट, हाउस बोट यांचा अंतर्भाव करून प्रकल्प पूर्ण केला जाईल.

प्रकल्पात पायाभूत सुविधा आणि विविध जलपर्यटन प्रकार

प्रकल्पातील पायाभूत सुविधांमध्ये नाविन्यपूर्ण जल पर्यटन केंद्र, पर्यटकांसाठी भव्य आसन व्यवस्था, विविध प्रकारच्या खाद्य प्रकारांचे उच्च दर्जाचे उपहारगृह, पर्यटकांसाठी विविध सुविधा व प्रशासकीय कार्यालय, जलतरण तलाव, स्कूबा प्रशिक्षण तलाव, कॉन्फरस हॉल, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय, बोटींसाठी आणि पर्यटकांसाठी उतरंडी, तरंगती जेट्टी (मरीना), वाहनतळ,आकर्षक बगीचा असतील.

यामध्ये विविध जल पर्यटन प्रकार जेट स्की, जेटो व्हेटर (पाण्यात उडणे), बम्पर राईड, कयाकिंग, बनाना राईड, सेलिंग, नाविन्यपूर्ण कृत्रिम तलावात गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग, हवेत उडणारी बोट, फ्लाईंग फिश, अतिवेगवान जेट बोट राईड, सौर/विद्युत बोट, पर्यटकांसाठी आरामदायी प्रवाशी बोट, व्हर्ल पूल राईड, पॅरासेलिंग, अलिशान लेक क्रूझिंग प्रवासी बोट, अलिशान वेगवान बोट, मरीना, भारतातील पहिली अत्याधुनिक, अलिशान हाउस बोट असे विविध नाविन्यपूर्ण जलपर्यटन प्रकार असतील.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची संरक्षण रक्कम दीडवरून पाच लाखापर्यंत

0

औंधमध्ये एम्स सुरु करण्यात येणार

अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंक्पात औंध येथे एम्स सुरु करण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. तसेच लातूर, जळगाव, बारामती, नंदुरबार, गोंदिया, कोल्हापूर, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची शासकीय परिचर्या महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई-महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातल्या सर्व कुटुंबांना मिळणार असून त्यासाठी वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब दीड लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या माध्यमातून राज्यातील नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या माध्यमातून त्यांनी राज्यातील नागरिकांना विमा संरक्षणाचे कवच दिले आहे.

या बरोबरच अजित पवार यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. या योजनेत 8 लाख 50 हजार नवे सौर कृषीपंप बसवणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आर्टी म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य आता 1 हजार रुपयांवरून दीड हजार केले. उसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना सुरू करणार असल्याचेही अजित पवार म्हणाले. गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळामार्फत योजना लागू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. जालना, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक, ठाण्यातील अंबरनाथ येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

जरांगेंनी मागितली शिंदे, फडणवीस यांची माफी

मुंबई-मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून राजकारण ढवळून काढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या संबधात जर असे मी बोललो असेत तर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागत आहे. मी आई – बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझे शब्द मागे घेतो, असे ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे जरांगे सरकारविरोधात सपशेल बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, मी शिवीगाळ केली नाही. ते आमरण उपोषण होते. झाला प्रकार अनावधानाने झाला. मी आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नाहीत. पण त्यांनी विधान भवनाच्या पटलावर मी असे बोलल्याचा दावा केला असेल, तर मी माझे शब्द मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो.

मनोज जरांगे यांनी आपल्या आमरण उपोषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आई-बहिणीवरून अपशब्द वापरले असे सांगितले गेले आणि या शब्दांचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. सरकारनेही या प्रकरणी कठोर भूमिका घेतली होती. परिणामी, मनोज जरांगे यांनी मंगळवारी एक पाऊल मागे घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली आहे.

आमच्यासाठी आई – बहिणींहून काहीच मोठे नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालवणारे आहोत. त्यामुळे आमच्या तोंडातून आई-बहिणीविषयी चुकीचे शब्द गेले असतील तर मी 100 टक्के शब्द मागे घेतो व दिलगिरी व्यक्त करतो, असे जरांगे म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या मुंबई स्थित सागर बंगल्यावर धडक देण्याचा निर्धार केला होता. पण सरकारने कठोर भूमिका घेतल्यानंतर ते अर्ध्या रस्त्यातूनच माघारी परतले.

