Home Blog Page 1167

कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीमार्फत लोकार्पण

सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या टर्मिनलची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर, दि. 10 :  देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होता. या नवीन टर्मिनलचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन स्वरुपात झाले. या कार्यक्रमांतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या या नवीन इमारतीची पाहणी करून हे विमानतळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल, असे मत व्यक्त केले.

कोल्हापूर येथून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके,  जिल्हाधिकारी अमोल येडगे, विमानतळ प्राधिकरणाचे पियुष श्रीवास्तव, दिलीप सजनानी, संजय शिंदे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूरसह अलीगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद, श्रावस्ती, ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, जबलपूर, दिल्ली आणि लखनौ येथे नवीन तसेच सुधारित विमानतळ टर्मिनल इमारतींचे उद्घाटन आणि कडप्पा, हुब्बल्ली, बेळगावी येथे नवीन टर्मिनल इमारतींची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली. कोल्हापूर येथे या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूर विमानतळाची स्थापना राजाराम महाराजांनी 1939 मध्ये केली होती. आज लोकार्पण केलेल्या नूतन इमारतीतून कोल्हापूर जिल्ह्याची संस्कृती आणि वारसा दृश्य स्वरूपात प्रवाशांना पाहता येणार आहे. अतिशय सुंदर आणि दिमाखात बांधकाम केलेल्या इमारतीचा कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन आणि विकासासाठी हातभार लागणार असल्याचे सर्वच मान्यवरांनी या कार्यक्रमावेळी सांगितले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नूतन टर्मिनलची सर्वत्र फिरून बारकाईने पाहणी केली.

कोल्हापूर विमानतळाची संक्षिप्त माहिती

दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शतकानुशतके समृद्ध ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र राहिले आहे, ज्यामुळे ते विविधता आणि एकतेचे खरे प्रतिनिधित्व करते. याला “दक्षिण काशी किंवा “महातीर्थ असे संबोधले जाते. कोल्हापूर हे पूर्वीच्या राजघराण्यांचे किल्ले, मंदिरे आणि राजवाडे यासाठी देखील ओळखले जाते आणि महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे. तसेच कृषी आधारित उद्योगात अग्रगण्य जिल्हा म्हणूनही कोल्हापूर ओळखला जातो.

कोल्हापूर विमानतळावर रात्रीची हवाई सेवा सुरु केल्याने कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी वाहतूक वाढली आहे. विद्यमान टर्मिनल इमारतीची प्रवासी हाताळणी क्षमता 150 प्रवाशांपर्यंत होती, जी मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यानुसार, भविष्यातील वाहतूक वाढ लक्षात घेऊन एटीसी टॉवर कम टेक्निकल ब्लॉक आणि एअरसाइड वाढीसह नवीन टर्मिनल बिल्डिंगचे नियोजन करण्यात आले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 255 कोटी खर्चुन A-320 प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी विमानतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन टप्यात धावपट्टी आणि संबंधित कामांच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून 65 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या जागेत पहिला टप्प्यातील विकासकामे पूर्ण झाली आहेत.

डिझाइन, संकल्पना आणि कला कार्य

कोल्हापूर विमानतळाचे टर्मिनल भवन स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे, जेणेकरून त्याचे सार आतील आणि बाहेरील दोन्हींमध्ये प्रतिबिंबित होईल, नवीन टर्मिनल इमारतीच्या दर्शनी भागावरील मोठे तोरण हे सामान्यतः कोल्हापूर शहरातील महाराजांच्या राजवाड्यात वापरल्या जाणाऱ्या वास्तू किंवा नवीन राजवाडा, भवानी मंडप इत्यादी वारसा वास्तूंद्वारे प्रभावित आणि प्रेरित आहेत.

त्याप्रमाणेच टर्मिनल भवनाच्या आत बसवलेल्या कलाकृती कोल्हापूर शहरातील समृद्ध कला, स्थापत्य आणि संस्कृतीचे वैभव दर्शवतात. पर्यटकांना या ठिकाणाची जाणीव करून देण्यासाठी, त्यांना स्थानिक संस्कृती, वारसा, उपजत परंपरा, धार्मिक श्रद्धा, सामाजिक जीवन आणि विविध पर्यटनस्थळांची चित्रे, चर्मकला (लेदर वर्क) आणि कोल्हापुरी साजच्या कलाकृ‌ती प्रदर्शित केल्या आहेत. येथील धावपट्टीचा विस्तार 1370 मीटर ते 1780 मीटरचा आहे, 03 पार्किंग वे (1 A-320+2 ATR-72 प्रकारच्या विमानांसाठी आहे.

नवीन टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 3900 चौ.मी असून तासी प्रवाशी क्षमता 500 आहे. वार्षिक क्षमता 5 लाख प्रवाशी आहे. वाढीव हवाई कनेक्टिव्हिटी पर्यटन, व्यवसाय, शिक्षण आणि रोजगार निर्मितीला चालना देऊन कोल्हापूरच्या आर्थिक समृ‌द्धीसाठी आवश्यक आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विकासामुळे या भागातील हस्तकला उद्योगाच्या वाढीस मदत होईल ज्यात कापड, चांदी, मणी आणि पेस्ट दागिन्यांची हस्तकला, मातीची भांडी, लाकूड कोरीव काम आणि लाखेची भांडी, पितळी पत्रे आणि ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर आर्टवर्क आणि लेस आणि भरतकाम यांचा समावेश आहे.

