पुणे- लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन फसवुन नेपाळ येथे पळुन जाण्याच्या तयारीत असणा-या आरोपीला कोंढवा तपास पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’
लष्कराच्या सदन कमांड येथे पूर्वी ड्रायव्हर म्हणुन नोकरी करणा-या व लष्करात नोकरी लावुन देण्याच्या आमिषाने पैसे घेवुन बनावट अपॉयमेन्ट लेटर देवुन फसवणुक करणा-या गणेश बाबुलाल परदेशी याने पुन्हा कोंढवा भागातील फिर्यादी यांच्या मुलीना तसेच त्याच्या इतर नातेवाईकांना त्याची लष्करातील बडया अधिका-याशी ओळख असल्याचे सांगुन लष्करात सिव्हिलियन या पदावर नोकरीला लावतो म्हणुन ८,३२,०००/-रु घेवुन नोकरी न लावता फसवणुक केली होती. त्याबाबत कोंढवा पो.स्टे. येथे गुरन.११८९/२०२४, भा.दं. वि. कलम ४०६,४२०,४६४(अ),४६५,४६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा केल्यानंतर आरोपी याने त्याचा रहाता पत्ता बदलुन दुस-या ठिकाणी राहण्यास जावुन मोबाईल नंबर बदलले होते. सदर आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोढवा पो.स्टे. संतोष सोनवणे व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे व स्टाफ असे शोध घेत असताना दि.०८/०३/२०२४ रोजी तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक, लेखाजी शिंदे पोलीस अंमलदार विकास मरगळे, शंशाक खाडे यांना माहिती प्राप्त झाली की, सदर आरोपी हा एन.आय.बी.एम. रोड सांळुखे विहार येथील महालक्ष्मी स्टेशनरी सेंटर येथे तोडाला रुमाला बांधुन आपली ओळख लपवुन सामान घेण्यासाठी आला आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने तात्काळ तपास पथकातील स्टाफ सह वरील ठिकाणी जावुन गणेश बाबुलाल परदेशी हा स्टेशनरी दुकानातुन सामान खरेदी करुन निघुन जात असतांना त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश बाबुलाल परदेशी रा. कृष्ण केवल सोसायटी, एन.आय.बी.एम. रोड कोढवा खुर्द पुणे असे सांगितले.
त्यास पोलीस ठाणे येथे आणुन त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर आरोपी याने अजुन काही तरुणांना बेरोजगारीचा फायदा घेवुन नोकरीचे आमिष दाखवुन फसविले असल्याबाबत माहिती प्राप्त होत असुन त्याबाबत अधिक तपास पोलीस उप निरीक्षक वैभव सोनवणे हे करित आहे.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परि.५ आर. राजा, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पो. नि. लेखाजी शिंदे, सहा. पो. नि. दिनेश पाटील, पोलीस उप निरीक्षक, वैभव सोनवणे पोलिस अमंलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, अभिजीत रत्नपारखी, शशांक खाडे विकास मरगळे, राहुल थोरात, सुहास मोरे, जयदेव भोसले, अभिजीत जाधव, आशिष गरुड, रोहित पाटील, अक्षय शेंडगे यांनी केली आहे.