मनोज जरांगे यांच्या विधानाचे मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातही तीव्र पडसाद उमटले. सत्ताधारी आमदारांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करत मनोज जरांगे यांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली आहे.

मराठी राजभाषा दिन साजरा

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यात आला. अक्षर सुलेखन मार्गदर्शन वर्ग, कुमार साहित्य मेळावा, नाविन्यपूर्ण भाषिक खेळ, चला वाचक वीर होऊया आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. म्हणी ओळखा, शब्द साखळी, घोषवाक्य निर्मिती, कविता पूर्ण करा या स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्यध्यापिका मनिषा मिनोचा यांनी मार्गदर्शन केले.

अहिल्यादेवी शाळेत एक हजार विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर पत्र लिहिण्याचा उपक्रम केला. विद्यार्थीनींनी कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रे लिहिली. मुख्याध्यापिका अनघा डांगे यांनी मार्गदर्शन केले.

मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात ज्येष्ठ लेखक राजीव तांबे यांचे व्याख्यान झाले. 

पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटी.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर

0
  • शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी
  • राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी
  • पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक, नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांवर भर

मुंबई, दि. २७:  राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपये महसुली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट ९ हजार ७३४ कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट ९९  हजार २८८ कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास ९  हजार १९३ कोटी रुपये, रोजगार हमी योजनेसाठी २  हजार २०५ कोटी रुपये, मराठी विभागासाठी ७१ कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १८ हजार १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची वार्षिक योजना १ लाख ९२ हजार कोटी रुपयांची आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १५ हजार ८९३ कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजनेसाठी १५ हजार ३६० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे. अंतरिम अर्थसंकल्पातही अर्थमंत्री अजित पवार यांनी शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य दिले आहे.

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या दिशादर्शक अहवालानुसार आवश्यक धोरणांची अंमलबजावणीही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक, नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांच्या अंमलबजावणीचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून केला आहे.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-

 मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय.

 युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी.

 स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत, विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत.

 विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरीता भूसंपादनासाठी 22 हजार 225 कोटी.

 पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटी.

 जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी 2 हजार 886 कोटी रुपये.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागाला 10 हजार 629 कोटी रुपये.

 सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाला 19 हजार 936 कोटी रुपये नियतव्यय.

 महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-2 अंतर्गत 7 हजार 500 किलोमीटर रस्त्यांची कामे.

 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा 2 मधील 7 हजार 600 कोटी रुपये खर्चून 7 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती.

 कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु.

 फलटण-पंढरपूर, कांपा-चिमूर-वरोरा, जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग.

 जालना-खामगाव, आदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका 3 व 4 या रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग.

 वाढवण बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा 26 टक्के सहभाग- एकूण किंमत 76 हजार 220 कोटी रुपये.

 सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब सुसज्ज जेट्टीचे, 229 कोटी 27 लाख रुपये किंमतीचे बांधकाम.

 भगवती बंदर, रत्नागिरी-३०० कोटी रुपये, सागरी दुर्ग जंजिरा, रायगड-१११ कोटी रुपये, एलिफंटा, मुंबई-८८ कोटी रुपये बंदर विकासाची कामे.

 मिरकरवाडा, रत्नागिरी बंदराचे आधुनिकीकरण-२ हजार ७०० मच्छीमारांना फायदा.

 छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी 578 कोटी 45 लाख रुपयांचा निधी.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ग्रामविकास विभागाला 9 हजार 280 कोटी रुपये.

 गृह-परिवहन, बंदरे विभागाला 4 हजार 94 कोटी रुपये.

 उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सुधारित औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण उत्पादनाचे सुधारित धोरण तसेच नवीन सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम धोरण.