गांधीजी हे मानवतेचे प्रतिक:डॉ.शशिकला राय

पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. १० मार्च  २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी  ६ या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर पार पडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख डॉ. शशिकला राय यांनी ‘गांधीजीं सोबत मैत्री ‘ विषयावर मार्गदर्शन केले.डॉ. कुमार सप्तर्षी यांनी ‘ सत्याग्रहशास्त्र ‘ या विषयावर मार्गदर्शन केले, तर  मुंबईचे पत्रकार सोहित मिश्रा यांनी ‘ महात्मा गांधी आणि आजचे वर्तमान ‘ या विषयावर  मार्गदर्शन केले.’ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे अकरावे शिबीर होते. 
 डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन,डॉ.प्रवीण सप्तर्षी,सुदर्शन चखाले (प्रकल्प प्रभारी) ,संदीप बर्वे (विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ) , जांबुवंत मनोहर ( राज्य कार्यवाह, युक्रांद  ),अप्पा अनारसे(संघटक,युक्रांद),सचिन पांडुळे (अध्यक्ष, युवक क्रांती दल पुणे शहर) आदी मान्यवर उपस्थित होते.नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
डॉ.शशिकला राय म्हणाल्या,’आपलयाला स्वातंत्र्य जसे समजले नाही, तसेच गांधीजी समजले नाहीं. कारण ते समजून घेण्याची मानसिकता नाहीं. गांधी ही  व्यक्ती नाहीं तर प्रतीक आहे.गांधी बनणे ही एक प्रक्रिया आहे. स्वतः गांधी ही  प्रक्रिया जगले. जगभरात अनेक व्यक्ती या प्रक्रियेतून मानवतेचे नेते झाले.रक्ताचा एकही थेंब न सांडता जगात काही करता येते, हे गांधीजींनी दाखवून दिले.प्रचारातून असत्याला सत्य बनवता येत नाही.ज्याला प्रेम समजते अशा कोणालाही गांधी समजून सांगणे सोपे आहे. नव्या पिढीला समजून सांगण्या इतके गांधी संभाषण स्नेही आहेत’.हिंदी आणि मराठी साहित्यातील गांधीजींबद्दलच्या लेखनाचा मागोवाही डॉ.शशिकला राय  यांनी या भाषणात घेतला.
डॉ.सप्तर्षी म्हणाले,  ‘ गांधीजी हे व्यक्ती म्हणून समजून घेण्याबरोबरच त्यांचे अन्याय विरुद्ध लढणे हे अभ्यासणे गरजेचे आहे. सत्याग्रह हे शास्त्र म्हणून त्यांनी विकसित केले. ही त्यांनी जगाला दिलेली देणगी आहे.अहिंसा ही दुबळ्यांची  नसते,  इतरांना मारण्याची ताकद असून जे मारत नाहीत, ती शूरांची अहिंसा असते.मुस्लिमबहुल भाग पाकिस्तान झाला. हिंदूबहुल भाग धर्मनिरपेक्ष देश बनला, या कारणातून गोडसे याने गांधीजींची हत्या झाली.तरीही गांधी विचार अमर झाला आणि जगभर जिवंत राहिला’. 

लष्करात नोकरी लावतो सांगून लुटमार करून नेपाळला निघालेल्या गणेश परदेशीला पकडले

पुणे- लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन फसवुन नेपाळ येथे पळुन जाण्याच्या तयारीत असणा-या आरोपीला कोंढवा तपास पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’
लष्कराच्या सदन कमांड येथे पूर्वी ड्रायव्हर म्हणुन नोकरी करणा-या व लष्करात नोकरी लावुन देण्याच्या आमिषाने पैसे घेवुन बनावट अपॉयमेन्ट लेटर देवुन फसवणुक करणा-या गणेश बाबुलाल परदेशी याने पुन्हा कोंढवा भागातील फिर्यादी यांच्या मुलीना तसेच त्याच्या इतर नातेवाईकांना त्याची लष्करातील बडया अधिका-याशी ओळख असल्याचे सांगुन लष्करात सिव्हिलियन या पदावर नोकरीला लावतो म्हणुन ८,३२,०००/-रु घेवुन नोकरी न लावता फसवणुक केली होती. त्याबाबत कोंढवा पो.स्टे. येथे गुरन.११८९/२०२४, भा.दं. वि. कलम ४०६,४२०,४६४(अ),४६५,४६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा केल्यानंतर आरोपी याने त्याचा रहाता पत्ता बदलुन दुस-या ठिकाणी राहण्यास जावुन मोबाईल नंबर बदलले होते. सदर आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोढवा पो.स्टे. संतोष सोनवणे व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे व स्टाफ असे शोध घेत असताना दि.०८/०३/२०२४ रोजी तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक, लेखाजी शिंदे पोलीस अंमलदार विकास मरगळे, शंशाक खाडे यांना माहिती प्राप्त झाली की, सदर आरोपी हा एन.आय.बी.एम. रोड सांळुखे विहार येथील महालक्ष्मी स्टेशनरी सेंटर येथे तोडाला रुमाला बांधुन आपली ओळख लपवुन सामान घेण्यासाठी आला आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने तात्काळ तपास पथकातील स्टाफ सह वरील ठिकाणी जावुन गणेश बाबुलाल परदेशी हा स्टेशनरी दुकानातुन सामान खरेदी करुन निघुन जात असतांना त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश बाबुलाल परदेशी रा. कृष्ण केवल सोसायटी, एन.आय.बी.एम. रोड कोढवा खुर्द पुणे असे सांगितले.
त्यास पोलीस ठाणे येथे आणुन त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर आरोपी याने अजुन काही तरुणांना बेरोजगारीचा फायदा घेवुन नोकरीचे आमिष दाखवुन फसविले असल्याबाबत माहिती प्राप्त होत असुन त्याबाबत अधिक तपास पोलीस उप निरीक्षक वैभव सोनवणे हे करित आहे.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परि.५ आर. राजा, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पो. नि. लेखाजी शिंदे, सहा. पो. नि. दिनेश पाटील, पोलीस उप निरीक्षक, वैभव सोनवणे पोलिस अमंलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, अभिजीत रत्नपारखी, शशांक खाडे विकास मरगळे, राहुल थोरात, सुहास मोरे, जयदेव भोसले, अभिजीत जाधव, आशिष गरुड, रोहित पाटील, अक्षय शेंडगे यांनी केली आहे.

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारा सागरी किनारा मार्ग

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात वेळ आणि इंधन बचतीला आत्यंतिक महत्त्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्ग (दक्षिण) ची एक बाजू वाहतुकीसाठी खुली होत असून वेळ आणि इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेले मुंबई हे भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक प्रमुख शहर आहे. दक्षिण मुंबईतील परिसर व्यापार उदिमाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. सात बेटांनी तयार झालेल्या मुंबईचा भौगोलिक विस्तार उत्तर दक्षिण असा पसरलेला असल्याने येथील देशाच्या मुख्य भागाशी जोडलेले दोन मुख्य रस्ते देखील उत्तर दक्षिण असेच बांधलेले होते. साहजिकच या रस्त्यांवर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब असे. तथापि मागील काही वर्षांत या रस्त्यांना पूरक असे नवीन रस्ते तयार होत असल्याने रहदारीची ही जटील समस्या कमी होऊ लागली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या ‘अटल सेतू’ नंतर आता सोमवारी वाहतुकीसाठी खुला होत असलेला मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

प्रकल्पामुळे होणारे फायदे

सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे 70 टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये 34 टक्के बचत होईल. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल. ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल. सुमारे 70 हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होऊन मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल. या हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह आदी प्रस्तावित आहेत. या रस्त्यामुळे इतर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सुरक्षित व जलद प्रवास करता येईल. मुंबईकरांना सागर किनारी अतिरिक्त प्रोमीनेड उपलब्ध होईल.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असणार आहे. या रस्त्याची लांबी 10.58 कि.मी. असून मार्गिकांची रस्त्यावरील संख्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार असेल. तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन असेल. भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी 4.35 कि.मी. असून पुलांची एकूण लांबी 2.19 कि.मी.आहे. या मार्गातील मलबार हिल टेकडीच्या खालील दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी 2.072 कि.मी. असून त्याचा अंतर्गत व्यास 11 मीटर आहे. याचे एकूण भरावक्षेत्र 111 हेक्टर इतके असून तीन ठिकाणी आंतरबदल असतील ज्यांची लांबी 15.66 कि.मी. इतकी आहे. 7.5 कि.मी. लांबीचे नवीन पदपथ असून बस वाहतूकीसाठी समर्पित मार्गिका ठेवण्यात आली आहे. समुद्री लाटांपासून बचावासाठी 7.47 कि.मी. लांबीची सागरी तटरक्षक भिंत असणार आहे. या प्रकल्पात अमरसन्स, हाजी अली, वरळी डेअरी, थडाणी जंक्शन, वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

हा प्रकल्‍प मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून 25 फेब्रुवारी पर्यंत याची भौतिक प्रगती 85.91 टक्के तर आर्थिक प्रगती 81.19 टक्के इतकी झाली आहे. बोगदा खणन काम 100 टक्के पूर्ण झाले असून पुनःप्रापणाचे (रिक्लेमेशन) चे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. समुद्रभिंत उभारण्याचे काम देखील पूर्णत्वास आले असून आंतरबदल 87 टक्के तर पुलांचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे.

