टिळक रोडच्या दलित शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यासह अनेकांवर गुन्हा दाखल
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी मंगळवारी दिली. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांत काँग्रेस कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ बंटी बाबा शेळके, प्रथमेश विकास आबनावे, एहसान अहमद खान, मुरलीधर सिद्धाराम बुधरामस, राहुल दुर्योधन शिरसाट यांचा समावेश आहे.यातील आबनावे टिळक रस्त्यावरील एका दलित शिक्षण संस्थेचा पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येते .तर लोणीकंद परिसरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिरडी करून जमाव जमवून आंदोलन केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शिवाजीनगर भागातील काँग्रेस भवन येथे सोमवारी सायंकाळी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दिल्ली – हरयाणा सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात एका शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सोमवारी सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकात एकत्रित जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पंतप्रधान यांच्या निषेध घोषणा देत, पंतप्रधानांचा पुतळा पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे बंदोबस्तास असलेले डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत यांनी त्यांना रोखले. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना डेक्कन पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
लोणीकंद परिसरात लोहगाव वाघोली रोड पाचारणे समाज मंदिर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिरडी करून जमाव जमवून आंदोलन केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शनी शिगांरे ( रा.वाघोली, पुणे, योगेश बरडे, ( रा. वाघोली), ओंकार तुपे, (रा. वाघोली पुणे), ज्योती सातव (रा. वाघोली ,पुणे ) व इतर 35 ते 40 अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस शिपाई शंकर महादू क्षिरसागर यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल आहे. आरोपी यांनीलोहगाव वाघोली रोड पाचारणे समाज मंदिर येथे 25 फेब्रुवारी रोजी गैरकायद्याचा जमाव जमवला. पोलिस उपआयुक्त पुणे शहर यांचे कार्यालयीन आदेशानुसार 14 दिवसाकरीता कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे, पुढा-याच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आदेशपूर्ण भाषणे करणे, व परिसरात कायदा व सव्यवस्था धोक्यात यईल अशा पध्दतीने वर्तन करण्यास बंदी आहे. असे असताना देखील सदर आदेश जारी केलेला असताना सदर आदेशाचे उल्लघंन व भंग केल्याने आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.