 18 लघु-वस्त्रोद्योग संकुले स्थापन करुन सुमारे 36 हजार रोजगार निर्मिती.

 ‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८’ जाहीर-अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबास एका साडीचे मोफत वाटप.

 निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात 450 कोटी.

 निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी ४०० कोटी रुपये.

 निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रीयल पार्क.

 सामूहिक प्रोत्साहन योजनेतून आगामी वर्षात सुमारे 7 हजार कोटी रकमेचा प्रोत्साहन निधी.

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 25 हजार उद्योग घटक -30 टक्के महिला उद्योजक -सुमारे 50 हजार नवीन रोजगार.

 थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक व चार हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या 10 अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा- 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 20 हजार रोजगार निर्मिती.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता उद्योग विभागाला 1 हजार 21 कोटी रुपये.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाला 1 हजार 952 कोटी रुपये.

 अमृत 2.0 अभियानांतर्गत 145 शहरांमधील 28 हजार 315 कोटीचे 312 प्रकल्प मंजूर.

 महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन 2030 पर्यंत राबविण्यात येणार.

 महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या 50 ते 95 टक्के निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला 3 हजार 875 कोटी रुपये नियतव्यय.

 दरवर्षी सुमारे 25 हजार किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड.

 अटल बांबू समृद्धी योजना- १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड

 जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 700 गावांमधील 1 लाख 59 हजार 886 कामांना मंजूरी

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला 245 कोटी रुपये

 वन विभागास २ हजार ५०७ कोटी रुपये

 मृद व जलसंधारण विभागास ४ हजार २४७ कोटी रुपये

 शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेअंतर्गत 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट.

 शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौरकृषी पंप’ ही नवीन योजना- ८ लाख ५० हजार नवीन सौरकृषी पंप.

 राज्यात सर्व उपसा सिंचन योजनांचे येत्या २  वर्षात सौर उर्जीकरण.

 सुमारे 37 हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच.

 डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत १ लाख शेतकऱ्यांना सौर उर्जा कुंपणासाठी अनुदान

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ऊर्जा विभागाला 11 हजार 934 कोटी रुपये.

 ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 691 कोटी 47 लाख रुपये.

 नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या 6 हजार कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता कृषी विभागास 3 हजार 650 कोटी रुपये, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागास 555 कोटी रुपये फलोत्पादन विभागास 708 कोटी रुपये नियतव्यय.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता मदत व पुर्नवसन विभागाला 638 कोटी रुपये नियतव्यय.

 39 सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करुन 2 लाख 34 हजार हेक्टर सिंचन क्षमता स्थापित करणार.

 बळीराजा जलसंजीवनी योजनेत 46 प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च 2025 पर्यंत आणखी 16 प्रकल्प पूर्ण होणार.

 कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक सहाय्यित 3 हजार 200 कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प.

 विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद.

 वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे 3.71 लक्ष हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ.

 सुयोग्य जागेची आणि पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन वीज निर्मितीचे खाजगी सहभागातून उदंचन जलविद्युत प्रकल्प.

 खारभूमी विकास कार्यक्रमांतर्गत 113 कोटी रुपयांची तरतूद.

 सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता जलसंपदा विभागाला 16 हजार 456 कोटी रुपये नियतव्यय.

 मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1 लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ.

 राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु.

 कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरु.

 दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा.

 कार्यक्रम खर्चाकरिता महिला व बालविकास विभागास 3 हजार 107 कोटी रुपये.

 वाशिम,जालना,हिंगोली,अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक तसेच ठाणे जिल्ह्यांतील अंबरनाथ येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय.

 जळगाव, लातूर, बारामती, नंदूरबार, गोंदिया, कोल्हापूर आणि मिरज जिल्हा सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय.

 नागपूर एम्सच्या धर्तीवर औंध, पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था.

 ऊसतोड कामगारांकरिता अपघात विमा योजना.

 सर्व जिल्ह्यांमध्‍ये 15 खाटांचे अद्ययावत डे- केअर केमोथेरपी सेंटर.

 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांत डायलिसीस सेवा केंद्र.