बोगद्याची वैशिष्ट्ये

किनारा मार्गावरील पहिला बोगदा खणण्‍याची सुरुवात जानेवारी 2021 मध्‍ये करण्‍यात आली होती. हा बोगदा जानेवारी 2022 मध्‍ये पूर्ण झाला. दुसरा बोगदा खणण्‍याची सुरुवात एप्रिल 2022 मध्‍ये करण्‍यात आली आणि हा बोगदा मे 2023 मध्‍ये पूर्ण झाला. बोगद्याला 375 मि.मी. जाडीचे काँक्रीटचे अस्‍तर लावण्‍यात आलेले असून त्‍यावर अग्‍नीप्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत अग्‍नीरोधक फायरबोर्ड लावण्‍यात येत आहेत. भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून आपत्‍कालिन निर्वासनासाठी प्रत्‍येक 300 मीटरवर छेद बोगदे आहेत. उपयोगिता सेवेसाठी बोगद्यांमध्‍ये युटीलिटी बॉक्‍सची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे.

प्रकल्पाचा खर्च

मुंबई किनारी रस्त्यासाठी एकूण बांधकाम खर्च 13983.83 कोटी रुपये अपेक्षित आहे. यामध्ये 9383.74 कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष बांधकाम खर्चाबरोबरच इतर अनुषंगिक खर्चाचा समावेश आहे.

इतर वैशिष्ट्ये

सागरी रस्ता प्रकल्पातील बोगदा खणणाऱ्या यंत्राने (टीबीएम) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा बोगदा (व्यास 12.19 मी.) आहे. भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो वायुविजन प्रणालीची योजना करण्यात आली आहे. तसेच भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ पाईलचा पाया बांधून पुलांची उभारणी करण्यात आली आहे. एकाच प्रकल्पामध्ये पुनःप्रापण करुन रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. प्रकल्पातील प्रवाळांचे (कोरल) स्थलांतर व अस्तित्व टिकविण्याचे काम यशस्वीरित्या साध्य करण्यात आले आहे.

एकूणच वेळ आणि इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करून मुंबईकरांचे दैनंदिन जीवनमान सुखकर करण्यामध्ये हा किनारा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, हे निश्चित.

000

पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन

महाराष्ट्रात विमानसेवेचे जाळे निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा प्रयत्न – अजित पवार

पुणे, दि.१०: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. या नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रधानमंत्री श्री.मोदी यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर पुणे विमानतळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील  उपस्थित होते.

पुणे शहराला साजेसे भव्य आणि आधुनिक, पुणे शहराच्या संस्कृतीची अनुभूती करून देणारे टर्मिनल अस्तित्वात आल्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद देऊन यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले,  पुणे हे एक महत्वाचे शहर आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी हब आहे. देश-विदेशातून अनेक नागरिक पुण्यात येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जुने टर्मिनल अपूरे होते. संरक्षण मंत्रालयाला विनंती करण्यात येऊन नव्या इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली आणि त्यामुळे भव्य टर्मिनल उभे राहिले आहे.

महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचे म्युरल, वारली कला, देशी  खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीत घडते. आपल्या स्थानिक संस्कृतीला साजेसे वातावरण  इमारतीत आहे.  विमानतळावर स्थानिक उत्पादनांची विक्री करता येणार आहे. एक परिपूर्ण टर्मिनल आपल्याला मिळाले आहे. कोल्हापूरलादेखील मराठा साम्राज्याला साजेसे असे टर्मिनल उभे रहात आहे. महाराष्ट्रातही विमानतळाच्या धावपट्यांना विकसीत करून विमानतळांचे जाळे निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

पुरंदर येथील विमानतळ व कार्गो सेंटरसाठी लवकरच भूसंपादन

पुणे वायुसेनेचे केंद्र असल्याने इथली धावपट्टी अनेकदा बंद ठेवावी लागते. त्यामुळे विमानसेवेच्या विस्ताराची गरज लक्षात घेता  पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ  उभारण्यात येणार आहे. लवकरच त्यासाठीचे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे. उद्योगांना नवी पुरवठा साखळी विकसित करता येईल आणि रोजगाराला चालना मिळेल असे विमानतळ आणि कार्गो सेंटर पुरंदर येथे उभारण्यात येईल. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता हे विमानतळ आवश्यक असून त्यामुळे पुण्याच्या जीडीपीमध्ये २ टक्के वाढ होईल, असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विमानसेवा क्षेत्राने मोठी भरारी घेतली आहे. देशात गेल्या दहा वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. सामान्य माणसासाठी ‘उडान’ योजनेअंतर्गत हवाई वाहतूक उपलब्ध होत आहे. या विमानतळांचा उद्योगांना लाभ होऊन रोजगारांच्या संधी वाढत आहेत. दळणवळण सेवांच्या विस्तारामुळे उद्योगांनाही चालना मिळते आहे, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, एकाचवेळी १० हजार कोटी रुपये खर्चाच्या १४ विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. बरेच दिवसापासून पुण्याच्या नावाला साजेसे टर्मिनल व्हावे ही पुणेकरांची मागणी होती. स्व.गिरीश बापट यांनीदेखील नव्या टर्मिनल इमारतीच्या जागेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.  एक हजार मोटारी उभे राहू शकतील, ३४ चेक इन काऊंटर, ९० लाख वार्षिक प्रवासी क्षमता असलेले हे टर्मिनल आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा परिसरात उभारण्यात आला आहे. एप्रिलमध्ये नव्या टर्मिनलच्या सुविधा सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात नवे विमानतळ उभारण्यासोबत विद्यमान धावपट्टी वाढविण्याचा विचार करण्यात येत आहे. दूरदृष्टी असणारे प्रधानमंत्री असल्याने देशात असे आमुलाग्र बदल होत आहेत. वंदे भारत रेल्वे, नवे विमानतळ आदी बाबी पुर्णत्वास येत आहेत, असेही श्री.पवार म्हणाले.

