Home Blog Page 1151

पुण्यात अजूनही वाहतो आहे ड्रग्जचा पूर ..३५ लाखाचे ड्रग्ज पकडले ७ जणांना अटक

फुरसुंगी, येवलेवाडी, उंड्री, पिसोळी, मांजरी, वानवडी, कोंढवा परिसरात कारवाई

पुणे-गेल्या काही वर्षात पुण्याला झालंय तरी काय ? का इथून वाहतो आहे अंमली पदार्थांचा महापूर ३ ते ४ हजार कोटीच्या ड्रग्जच्या साठ्याचा नव्यानेच आलेल्या पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी छडा लावला आणि येथून ड्रग्जचा सागर वाहत असल्याचे निदर्शनास आले.अजूनही हा सागर आटलेला नाही आज आणखी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करुन, एकुण ०५ गुन्हे नोदवुन ७ आरोपी अटक करुन त्यांच्याकडील ३५ लाख रुपयांचे एकुण १७१ ग्रॅम अंमली पदार्थ पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत
झिरो टोलरंन्स टु ड्रग या मोहिमेअर्तगत पोलीस आयुक्तअमितेश कुमार यांनी ड्रग फ्रि पुणे हे अभियान राबवुन पुणे शहरातील अमली पदार्थाचे समुळ उच्चाटण करणे बाबत आदेश निर्गमित केले होते. त्या अनुशंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अभिलेखावरील अंमली पदार्थ गुन्हयातील आरोपीचे चेकींग मोहीम राबविणे चालु आहे.
या मोहीमे अंतर्गत गुन्हे शाखा पुणे शहर यांनी आज रोजी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे व पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली १५ पथके नेमुन ती दि.२०/०३/२०२४ रोजी हडपसर पोलीस स्टेशन व कोंढवा पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रातील फुरसुंगी, येवलेवाडी, उंड्री, पिसोळी, मांजरी, वानवडी, कोढवा या हद्दीमध्ये रवाना करण्यात आली होती. या टिमने रेकॉर्डवरील आरोपी तसेच पेडलर यांना चेक केले. सदर ऑपरेशन दरम्यान एकुण ५ आरोपी यांचे घराची झडती घेतली असता, त्यांचे घरामध्ये अंमली पदार्थ मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले आरोपींची नावे १) आयडोफो फेबिन येनेडयु, रा. रॉयल मेडिकल बाजुची गल्ली, जगदंबा भवन रोड, पिसोळी, पुणे याचेकडे २४ ग्रॅम एम.डी. २) ओलामाईड क्रिस्टोफर कायोदे, रा. तिसरा मजला, सी.एन.जी. पेट्रोल पंपाचे जवळ, हॉटेल अपना जवळ, येवलेवाडी, कोंढवा, पुणे याचेकडे ३० ग्रॅम एम.डी. ३) कोहिंदे सोदीक इद्रीस, रा. गल्ली नं. ३, श्रीनाथ नगर, रंगीचा वाडा, गोपाळपट्टी, मांजरी, पुणे यांचेकडे ३४ ग्रॅम एम.डी. ४) जाहीटी ट्राबी सेव्हेरीन ५) इमॅन्युअल नवातु रा. बांदलवस्ती, लेन नं.१, उंड्री वडाची वाडी रोड, बांदल यांचे बंगल्याजवळ, पुणे यांचेकडे २६ ग्रॅम एम. डी. असा एकुण ११४ ग्रॅम अंमली पदार्थ (एम.डी.) किंमत रुपये २२,००,०००/- चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे. तसेच सदर आरोपीकडुन तीन दुचाकी वाहने कि.१,००,०००/- असा एकुण २३,००,०००/- लाख रुपयेचा मुद्‌द्माल जप्त करण्यात आला आहे. तसेच वरील आरोपी यांचे घर झडती दरम्यान अनधिकत वास्तव्यास असणारे ११ परदेशी नागरीक यांचेवर योग्य ती पुढील कारवाई करणेत येत आहे.या आरोपींपैकी आरोपी १) आयडोफो फेबिन येनेडयु, २) ओलामाईड क्रिस्टोफर कायोदे, ३) कोहिंदे सोदीक इद्रीस, हे तीन आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असुन, त्यांचेवर पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी ४) जाहीटी ट्राबी सेव्हेरीन ५) इमॅन्युअल नवातु हे ड्रग पेडलरचे काम करीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर आरोपी यांना ताब्यात घेवुन, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी हडपसर पोलीस स्टेशन व कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये एकुण ४ गुन्हे दाखल केलेले आहेत.
तसेच आज दिनांक २०/०३/२०२४ रोजी कोथरुड पोलीस स्टेशन यांनी पेट्रोलिंग करीत असताना, गुणश्री सोसायटी जवळील रिकामे मैदान, किनारा चौक, कोथरुड, पुणे येथे ०२ इसम नामे १) ईर्शाद समशेर खान वय ३१ वर्ष धंदा. मजुरी रा. फ्लॅट नं २०१, ईम्नीस्टी बिल्डींग, नयानगर, मीरा रोड, जि ठाणे (२) ईक्वाल समशेर खान वय ३७ वर्ष धंदा. खाजगी नोकरी रा. फ्लॅट नं २०१, ईम्नीस्टी बिल्डींग, नयानगर, मीरा रोड, जि ठाणे यांना ताब्यात घेवुन, त्यांच्याकडुन ५७ ग्रॅम इतक्या वजनाचे मेफेड्रॉन (एम.डी.) अंदाजे किंमत १२,०००००/- रुपये चा अंमली पदार्थ मिळून आला. त्या अनुषंगाने कोथरुड पोलीस ठाणे येथे वरील नमुद आरोपी यांचे विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आज रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तलायाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करुन, एकुण ०५ गुन्हे नोदवुन ७ आरोपी अटक करुन त्यांचे ताब्यातुन एकुण १७१ ग्रॅम अंमली पदार्थ किंमत रुपये ३५,००,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, . सह पोलीस आयुक्त प्रविण पवार,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ सुनिल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ सतिश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरूड पोलिस स्टेशनचे शाखेकडील ७ पोलीस निरीक्षक १५ सहा, पोलीस निरीक्षक/ पोलीस उप निरीक्षक कोथरुड पो.स्टे. कडील पो. स्टाफ यांनी केलेली आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ई-लायब्ररीची सुविधा

