पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यात आला. अक्षर सुलेखन मार्गदर्शन वर्ग, कुमार साहित्य मेळावा, नाविन्यपूर्ण भाषिक खेळ, चला वाचक वीर होऊया आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. म्हणी ओळखा, शब्द साखळी, घोषवाक्य निर्मिती, कविता पूर्ण करा या स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्यध्यापिका मनिषा मिनोचा यांनी मार्गदर्शन केले.
अहिल्यादेवी शाळेत एक हजार विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर पत्र लिहिण्याचा उपक्रम केला. विद्यार्थीनींनी कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रे लिहिली. मुख्याध्यापिका अनघा डांगे यांनी मार्गदर्शन केले.
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात ज्येष्ठ लेखक राजीव तांबे यांचे व्याख्यान झाले.