डॉ. एच. श्रीनिवास यांनी प्रास्ताविकात पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीतील सुविधांची माहिती दिली. भारतीय विमानतळांना आधुनिक सुविधा देण्यात येत आहे. विमानतळावर स्थानिक संस्कृतीला प्रदर्शित करण्यात येत आहे. पुणे विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ ५२ हजार चौ.मीटर असून सर्वाधिक व्यस्त वेळेत ३ हजार प्रवासी क्षमता आहे, अशी त्यांनी दिली.

कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ,  सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे,  केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सह सचिव असंगबा चुबा, भारतीय विमान प्राधिकरणाच्या मानव संसाधन विभागाचे सदस्य डॉ. एच श्रीनिवास, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल,  पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे पुणे विमानतळ व्यवस्थापक संतोष ढोके आदी उपस्थित होते.

मला जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरु..पण मी घाबरणारा नाही तर लढणारा आहे -रोहित पवार

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि सध्या शरद पवार गटात असलेले रोहित पवार यांच्या साखर कारखान्यावर जप्तीच्या कारवाईची नोटीस आल्यानंतर त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्ला केला.

इशारा – रोहित पवार म्हणाले ,माझ्याकडेही ८/९ फाईल्स आल्या आहेत -ज्यात भाजपच्या २ आणि अजितदादांच्या पार्टीच्या ७ नेत्यांच्या तसेच एकनाथ शिंदे यांच्या पार्टीतल्या नेत्यांच्या फाईल आहेत .मुंबई /ठाणे क्रीडा मैदाने बिल्डरच्या घशात घालणे , मनी लाँँड्रीगची फाईल आहे आणि आता अॅॅम्ब्युलांस ची फाईल माझ्याकडे आलेली आहे जो या सरकारचा मोठा घोटाळा आहे .आणि या फाइल्स सध्याच्या सरकार मधील एका हितचिंतकाने पाठविली आहे, त्याचा मी अत्यंत आभारी आहे.

रोहित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माझ्यावर केसेस चालू आहेत. शरद पवार यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. ईडीने त्यांच्या विरोधात नोटीस काढली होती. अण्णा हजारे स्वतः म्हणतात या घोटाळ्यात शरद पवारांचं नाव नसतानाही त्यांचं नाव का घेतलं, हा प्रश्न आहे. दोन-तीन महिने मला जेलमध्ये टाकलं जाईल, अशी शक्यता आहे. कुणी कष्टातून एखादी कंपनी मोठी करत असेल तर अशी द्वेषपूर्ण कारवाई करणं चुकीचं आहे. भाजपमध्ये गेलं की कारवाया थांबतात, परंतु मी लढणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता कन्नड येथे जावून शेतकरी आणि माझ्या सहकाऱ्यांशी बोलणार आहे.

”आम्ही कोर्टात गेलो तर त्यांची कारवाई कुठेही टिकणार नाही. त्यामुळे आम्ही घाबरत नाही. माझं नाव आरोपींमध्ये नाही. ज्यांचं नाव आरोपींमध्ये आहे त्यातले ७० टक्के लोकं भाजप, अजित पवारांच्या गटात किंवा एकनाथ शिंदेंच्या सोबतचे आहेत. मी तर हा कारखाना महागात घेतला. ज्यांनी यापूर्वी विकत घेतला ते भाजपचे लोक आहेत. त्यांनी माझ्यापेक्षा स्वस्तात कारखाना घेतला आहे. मात्र आजपर्यंत एकाही व्यक्तीवर कारवाई झालेली नाही. माझ्यावर केस झाली तरी मी लढणार.. कोणी किती स्वस्तात कारखाना घेतला याची यादी माझ्याकडे आहे. मी ती वाचणार नाही. कारण मी द्वेषाचं राजकारण करत नाही.” असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार पुढे म्हणाले, मला नोटीस आली, मी चौकशीला गेलो. ईडीच्या अधिकाऱ्यांचं यात काहीही चुकीचं नाही. तीनही वेळेला मी चौकशीला सामोरं गेलेलो आहे. तरीही जप्तीची कारवाई करत असतील तर चुकीचं आहे. अधिवेशनात जेव्हा मी बोलत होतो, तेव्हा माझे काही मित्र मला सांगत होते. विधानसभेत काहीही बोलू नको नाहीतर करवाई होईल. तरीही मी अधिवेशनात बोललो. आता माझा कारखाना जप्त करण्याचा प्रयत्न ईडीकडून केला जात आहे. रोहित पवार म्हणाले की, मला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पूर्ण बारामती Agro कुटुंबाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पहिल्यांदा केस फाईल केल्यानंतर दोन वर्षे ईडीचे अधिकारी शांत राहिले. मात्र राज्याची सत्ता जेव्हा बदलली आणि जेव्हा पक्ष फुटला.. जेव्हा अजितदादांनी जुनाच साहेबांचा पक्ष चोरी करुन आमदारांना सोबत घेऊन बंड केलं.. त्यानंतर माझ्यावर जोरात कारवाया सुरु झाल्या.

काय आहे प्रकरण?
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पवारांच्या बारामती अॅग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त करण्याची नोटीस काढली आहे. कारखान्याची 161 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे. जवळपास 50.20 कोटी रुपयांची मालमत्ता या कारवाईत जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे.

महाबळेश्वर मध्ये पहाटे पहाटे जिल्हाधिकाऱ्यांनी टाकला अनधिकृत बांधकामांंवर हाथोडा

महाबळेश्वर – साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सध्या ॲक्शन मोडवर आले आहेत. अत्यंत गुप्तता पाळत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने रविवारी पहाटे महाबळेश्वरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मेटगुताड येथील संबाला हॉटेल पहाटे बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आले. सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हॉटेल व एक मोठा बंगला, अशी तीन अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती.

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्सा महाबळेश्वर तालुक्यात विनापरवाना अनाधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. आजमितीला सुमारे 120 बांधकामे अनधिकृत आहेत. या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. त्यानुसार महसुल विभाग, पोलीस, ग्रामविकास विभाग आणि नगरपालिका प्रशासनाने अत्यंत गुप्तता पाळून रविवारी पहाटे मेटगुताड, गुरेघर येथील अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली.यापूर्वी सुरू करण्यात आलेली कारवाई मध्यंतरी थांबली होती. ती पुन्हा सुरू झाली आहे. रविवारी पहाटे गुरेघर येथील डोंगर कड्यावर नव्याने सुरु असलेले अंदाजे 5 हजार स्वेअर फुटचे बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केलं. पहाटे जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टरच्या साह्याने प्रशासनाने ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या कारवाईमुळे महाबळेश्वर तालुक्यातील अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.महाबळेश्वर येथील अनाधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार रविवारी (दि.10) पहाटे प्रशासनाने धडक कारवाई करत बांधकामांवर हातोडा मारला. वाईचे प्रांताधिकारी राजेश जाधव, महाबळेश्वरच्या तहसिलदार तेजस्विनी पाटील, वाईच्या तहसिलदार सोनाली मेटकरी, खंडाळ्याचे तहसिलदार अजित पाटील, पाचगणीचे मंडल अधिकारी चद्रकांत पारवे, महाबळेश्वरचे मंडल अधिकारी खटावकर, आणि सर्व तलाठ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.