 रुग्ण मृत्यू पावल्यास मृतदेह रुग्णालयातून नेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका.

 कार्यक्रम खर्चाकरिता वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास 2 हजार 574 कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य विभागास 3 हजार 827 कोटी रुपये नियतव्यय.

 स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजना, तृतीयपंथी घटकांतील लाभार्थ्यांसाठी बीजभांडवल योजना, मातंग समाजासाठी रमाई आवास योजना इत्यादी योजनांसाठी पुरेसा निधी.

 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे ‘लेदर पार्क’, कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र ,प्रत्येक महसुली विभागात ‘उत्कृष्टता केंद्रांची’ स्थापना, गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्रा’ची उभारणी.

 मातंग समाजासाठी ‘अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था- आर्टी’ची स्थापना.

 कार्यक्रम खर्चाकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास 18 हजार 816 कोटी रुपये.

 कार्यक्रम खर्चाकरिता आदिवासी उपयोजनेकरिता 15 हजार 360 कोटी रुपये नियतव्यय.

 बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ’.

 मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फतचे मुदत कर्ज, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज आणि सुक्ष्म पतपुरवठा योजनेकरिता शासनाची हमी 30 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपये

 दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर -नवीन घरकुल योजना – 34 हजार 400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ.

 श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तही ‘आनंदाचा शिधा’ वाटप करणार.

 कार्यक्रम खर्चाकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि अल्पसंख्याक विकास विभागाला 5 हजार 180 कोटी रुपये, गृहनिर्माण विभागाला 1 हजार 347 कोटी रुपये, कामगार विभागाला 171 कोटी रुपये नियतव्यय.

 ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेअंतर्गत राज्यस्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा.

 नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा.

 कार्यक्रम खर्चाकरिता क्रीडा विभागाला 537 कोटी रुपये नियतव्यय.

 ‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ साठी 5 वर्षासाठी 238 कोटी 63 लाख रुपये.

 वरळी, मुंबई येथे ‘आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास भवन’.

 कार्यक्रम खर्चाकरिता उच्च व तंत्र शिक्षण विभागाला 2 हजार 98 कोटी रुपये, शालेय शिक्षण विभागाला 2 हजार 959 कोटी रुपये नियतव्यय.

 जागतिक बँक सहाय्यित ‘मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्याचा विकास’ (दक्ष) या 2 हजार 307 कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजूरी.

 राज्यात नवीन 2 हजार ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे’.

 प्रत्येक महसुली विभागामध्ये ‘आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र’ आणि ‘संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी’.

 कार्यक्रम खर्चाकरिता कौशल्य,नाविन्यता,रोजगार व उद्योजकता विकास विभागाला 807 कोटी रुपये नियतव्यय.

 कोकण विभागातील पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गडकिल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन.

 पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण.

 50 नवीन पर्यटन स्थळांच्या ठिकाणी थीम पार्क, ॲडव्हेंचर स्पोर्टस्, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवास व्यवस्था.

 शिवसागर- कोयना जिल्हा सातारा, गोसीखुर्द जलाशय, जिल्हा भंडारा तसेच वाघुर जलाशय, जिल्हा जळगाव येथे नाविन्यपूर्ण जल पर्यटन प्रकल्प.

 लोणार, जिल्हा बुलढाणा, अजिंठा-वेरुळ, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, कळसुबाई – भंडारदरा, जिल्हा अहमदनगर, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक तसेच कोकणातील सागरी किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा.

 लोणावळा, जिल्हा पुणे येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प- 333 कोटी 56 लाख किंमत.

 श्रीनगर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन – 77 कोटी रुपयांची तरतूद

 महाविस्टा-मंत्रालय, परिसरातील शासकीय इमारती आणि त्यांच्या परिसराचा अत्याधुनिक सुविधांसह पुनर्विकास.

 कार्यक्रम खर्चाकरिता सांस्कृतिक कार्य विभागाला 1 हजार 186 कोटी रुपये, पर्यटन विभागाला 1 हजार 973 कोटी रुपये नियतव्यय, सार्वजनिक बांधकाम (इमारती) विभागास 1 हजार 367 कोटी रुपये, महसूल विभागास 474 कोटी रुपये.