पुणे, दि. २०: कारागृहातील बंद्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, विज्ञान आदी क्षेत्रातील प्रसिद्ध पुस्तके संगणकावर पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी उपलब्ध व्हावीत यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये ई-लायब्ररीची सुविधा सुरु करण्यात आली असून या लायब्ररीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, उपअधीक्षक डॉ. भाईदास ढोले, पी. पी. कदम, आर. ई गायकवाड, एम. एच. जगताप, वरिष्ठ तुरुंग अधिकारी आनंदा कांदे आदी उपस्थित होते.

कारागृहातील बंद्यांसाठी ‘ई-लायब्ररी’ हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या संकल्पनेतून व पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या ई-लायब्ररीमध्ये विविध पुस्तके पीडीएफ स्वरुपात संगणकावर बंद्यांना वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली असून या उपक्रमामुळे बंद्यांमध्ये सकारात्मक भावना वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होणार आहे, असे कारागृहाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

एयर इंडियातर्फे बेंगळुरू- सॅन- फ्रान्सिस्को क्षेत्रात सेल्फ चेक- इन बॅगेज सुविधा लाँच

• भारतातील अमेरिकी प्रवाशांसाठी ही स्वयंचलित सुविधा पुरवणारी पहिली आणि एकमेव विमानकंपनी

• बेंगळुरू विमानतळासह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ही सेवा देणारी पहिली विमानकंपनी

गुरुग्राम२० मार्च २०२४ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या विमानवाहतूक कंपनने सेल्फ- सर्व्हिस चेक- इन आणि सेल्फ बॅगेज ड्रॉप सुविधा लाँच केली असून केंपेगौडा विमानतळ बेंगळुरू ते सॅन फ्रान्सिस्कोदरम्यान प्रवास करणाऱ्यांना तिचा लाभ घेता येईल.

ही सुविधा एयर इंडियाच्या देशांतर्गत विमानवाहतुकीवर विमानतळांवर उपलब्ध असून बेंगळुरूपासून एयर इंडियाद्वारे सेवा दिल्या जाणाऱ्या सिंगापूर आणि मेल शहरात ही सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.

ही स्वयंचलित सेवा बेंगळुरू- भारताच्या सिलिकॉन व्हॅलीवरून जगाचे तंत्रज्ञान हब असलेल्या सिलिकॉन व्हॅलीपर्यंत प्रवास करणाऱ्या आमच्या टेक- सॅव्ही ग्राहकांना विमानतळावर सुलभ सेवा देईल.

या सुविधेचे उद्घाटन करताना एयर इंडियाच्या ग्लोबल एयरपोर्ट ऑपरेशन्स आणि ग्राउंड हँडलिंग विभागाचे प्रमुख डोनाल्ड हंटर म्हणाले, ‘प्रत्येक टचपॉइंवर ग्राहकांना मिळणारी सेवा उंचावण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. या सुविधेमुळे चेक- इन काउंटरवर प्रतीक्षा करण्याचा वेळ वाचतो व प्रवाशांना सहजपणे बोर्डिंग करता येते. आम्ही ही सुविधा आणखी भारतीय व जागतिक विमानतळांवर देण्याचे ध्येय ठेवले आहे.’ याप्रसंगी बीआयएएल, सीआयएसएफ आणि एयर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सेल्फ चेक इन आणि बॅजेग ड्रॉप सुविधेमुळेएयर इंडियाच्या प्रवाशांना बोर्डिंग पास पकिंवा बॅगेज टॅग प्रिंट करण्यापासून आणि आपले बॅगेज देण्यात आलेल्या स्लॉटवर आपोआप ड्रॉप करण्यापर्यंत सहज सुरळीत अनुभव मिळतो. या सुविधेमुळे चेक इन काउंटरवर प्रतीक्षा करावी लागत नाही. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, शिवाय त्यांना प्रवासाचा सुखद अनुभव मिळतो. ग्राहकांना आता त्यांच्या पसंतीच्या सीट उपलब्धतेनुसार निवडणे, फ्रीक्वेंट फ्लायरचे तपशील अद्ययावत करणे आणि इतर सुविधांचा किऑस्कमध्येच लाभ घेता येईल.