TMC चे लोकसभेचे 42 उमेदवार जाहीर :शत्रुघ्न सिन्हा ,क्रिकेटपटू युसूफ पठाण, आणि कीर्ती आझाद यांची नावे

तृणमूल काँग्रेसने (TMC) रविवारी पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. बहारमपूर मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात पक्षाने क्रिकेटर युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने बशीरहाटमधून अभिनेत्री नुसरत जहाँचे तिकीट रद्द केले आहे.

याशिवाय कूचबिहारमधून जगदीशचंद्र बसू, अलीपुरद्वारमधून प्रकाश चिक बराईक, जलपाईगुडीतून निर्मल चंद्र रॉय, दार्जिलिंगमधून गोपाल लामा, रायगंजमधून कृष्णा कल्याणी, बालूरघाटमधून बिप्लब मित्रा, मालदा उत्तरमधून प्रसून बॅनर्जी, दक्षिणमधून शाहनवाज अली रेहान, कूचबिहारमधून निवडून आले. जंगीपूरचे खलीलूर रहमान, बेहरामपूरचे युसूफ पठाण, कृष्णानगरचे महुआ मोईत्रा, राणाघाटचे मुकुटमणी अधिकारी, दमदममधून सौगता राय, बीरभूममधून शताब्दी राय, हुगळीतून रचना बॅनर्जी, आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा, जश्नपूरचे सयोनी आणि घोडदौडचे नाव. दुर्गापूरचे कीर्ती आझाद आणि डायमंड हार्बरमधून अभिषेक बॅनर्जी.

कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसची (TMC) रॅली घेत आहेत. त्याला जन गर्जन सभा असे नाव देण्यात आले आहे. टीएमसीचे सरचिटणीस आणि ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हेदेखील ब्रिगेड मैदानावर उपस्थित आहेत.

या रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की आज मी बंगालच्या 42 लोकसभा जागांसाठी तृणमूलचे 42 उमेदवार पुढे आणणार आहे. ममता विरोधी पक्षांच्या INDI आघाडीचा एक भाग आहे, परंतु त्यांनी याआधीच राज्यातील सर्व जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

दिल्ली-मुंबईत आमचं तोरण, हेच आमचं महिला धोरण; शिवदुर्गा महिला संमेलनातून डॉ. नीलम गोऱ्हे यांचा नारा

मुंबई: महिला समाजाला आधार देण्याचे कार्य करत असतात. त्यांच्यात समाजात क्रांती घडवून आणण्याची ताकद आहे. महिलांकडे एक त्यागाचे प्रतीक म्हणून देखील पाहिले जाते. अन्याया विरुद्ध लढण्याचे काम, ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेना महिला आघाडी करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

शिवसेना महिला आघाडीच्यावतीने शिवदुर्गा महिला संमेलनाचे आयोजन मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, उपनेत्या कलाताई शिंदे, शितल म्हात्रे, आशाताई मामेडी, संध्या वाढावकर, सचिव मनीषा कायंदे, ज्योती मेहेर, शिल्पा देशमुख, ठाण्याच्या महापौर मीनाक्षीताई शिंदे, मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे, श्री गजानन पाटील आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये, महिला बचत गट, लेक लाडकी, लखपती योजना, बस प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत, महिला बचत गटांना सक्षम भांडवल उभा करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले आहेत यामध्ये पंधरा हजारावरून तीस हजार रुपये रक्कम करण्यात आली आहे यांसह अनेक निर्णय राज्य सरकारने महिलांच्या हिताच्या दृष्टीने राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

आपलं सरकार हे सर्वसमान्यांच सरकार असून ते सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या आधीच्या सरकारमध्ये सण, उत्सव या सर्वांवर बंदी घालण्यात आली होती. आपलं सरकार आल्यानंतर सर्व सण उत्सवावर असलेली बंदी उठवून टाकण्यात आली. आपली संस्कृती जोपासणे, वाढवणे हे आपलं कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देखील महिलांसाठी अनेक योजना राबवत महिलांना सक्षम करण्याचे काम केले आहे. यामध्ये उज्वला योजना, बेटी बचाव बेटी पढाव यासोबतच महिलांच्या नावावर घर असल्यास टॅक्समध्ये सवलत देण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशा प्रकारची योजना राबविण्यात येत आहे. जवळपास तीन कोटीपेक्षा अधिक महिलांना त्याचा फायदा झाला असल्यास त्यांनी सांगितले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले विमा योजनेची पाच लाखापर्यंत मर्यादा वाढवण्यात आली यामधील अटी शर्ती काढून टाकल्याने त्याचा सर्वांना फायदा घेता येणार आहे हा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

नुकतेच राज्य सरकारने महिला धोरण जाहीर केले आहे यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक भरीव कार्य होणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

सरकारने घेतलेले निर्णय हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शिवसेना महिला आघाडीने केले पाहिजे तसेच शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेऊन जनतेचा सरकार दरबारी होणाऱ्या फेऱ्या थांबवण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जवळपास चार कोटी लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आला असून त्या मार्फत लोकांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याचे कार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आजच्या शिवदुर्गा महिला मेळाव्याचा संकल्प असा आहे की, “दिल्ली मुंबईत आमचं तोरण हेच आमचे महिला धोरण” यानुसार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना परत एकदा मुख्यमंत्री आपल्याला करायचे आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक महिलेत शिवदुर्गा संचारावी अशा प्रकारची ही संकल्पना घेतलेली असल्याचे उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