 कार्यक्रम खर्चाकरिता गृह (पोलिस) विभागाला 2 हजार 237 कोटी रुपये नियतव्यय, गृह (उत्पादन शुल्क) विभागास 153 कोटी रुपये आणि विधी व न्याय विभागास 759 कोटी रुपये नियतव्यय.

 वस्तु व सेवाकर विभागाची पुनर्रचना- कर प्रशिक्षण अकादमीची स्थापना.

 कार्यक्रम खर्चाकरिता वित्त विभागाला 208 कोटी रुपये नियतव्यय.

 स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, ता. हवेली व समाधी स्थळ वढू बुद्रुक तालुका शिरुर, जिल्हा पुणे येथील स्मारक- 270 कोटी रुपये किमतीचा आराखडा, काम सुरु.

 12 ज्योर्तिलिंगापैकी एक औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली,साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री क्षेत्र माहुरगड जिल्हा नांदेड, एकविरादेवी मंदिर जिल्हा पुणे तिर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तृतीय जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम – 20 कोटी रुपये निधी.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिरे, बारवांचे जतन व संवर्धन योजनेसाठी 53 कोटी रुपये.

 धाराशीव जिल्ह्यात संत गोरोबाकाका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन व निधी.

 प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘वीर जीवा महाला’ यांच्या स्मारकासाठी जागा.

 संगमवाडी, पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक.

 अमळनेर, जिल्हा जळगाव येथे सानेगुरुजींचे स्मारक.

 हुतात्मा श्री शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकासासाठी 102 कोटी 48 लाख रुपयांचा आराखडा.

 श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड, ता. कळवण स्थळाच्या 81 कोटी 86 लाख रुपयाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता.

 ‘मंगेश पाडगांवकर कवितेचे गाव’ उपक्रम- वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग.

 कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास 9 हजार 193 कोटी रुपये, रोहयो प्रभागासाठी 2 हजार 205 कोटी रुपये, मराठी विभागास 71 कोटी रुपये नियतव्यय.

 सन २०२4-२5 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 18 हजार 165 कोटी रुपयांची तरतूद.

 वार्षिक योजना एक लाख 92 हजार कोटी रुपये, अनुसुचीत जाती उपयोजना 15 हजार 893 कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजना 15 हजार 360 कोटी रुपये.

 सन 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटींची तरतूद.

 सन 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये व महसुली खर्च 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये, महसुली तूट- 9 हजार 734 कोटी रुपये, राजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपये.

०००

महाराष्ट्राची १ ट्रीलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पुढे जाणारा हा अर्थसंकल्प 

0

मुंबई दि. २७: राज्यातील विकास कामांसाठी पुढील ४ महिन्यांत लागणाऱ्या आवश्यक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून केली जाणार असली तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल, हे दर्शविणारा हा अर्थसंकल्प आहे. यात दुर्बल घटक, शेतकरी, महिला, युवा अशा सर्वांचा विचार करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राची १ ट्रीलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पुढे जाणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही ते म्हणाले.

