मुंबई-मी दंगल घडवणारा माणूस आहे का?ना माझा हात ना शरद पवारांची स्क्रिप्ट,आमचा डीएनए सर्वधर्मसमभावाचा,समाज म्हणून मी मदत केली,जखमींना मदत करण्यासाठी गेलो एक टक्का जरी दोषी आढळलो तरी राजकारण संन्यास घेईन असे सांगत माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेले आरोप धादांत खोटे आणि राजकीय सूडबुद्धीने केले असल्याचा दावा केला आहे. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. मराठा समाजासाठी माणूसकी म्हणून मी काही मदत मी केली आहे. प्रक्षोभक असे काहीही केलेले नाही. माझा या प्रकरणी 1 टक्का दोष आढळला तरी माझी महाराष्ट्रातील जनता देईल ती शिक्षा भोगण्याची तयारी आहे. एवढेच नाही तर मी स्वतः राजकारणातून 100 टक्के संन्यास घेईन, असे राजेश टोपे म्हणाले.
सरकारने सर्व गोष्टींची चौकशी करावी. माझी कोणतीही हरकत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वजण एकजूट आहेत. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की, या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले पाहिजे. आम्ही या प्रकरणी प्रक्षोभक असे कोणतेही कृत्य केले नाही, आमचा डीएनए हा सर्वधर्मसमभावाचा आहे, असे ही राजेश टोपे म्हणाले.
राजेश टोपे म्हणाले की, समाजबांधव जेव्हा आंतरवाली सराटी येथे जातात. त्या ठिकाणी समाज बांधवांप्रती असलेले प्रेम म्हणून स्टॉल लावणे, नाश्ताची मदत करणे अन्य स्टॉल लावणे हे माणूस म्हणून मी काम केले आहे. सर्व समाजासाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे. एवढंच नव्हे राजेश टोपेंना जो मतदार संघ ओळखतो. मुळात आमचा डीएनए हा सर्वधर्मसमभाव म्हणून काम करणारा आहे. मी ज्या पक्षात आहे, त्या पक्षाचा धर्म काय सांगतो किंवा संस्कार देखील तोच सांगतो. शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने आम्ही काम करणारे आहोत.राजेश टोपे म्हणाले की, विधानपरिषदेत माझ्यावर जो काही संशय व आरोप करण्यात आले. तो बिनबुडाचे आरोप आहे. त्यात कुठलाही अर्थ नाही. त्याला राजकारणाच्या दृष्टीने वळवण्याचे काम कोणीही करू नये, एव्हाना त्यात राजकारण करण्याची गरज नाही.माझ्यावर आरोप कुठलीच सत्यता नाही. राजेश टोपे जे ओळखतात. दंगल घडवणारा, दगड फेक करणारा माणूस आहे का, मला जे म्हणायचे आहे की, एसआयटी नेमायची गरज आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आम्ही देखील सामोरे गेलो आहे. सबुरीने आंदोलन घ्यावे लागले. अनेकदा मी अधिकाऱ्यांना देखील संयमाने घेतले पाहिजे, अशी विनंती केली आहे.राजेश टोपे म्हणाले की, लाठीचार्ज झाला पण ज्यांना लागलं होत त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो. लोकप्रतिनिधी म्हणून मी काळजीपोटी त्या ठिकाणी गेलो होतो. काहीतरी संशय निर्माण करणे हे चुकीचे आहे. या चौकशाला मी सामोरे जाईल. माझी काम करण्याची पद्धत आहे ती जनतेला माहित आहे. मुंगी मारलेली नाही अशी संवेदनशील माणसं आहोत. काय अडचण असतील त्या चौकशीतून बाहेर पडेल. पाच किमी अंतरावर माझा कारखाना आहे. त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी जायचे आहे.
मुख्यमंत्री देखील भेटायला आले तेव्हा त्यांचे हेलिकॉप्टर देखील कारखान्याच्या जागेवर उतरवले गेले. ऐकूव गोष्टींवर राजकारण करू नये, राजकारण म्हणून खोट्या नाट्या गोष्टी करणे हे सर्व पक्षीय लोक आहेत. शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादीचे लोक असतात. लोक समाज म्हणून लोक जातात. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जात नाही. सर्व रेकॉर्ड निश्चित लक्षात आणून देवो. प्रक्षोभक म्हणून काहीही केले असेल तर मी कधीही केलेले नाही मी करणार नाही. एक टक्का जर दोषी असलो तरी मी राजकारणातून सन्याशी घेईल, असेही राजेश टोपे म्हणाले.
राजेश टोपे म्हणाले की, यात कोणाचाही समावेश नाही. ना शरद पवारांची स्क्रिप्ट आहे. ना माझा कुठलाही समावेश. माझा संबंध फक्त समाजाला मदत म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो आहे, त्याची चौकशी झाली तरी मी प्रत्येक गोष्टीला सामोरे जाईल, असेही ते म्हणाले.