काल आठ मार्चला महिला धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं, त्याच्यात म्हटलेले आहे की महिलांमध्ये गुंतवणूक करा आणि प्रगतीला वेग द्या, महिलांच्यासाठी म्हणून अनेक योजनांची माहिती मुख्यमंत्री कक्षाकडून वेळोवेळी दिली जात आहे. अनेक योजना सरकार राबवत आहे मात्र त्या योजना कशा प्रकारे राबवायच्या या संदर्भात या मेळाव्यातून महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच महिला मतदारांना कामांमध्ये ज्या अडचणी येतात त्याचे निरसन करणे, कुठल्या कुठल्या योजनांवरती तुम्हाला माहिती पाहिजे यावरही मेळाव्यातून मार्गदर्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर राजकारणामध्ये काही गोष्टी आवश्यक असतात, एक म्हणजे आरक्षण महिलांना मिळालेल आहे. पंचायत राज मध्ये ५०% महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा मिळालेली असून महिलांनी अतिशय हुशारीने आणि चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला महिलांसाठी आरक्षण लोकसभा आणि विधानसभेत जाहीर केलेल आहे. लवकरच याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरणातून आपण सगळेजण मिळून विकास साधायचा आहे, त्याच्यासाठी सगळ्यांनी वेगवेगळ्या दिशेने पंख हलवून उपयोग होणार नाही तर सगळ्यांनी दिशा ठरवली पाहिजे आणि एकत्र पंख हलवले पाहिजेत, एकमेकीला धक्का नाही मारला पाहिजे आपण सगळ्यांची दिशा सांभाळून घेतली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आजच्या कार्यक्रम हा पहिला आणि शेवटचा कार्यक्रम नसून यापुढे देखील तो राज्यभरात आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये बऱ्याच महिलांनी वेगवेगळे सहा विषय सुचवलेले आहेत यामध्ये, कौशल्य, समाज माध्यमांचा उपयोग करणं, महिलांच आरोग्य, महिला विषयक झालेले नवीन कायदे, नुकतंच जाहीर झालेला महिला धोरण आणि अतिशय महत्त्वाचा असतं ते म्हणजे स्त्रियांनी नेटवर्क किंवा सातत्याने कशा पद्धतीने सामुहिक काम करावं याच्या कार्यपद्धती अशा अनेक विषयांवर आगामी काळात काम केले जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

आगामी निवडणुक प्रचारात राज्य सरकारने राबविलेल्या अनेक योजनाबद्दल बोलले जाईल मात्र महिलांनी सर्वांपर्यंत पोहोचवावी अशी योजना म्हणजे, आनंदाचा शिधा यामध्ये सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय मनोहरजी जोशी यांनी पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. नंतरच्या काळात मी विधिमंडळात दरवर्षी मागणी करायचे की स्त्रियांना चण्याची डाळ, गुळ तसेच मैदा, तेल या गोष्टी दिल्या पाहिजेत पण त्यावेळच्या सरकारने ऐकून न ऐकल्यासारखे केले होते, परंतु शिंदे सरकारने हे सगळं मान्य केलं आणि प्रत्येक सणवाराला गोरगरिबांच्या घरामध्ये आनंदाचा शिधा पोहोचवला याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला रणरागिणी हा शब्द दिला होता नुसतं बघायचं नाही तर वेळप्रसंगी प्रतिकार करायचा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम आपण करूयात. शिवसेनेमुळे महिला सुरक्षित आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने महिला रणरागिणी म्हणून काम करण्यास सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेअर ट्रेडींगचे IPO HDFC अॅप डाऊन लोड करण्यास सांगुन १०,४७,७००/-रु.ची ऑनलाईन फसवणुक

पुणे- शेअर ट्रेडींगचे IPO HDFC अॅप डाऊन लोड करण्यास सांगुन १०,४७,७००/-रु.ची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी विमान नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सांगितलेकी ,’ विमानतळ पोलीस ठाण्यात भादविक ४१९,४२०,३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अन्वये एका ४० वर्षीय लोहगाव स्थित व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
ऑनलाईन माध्यमाव्दारे यातील संबंधित आरोपी मोबाईल धारक व वापरकर्ते असलेले अॅडमिन वापरकर्ता आहेत यांनी फिर्यादी यांचेशी संपर्क करून शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट कमवून देणा-या शेअरसची माहिती देतो त्याद्वारे मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मिळेल तसेच शेअर ट्रेडींगचे IPO HDFC अॅप डाऊन लोड करण्यास सांगुन त्यांचे नमुद अॅपचे खातेदार होण्याकरीता सांगितले त्याकरीता शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्यासाठी व फिर्यादी यांना शेअरचा आय.पी.ओ. मिळेल त्यामधुन फिर्यादी यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे सांगुन तसेच शेअर्स मध्ये फिर्यादी यांना झालेल्या प्रॉफिट मध्ये टॅक्सची रक्कम ट्रान्सफर करावी लागेल असे सांगून बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगुन फिर्यादी यांची रुपये १०,४७,७००/-रु.ची ऑनलाईन फसवणुक केली आहे.पोलीस निरीक्षक(गुन्हे) सर्जेराव कुंभार मो.नं. ९९२३०७५४३४ याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

अजितदादा- सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर असूनही टाळला संवाद-अन भाषणात मात्र केले सवाल- जवाब

अजितदादा पूर्वी म्हणत महापालिका निवडणूका घेऊन दाखवा , आता ते त्यावर स्पष्टीकरण देऊ लागलेत
जे अजितदादा सत्तेत जाण्यापूर्वी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनुक का ढकलता ? का घेत नाहीत ? घेऊन दाखवा असे जाहीर आव्हान भाजपाला देत तेच अजित दादा आता सत्तेत आल्यावर या निवडणुका का पुढे गेल्यात ,का रखडल्या याचे स्पष्टीकरण देऊ लागलेत
.

पुणे-वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी त्यांनी एकमेकांशी बोलणे टाळले. मात्र रखडलेल्या पालिका निवडणुकांच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये सवाल- जवाब झाल्याचे पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे यांनी भाषणात आधी मागणी केली तर त्यावर अजित पवार यांनीही प्रत्युत्तर दिलेयावेळी बोलतांना सुप्रिया सुळे यांनी (अजितदादा सत्तेत जाण्यापूर्वी म्हणत महापालिका निवडणूक घेऊन दाखवा, याकडे अप्रत्यक्ष लक्ष वेधत) ”माझी राज्य सरकारकडे मागणी आहे. इथे अनेक दिवस नगरसेवक नाही, गेल्या दोन-अडीच वर्षांत इथे निवडणूक न झाल्यामुळे या भागातल्या जनतेनं कुणाकडे प्रश्न मांडावेत? हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी नगरसेवकाची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यामुळे नगरसेवकांची निवडणूक आपण लवकरात लवकर घेतली, तर या भागातल्या लोकांना मोठा आधार मिळेल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तर अजित पवार यांनीही त्यांच्या भाषणात सुप्रिया सुळे यांच्या या मागणीवर प्रत्युत्तर दिले आहे. ”दोन वर्षांपेक्षा जास्त काळ महानगर पालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. पण त्या सर्वोच्च न्यायालयामुळे थांबल्या आहेत. आम्हीही लोकांमधून निवडून आलेले कार्यकर्ते आहोत. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी असं आम्हालाही वाटतं. पण सर्वोच्च न्यायालयात ओबीसी यासंदर्भातला एक मुद्दा गेला आहे. त्याचा निकाल लवकर लागत नाहीये. राज्य सरकार सातत्याने त्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्यात याच मताचं महायुतीचं सरकार आहे”, असे अजित पवार म्हणाले.
मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय- अजितदादा
तर दुसरीकडे अजित पवार यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे असे विधान केले. ते म्हणाले- आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोंदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. ही गाठ मनाशी बाळगा आणि पुढील काही वर्षात अजून विकासाला चालना मिळेल, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे.

‘शिवजागरा’ने दुमदुमली राजधानी!