अयोध्या आणि जम्मू कश्मीर येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय आणि त्यासाठी ७७ कोटींची तरतूद ही देखील उत्साह वाढविणारी आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून दुष्काळासाठी देखील सवलती देण्यात येत आहेत. जलसंपदा विभागासाठी देखील चांगली तरतूद केल्याने धरणांच्या कामांना गती येईल. पर्यटन, शेती, पायाभूत सुविधा, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी भरीव तरतूद केल्याने राज्यात ही कामे अधिक वेगाने सुरु होतील. राज्यातील रेल्वे मार्गांच्या कामांना देखील यात प्राधान्य दिले आहे. १५ हजार कोटींची तरतूद यापूर्वीच केंद्राने केली आहे. विविध दुर्बल घटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या महामंडळांना निधी दिल्याने त्यांचे कामही परिणामकारक होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विविध स्मारके आणि पर्यटन स्थळांच्या विकास कामांना देखील गती येण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, बाहेरच्या राज्यातल्या मराठी मंडळांना विशेष अनुदान देणे, बेळगाव आणि गोवा येथे मराठी भाषा उपकेंद्र उभारण्याचा निर्णय, राज्यातील विविध देवस्थाने, तीर्थस्थळे,गडकोट किल्ले यांचे संवर्धन व विकास हा देखील विशेष प्राधिकरणाच्या माध्यमातून करणे हे महत्त्वाचे निर्णय आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ होणार आहे. कुपोषण कमी करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय देखील महत्वाचा आहे. महिला सशक्तीकरणाचा भाग म्हणून १० मोठ्या शहरातील ५ हजार महिलांना पिंक रिक्षा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे सक्षमीकरण होईल. आशा, अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील सुरु होत आहे. मातंग समाजासाठी आर्टी (अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था) स्थापन करण्याचा निर्णय या समाजासाठी कल्याणकारी आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एसबीआय बँकेंचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणा-या विक्रमलाल इंद्रलाल शहाला पोलिसांनी पकडले

पुणे- चोरी करण्यासाठी एसबीआय बँकेंचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणा-या विक्रमलाल इंद्रलाल शहाला पुणे पोलिसांनी पकडले आहे. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.२६/०२/२०२४ रोजी एसबीआय नियंत्रण कक्ष येथून हडपसर पोलीस स्टेशन येथे कॉल प्राप्त झाला की, हांडेवाडी हडपसर पुणे येथील एसबीआय एटीएम मध्ये कोणीतरी अज्ञात इसम कोणत्या तरी हत्याराने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असुन त्याच्या हालचाली संशयीत असल्याचे कळविले होते.
प्राप्त झालेल्या कॉलचे गांभिर्य लक्षात घेवून रात्रगस्त अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडीत रेजितवाड, हडपसर पोलीस ठाणेकडील मार्शल व तपासपथक अंमलदार असे कॉलचे ठिकाणी रवाना झाले. पोलीस स्टेशनकडील स्टाफ घटनास्थळ जवळ गेले असता एक इसम एटीएम मधुन बाहेर पडून बाजुला असलेल्या अंधारामध्ये पळून जात असताना दिसला. पोलीस पथकाने पाठलाग करुन त्यास लाकडी दांडयाच्या टिकावासह ताब्यात घेतले. संशयीतास नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव विक्रमलाल इंद्रलाल शहा, वय २८ वर्षे, रा. सध्या जगताप चौक, रहाटणी रोड, पिंपळे सौदागर, पुणे. मुळगाव- भटगाव, तेहरी ग-हाल उत्तराखंड असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे अधिक तपास केला असता, त्याने त्याचे ताब्यात मिळून आलेले टिकावाने एसबीआय एटीएम फोडुन त्यामधील पैसे चोरी करण्यासाठी आला असल्याचे सांगीतले. एसबीआय बँकेचे एटीएम ची पाहणी केली असता एटीएम मशिनचा पत्रा उचकटल्याचे दिसून आले.
सदरबाबत हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ३४९/२०२४ भा.दं. वि. कलम ४६१,३८०,५११ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेश कवळे हे करीत आहेत
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ आर राजा यांचे सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्विनी राख हडपसर पोलीस स्टेशनचे, पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलिस निरी. (गुन्हे), श्री. पंडीत रेजितवाड पुणे मागदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुनील कांबळे, वैभव भोसले, अतुल पंधरकर, अमित साखरे, यांचे पथकाने केलेली आहे.

