पुणे- शेअर ट्रेडींगचे IPO HDFC अॅप डाऊन लोड करण्यास सांगुन १०,४७,७००/-रु.ची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी विमान नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सांगितलेकी ,’ विमानतळ पोलीस ठाण्यात भादविक ४१९,४२०,३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अन्वये एका ४० वर्षीय लोहगाव स्थित व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
ऑनलाईन माध्यमाव्दारे यातील संबंधित आरोपी मोबाईल धारक व वापरकर्ते असलेले अॅडमिन वापरकर्ता आहेत यांनी फिर्यादी यांचेशी संपर्क करून शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट कमवून देणा-या शेअरसची माहिती देतो त्याद्वारे मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मिळेल तसेच शेअर ट्रेडींगचे IPO HDFC अॅप डाऊन लोड करण्यास सांगुन त्यांचे नमुद अॅपचे खातेदार होण्याकरीता सांगितले त्याकरीता शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्यासाठी व फिर्यादी यांना शेअरचा आय.पी.ओ. मिळेल त्यामधुन फिर्यादी यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे सांगुन तसेच शेअर्स मध्ये फिर्यादी यांना झालेल्या प्रॉफिट मध्ये टॅक्सची रक्कम ट्रान्सफर करावी लागेल असे सांगून बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगुन फिर्यादी यांची रुपये १०,४७,७००/-रु.ची ऑनलाईन फसवणुक केली आहे.पोलीस निरीक्षक(गुन्हे) सर्जेराव कुंभार मो.नं. ९९२३०७५४३४ याप्रकरणी अधिक तपास करत आहे.