महाराष्ट्राची लोकधारा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रेक्षकांची भरभरून दाद

नवी दिल्ली, : राजधानी नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त ‘शिवजागर : साद सह्याद्रीची’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी सुमारे २०० कलाकारांनी सादर केलेल्या भव्य सादरीकरणास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

नवी दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने तर विवेक व्यासपीठातर्फे या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अपर सचिव आनंद पाटील तसेच नवी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियलचे कर्नल (नि.) मोहन काकतीकर यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे, विवेक व्यासपीठाचे निमेश वहाळकर आणि कृष्णात कदम उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्यगीताने झाला. यावेळी कर्नल (नि.) मोहन काकतीकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्ष कार्यक्रमाचे नवी दिल्लीत आयोजन होणे हे गौरवाचे आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळेच आजचा भारत समर्थपणे उभा आहे. मुघल औरंगजेबाचा पराभव करून मराठ्यांनी शिवरायांच्या प्रेरणेने अटकपर्यंत आपले साम्राज्य निर्माण केले होते. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अपर सचिव आनंद पाटील म्हणाले की, संघर्ष करणे हा मराठी माणसाचा स्थायीभाव आहे. मराठी माणसाला ही प्रेरणा मिळते ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्या काळात क्रांती घडवली होती. त्यांनी मुघलांशी अविरत संघर्ष केला, अगदी औरंगजेबाच्या कैदेतही त्यांना राहावे लागले. त्यांनी नव्या युगाचा प्रारंभ केला. शिवरायांना घडवले ते जिजाऊनी. हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांच्याच मनात आली आणि त्यांनी ती शिवाजी महाराजांच्या मनात ती संकल्पना उतरवून ती प्रत्यक्षातही उतरवून दाखवली. त्यामुळेच शिवचरित्र आजही मार्गदर्शक असल्याचे आनंद पाटील यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, सामूहिक नृत्य, पोवाडा व लोककला सादरीकरण, चित्रकला, रांगोळी, शिवकालीन साहसी क्रीडाप्रकारांचे सादरीकरण अशा विविध प्रकारच्या कलात्मक सादरीकरणाचा सहभाग होता. तब्बल २०० कलाकार या सादरीकरणात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोप पावत चाललेल्या अनेक लोककलांचे दर्शन ‘महाराष्ट्राची लोकसंस्कृती’ या भागातून घडवण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा भव्य प्रसंग ‘शिवपर्व’ या भागातून मांडला गेला. अमित घरत यांनी या संपूर्ण कला सादरीकरणाचे नृत्य दिग्दर्शन केले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

कार्यक्रमास दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिसरातील मराठी जनांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दिल्लीतील विविध मराठी संस्था-संघटनांचे सदस्य – पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नूतन मराठी विद्यालयासह अन्य शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थीही उपस्थित होते. यावेळी देशाच्या राजधानीत शिवछत्रपतींचे कार्य नेमकेपणाने मांडल्याबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनीदेखील समाधान व्यक्त केले.

लोकसभा निवडणूक २०२४; मुंबई शहर जिल्ह्यातील तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा 

मुंबई :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४’ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मध्यवर्ती मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या समवेत, कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे,अपर जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, स्वीप नोडल ऑफिसर फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, संबंधित अधिकारी यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री. यादव यांनी भेटी दरम्यान ईव्हीएम मशीन, स्ट्रॉंग रूम सुरक्षा आणि सुरक्षितता याबाबत स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून स्वतः सर्व जागेची पाहणी करून आढावा घेतला. निरंतर मतदार नोंदणी ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज बाबत केलेली कार्यवाही, नवमतदार नोंदणी, जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, मतदान केंद्र, आरक्षित मतदार केंद्र, जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर किमान सुविधाचा आढावा, राष्ट्रीय सेवा तक्रार पोर्टल (NGSP)वरील तक्रारीबाबत तातडीने निपटारा करणे, मतदान केंद्रातील व्यवस्थापन,वेब कास्टिंग, रूट मॅप, सेक्टर मॅप, क्षेत्र नकाशा, संप्रेषण योजना (Communication Plan), मतदान कक्षात मतदार सहाय्यकांच्या नियुक्ती,वाहन व्यवस्था याबाबत सविस्तर आढावा घेऊन स्थानिक काही अडचणी आहेत का जाणून घेतल्या.

मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून मतदान प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या  उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी भेटी दरम्यान स्थानिक  वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सोबत चर्चा संबंधित अधिकारी यांनी दिले.

काल कुलाबा,मलबार हिल,मुंबादेवी,भायखळा विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. तर आज धारावी,सायन कोळीवाडा,माहिम,वडाळा विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या  सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करून  निवडणूक काळात सर्व यंत्रणांनी आपली कर्तव्य चोखपणे बजावीत आणि  मतदान केंद्रावरील नियमितपणे स्थितींचा आढावा घ्यावा अशा सूचना निवडणूक अधिकारी श्री.संजय यादव यांनी यावेळी दिल्या.

नवीन मतदार नोंदणी वाढविण्यासाठी  विशेष प्रयत्न करावेत आणि  मतदार केंद्रातील बदल व ईव्हीएम मशीन, स्ट्रॉंग रूम संदर्भात  स्थानिक लोकप्रतिनिधी व  राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना विश्वासात घ्यावे, अशा सूचनाही श्री. यादव यांनी यावेळी दिल्या.

वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन

‘पीएमआरडीए’ क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि.१०: पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे मध्ये उभारण्यात येणाऱ्या  मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

वारजे येथील कै.अरविंद बारटक्के दवाखाना येथे आयोजित या कार्यमक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, , पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, देशात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. नेदरलँडच्या विमा कंपनीने जोखिमीची हमी घेतली असल्याने सर्वदृष्टीने फायदेशीर असा हा प्रकल्प आहे. रुग्णालयाच्या खर्चावरील व्याजाचा दर केवळ सव्वा टक्के असल्याने रुग्णालयातील दरही कमी असतील. रुग्णालयात नेदरलँडने मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुण्यासह महाराष्ट्रात खाजगी भागिदारीतून अशा आरोग्य सुविधा उभारता येतील, असे त्यांनी सांगितले.

वारजे येथे उत्तम दर्जाचे पोलीस स्टेशन उभारण्यात येईल, त्यासाठी जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी. नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी दूर होईल. पुणे, पिंपरी चिंचवड शहर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हे राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन असल्याने या भागाच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कोविड संकटाच्या काळात वैद्यकीय सुविधांचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे गेली दोन वर्षे वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला. गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन संवेदनशील असून त्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येत आहेत. सामान्य माणसाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची कल्पना पुढे आली. या रुग्णालयातील १० टक्के खाटा मोफत आणि ६ टक्के खाटा शासकीय दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तम सुविधा असलेले रुग्णालय नागरिकांसाठी उभे रहाणार आहे. बाणेर येथेदेखील ५५० खाटांचे रुग्णालयही उभारण्यात येत आहेत.

महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या ५०० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर व्हाव्यात अशी इच्छा शासनाची आहे. शास्तीकराच्या वसुलीला स्थगिती दिली असून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूकीनंतर त्यासाठी आवश्यक शासन निर्णय काढण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार सुळे म्हणाल्या, नव्याने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल असा विश्वास व्यक्त करून रुग्णालयात सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा दिली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदार तापकीर म्हणाले, येथे ३७५ खाटांच्या या रुग्णालयात नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. खडकवासला येथे ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार आहे. खडकवासला परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी शासनाचे सहकार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आयुक्त विक्रम कुमार यांनी महानगरपालिकेच्या विकासकामांबाबत माहिती दिली. घोरपडी येथील उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जर्मनीच्या स्टीफन यांचा संदेश दाखविण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने घोरपडी येथे पुणे-सोलापूर रेल्वे लाईनवर उभारण्यात आलेला उड्डाणपूल आणि वारजे येथील समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच घोरपडी येथील पुणे-मिरज रेल्वे लाईनवर नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल आणि वारजे येथील २४ मीटर डिपी रस्त्याचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.

00000

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात विविध विकासकामांचे लोकार्पण

वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहराचा नियोजनबद्ध विकास करा-देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ९ : पिंपरी चिंचवड शहरात उद्योग, मॅन्युफॅक्चरींग, तंत्रज्ञान, फळ प्रक्रीया क्षेत्रात मोठी गुंतवणूक येऊन रोजगाराच्या संधी येत आहेत. रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक शहराकडे येत असतांना शहर सुंदर व स्वच्छ असण्याची गरज आहे. महानगरपालिकेने शहरीकरणाचा वेग आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहराचा नियोजनबद्ध विकास करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभागृहात आयोजित विविध विकासकामांच्या लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून पुढे येत आहेत. शहरात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. असे होत असतांना शहर बकाल होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनाही राबविण्यात येत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजांनुसार सुविधा निर्माण कराव्या लागतील. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील विस्ताराचा विचार करून पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे असून राज्य शासनही शहराच्या विकासासाठी सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्री. फडणवीस म्हणाले, एखाद्या शहराला परिपूर्ण करणाऱ्या गोष्टींची सुरूवात आजच्या कार्यक्रमाद्वारे व्यवस्था होत आहे. आरोग्य, पर्यावरण, शिक्षण उपक्रमांची सुरूवात होत आहे. वेस्ट टू बायोगॅस आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनासोबत शहर स्वच्छ राखण्यास आणि इंद्रायणीचे पावित्र्य राखण्यास मदत होणार आहे. शहरातील हवेतील गुणवत्ता वाढण्यासही या प्रकल्पांमुळे मदत होईल. सांडपाणी नदीनाल्यात थेट सोडता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे, सांडपाणी प्रकल्पातून स्वच्छ केलेले पाणी सिंचनासाठी देण्याचा प्रयत्न आहे. असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या अपेक्षाला मुर्तरूप देण्याचे काम या प्रकल्पांच्या माध्यमातून केले आहे. शिक्षण, आरोग्यासोबत रोजगार महत्वाचा असल्याने बचत गटांना बाजार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत आहे. या माध्यमातून महिलांना अर्थचक्राचा भाग बनविता येईल. त्यासोबत महानगरपालिकेने कौशल्यावर आधारीत कार्यक्रमाची स्तुत्य सुरूवात केली आहे. मनोरंजन आणि प्रबोधनासाठी टाऊन हॉल महत्वाचा ठरेल. आज शुभारंभ होत असलेल्या पायाभूत सुविधांचादेखील शहराला लाभ होऊन पुण्यासारखाच विकास झालेले शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण होईल, शहरासाठी आधुनिक पोलीस आयुक्तालय उभारण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आमदार श्री.लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात पुढील २० वर्षांचा विचार करून विकासकामे करण्यात आली आहेत. भविष्यातले शहर म्हणून विविध सुविधा येथे निर्माण करण्यात येत आहेत. खेळाडुंसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त श्री.सिंह यांनी महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. पिंपरी चिंचवड शहरात अनेक चांगले बदल होत असून स्वच्छता, दर्जेदार पायाभुत सुविधा याबाबत महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. मोशी येथे 700 खाटांचे रुगणालय उभारण्यात येणार असून त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला चांगले उपचार देता येतील असे त्यांनी सांगितले. लोकार्पण करण्यात आलेले विविध कामांमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.

श्री. फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.

चिखली येथील टाऊन हॉल, भोसरी आणि बोऱ्हाडेवाडी येथील युवक व युवतींना रोजगार व प्रशिक्षण देणारा ‘कौशल्यम’ प्रकल्प, नवी दिशा प्रकल्पाअंतर्गत भोसरी येथील स्टीचिंग युनिट, मोशी येथील हॉटेल वेस्ट टू बायोगॅस प्रकल्प आणि प्रभाग क्र.७ भोसरी गावठाणातील स.नं. १ मध्ये कबड्डी प्रशिक्षण केंद्र तसेच अनुषंगिक कामाचे उद्घाटन करण्यात आले. महिला बचत गट सक्षमीकरण अंतर्गत ‘सक्षमा’ प्रकल्पाचा व मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग टप्पा २ कामाचा यावेळी शुभारंभ करण्यात आला.

१७.९ टन प्रतिदिन क्षमतेच्या जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाट प्रकल्प, भोसरी स.नं.२१७- पंपिंग स्टेशनच्या अतिरिक्त वीज वापरण्याच्या ठिकाणी एनर्जी सेव्हिंगसाठी आवश्यक क्षमतेच्या एसटीपीचे, कुदळवाडी- जाधववाडी भागातून इंद्रायणी नदीस मिळणाऱ्या नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम एनसीएपी अंतर्गत हवा शुद्धीकरण प्रणाली ॲड्री मिस्ट आधारित कारंजे प्रणाली, स्थिर धुके तोफ युनिटचे, चऱ्होली येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत निवासी सदनिकांचे आणि निगडी येथील जय ट्रेडर्स येथील पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

मोशी येथील गट क्र. ६४६ मधील गायरान जागेमध्ये उभारण्यात येणारे रुग्णालय, पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील एकूण १२.४ किमी लांबीच्या नवीन डीपी रस्त्याचे, भोसरी मधील प्रभाग क्र.७ येथील मनपा शाळेसाठी बांधण्यात येणारी इमारत, निगडी, दापोडी रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार विकसन करणे, मुकाई चौक ते चिखली स्पाईन रस्ता विकसित करणे, त्रिवेणी नगर चौकातील स्पाईन रस्त्याची मिसिंग लिंक रस्ता विकसित करणे व भक्ती शक्ती ते मुकाई चौक बीआरटी कॉरीडॉर विकसित करणे या कामांचे भूमिपूजनदेखील श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.