घरफोड्या करणारी ५ अल्पवयीन मुले पोलिसांनी पकडली

पुणे- रात्रीच्या वेळेस घरफोडी करणा-या ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवून त्यांचे कडून १ घरफोडी चा गुन्हा व २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
मांजरी येथील किराणा मालाचे दुकान दिनांक २५/०२/२०२४ रोजी बंद असताना, दुकानाचे शटर उचकटुन दुकानात प्रवेश करुन दुकानातील ड्रॉव्हर उचकटुन त्यामधील पैशाची चोरी केली. त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे गु.र. नं ३५०/२०२४ भा. द. वि. कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.या चोरीच्या तपास पथक अधिकारी सपोनि अर्जुन कुदळे, पोउपनिरी. महेश कवळे, पोलीस अंमलदार असे मिळुन आरोपींचा शोध घेत असताना, मिळालेल्या बातमीचे आधारे ५ मुलांना ताब्यात घेण्यात आले. मुलांकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या दोन दुचाकी वाहनांबाबत तपास करता, दोन्ही वाहने ही नमुद मुलांनी एकत्रीत रित्या दि.२५/०२/२०२४ रोजी रामटेकडी पुणे येथून चोरी केली असल्याचे व त्यावरुन रात्री मांजरी येथील किराणा दुकानाचे शटरचे लॉक तोडून, घरफोडी केली असल्याचे सांगीतले. वाहन चोरी केल्याबाबत वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं १७४/२०२४ भा.दं. वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या मुलांकडून एकूण १,२०,५००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील वपोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ आर राजा यांचे सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्विनी राख हडपसर पोलीस स्टेशनचे, पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलिस निरी. (गुन्हे), पंडीत रेजितवाड पुणे मागदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, अमोल दणके, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर, अनिरूध्द सोनवणे, रामदास जाधव, यांनी केलेली आहे.

जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवारांचा पैसा -प्रवीण दरेकरांचा थेट आरोप

पुणे- मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेल्या भाषिक हल्ल्यानंतर भाजपाचे आमदार विधानसभे बरोबर विधान परिषदेत देखील आक्रमक झाले.जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवारांचा पैसा असतो असा प्रवीण दरेकरांनी थेट आरोप केला याशिवाय राजेश टोपे , रोहित पवार आदींची धडधडीत नावे हि घेतली .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील जरांगेंच्या मागण्या तसेच त्यांची भूमिका यावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (२७ फेब्रुवारी) मनोज जरांगे यांच्या मागण्या तसेच त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.विधानसभेत बोलताना, एकनाथ शिंदे म्हणाले की, दुसऱ्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आपण ठरवलं. ते आरक्षण आपण दिलं. मात्र हे आरक्षण टिकणार नाही, अशी चर्चा करण्यात आली. हे दुर्दैवी आहे. आरक्षण का टिकणार नाही यासाठी कोणाकडे कारणं आहेत का? तर नाहीयेत. फक्त आरक्षण टिकणार नाही, असे सांगितले जाते. गेली अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी मागणी करत होता. मराठा आरक्षणासाठी अनेक मोर्चे निघाले, आंदोलन झाले. मराठा समाज संयमी आहे. मराठा समाज शिस्तीने वागणारा आहे, हे त्या मोर्चांमधून स्पष्ट झाले.“मनोज जरांगे यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, असे म्हणत कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यातील यंत्रणा कामाला लागली. प्रत्यक जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला होता. दोन-अडीच लाख लोक काम करत होते. त्यानंतर ज्या कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्या सपडत होत्या. आणखी त्यापुढे जाऊन शिंदे समितीला हे काम देण्यात आले. तेलंगणा, हैदराबात या ठिकाणी जाऊन जुन्या नोंदींची माहिती घेतली गेली. मराठा समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी सरकारने भूमिका घेतली,” असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.“मनोज जरांगे यांनी सरसकट ओबीसी आरक्षणाची मागणी केली. मात्र सरसकट आरक्षण देता येणार नाही. आम्ही सांगितलं की कायद्याच्या कसोटीवर हे टिकणार नाही. सरसकट आरक्षणाच्या मगणीनंतर सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी करण्यात आली. तशी मागणी मात्र कोणाचीही नव्हती. मराठवाडा सोडून इतर मराठा समाजाला वेगळे मराठा आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. मनोज जरांगेंच्या मागण्या बदलत गेल्या,” असे एकनाथ शिंदेंनी सांगितले. तसेच सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं. हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आहे. हे आरक्षण देताना सर्व बाबी विचारात घेतल्या, असा दावाही शिंदे यांनी केला.