पूर्वी एयर इंडियाने दिल्ली विमानतळावर टर्मिनल ३ येथे सेल्फ बॅगेज ड्रॉप आणि सेल्फ किऑस्क चेक- इन सेवा केवळ देशांतर्गंत आणि ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सुरू केली होती.

विज्ञान प्रदर्शनातून दिसली विद्यार्थ्यांची प्रतिभा

‘मेक इन एमआयटी डब्ल्यूपीयू पॅव्हेलियनचे’ उद्घाटनः ४० विज्ञान आधारित प्रकल्प सादर

पुणे, दि. २० मार्च :“विज्ञान हे एकमेव माध्यम आहे जे आपल्याला दररोज नवनवीन शोधांसाठी प्रेरित करते. विज्ञान आपल्या जीवनातील नाविन्य राखते, आज आपल्याला अशा नवीन शोधांची नितांत गरज आहे, जे आपल्या गरजा कमीत कमी किंवा पर्यावरणाची कोणतीही हानी न करता पूर्ण करतात.” असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित ‘ मेक इन एमआयटी डब्ल्यूपीयू पॅव्हेलियनचे’ उद्घाटन बुधवारी विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व हॅक एमआयटी डब्ल्यूपीयूचे मुख्य संयोजक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पाडे उपस्थित हेाते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित आहे.
इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इनव्हेंशनची संस्कृती वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘ मेक इन एमआयटी डब्ल्यूपीयू पॅव्हेलियन’ मध्ये एमआयटी डब्ल्यूपीयूच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ४० विज्ञान आधारित प्रकल्प होते. विद्यार्थ्यांना स्वतःची कल्पना साकार करून त्याला मुर्तरूप देणे. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया संस्कृती वाढविण्यासाठी याची मदत होणार आहे.
या विज्ञान प्रदर्शनीत वेधशाळेच्या गुंतागुंतीपासून ते रोबोटच्या अचूकते पर्यंत, हायपरलूप प्रोटोटाइपच्या भविष्यवादी दृष्टीकोन ते सौर इलेक्ट्रिकल वाहनाद्वारे ऑफर केलेल्या शाश्वत उपयांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. इतर उल्लेखनीय प्रदर्शनांमध्ये इलेक्ट्रिक फॉर्म्युला स्टुंडंट कार, फिक्स्ड विंग यूएव्ही, हेक्साकॉप्टर, टेलेक्ट्रा, व्होल्टेइक, एमबाज ऑल टेरेने व्हेईकल, इबाज इलेक्ट्रिक ऑल टेरेन व्हेईकल आणि इलेक्ट्रिक गो कार्ट यांचा समावेश होता. त्याच प्रमाणे १९ वर्षाखालील विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारत या थीममध्ये रक्षा कवच सारखा प्रकल्प सादर केला.
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,” माइंड टू मार्केट आणि पेपर टू प्रोडक्ट ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी खूप महत्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव देऊन त्यांना चालना दयावी व त्यांची बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करून त्यांना उद्योजक बनविण्याचे धोरण प्रत्यक्षांत आणण्याच्या हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘ मेक इन एमआयटी डब्ल्यूपीयू पॅव्हेलियनचे’ आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना स्वतःची कल्पना साकार करून त्याला मुर्तरूप दयावयाचे आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया संस्कृती वाढविण्यासाठी याची मदत होणार आहे. ”

प्रगतीला जोड सातत्यपूर्ण कार्याची – अभय दप्तरदार

एमएसएमई उद्योजकांसाठी एमएसएमई मंत्रालय आणि इंजिनिअरिंग क्लस्टर यांच्या वतीने मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. २० मार्च २०२४) उद्योजकांनी व्यवसाय वृद्धीसाठी सातत्यपूर्ण कार्याची जोड दिली तर प्रगती साधता येईल असे प्रतिपादन एमएसएमई विकास आणि सुविधा कार्यालय मुंबईचे सहायक संचालक अभय दप्तरदार यांनी केले.
केंद्र सरकारच्या एमएसएमई विकास आणि सुविधा कार्यालय मुंबई आणि इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकांसाठी एमएसएमई स्पर्धात्मक (LEAN) योजनेवर जनजागृती कार्यक्रमाचे (MCLS) आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये इंजिनिअरिंग क्लस्टरचे संचालक सागर शिंदे, राजेश चव्हाण, संतोष तिडके, विजयराव देशमुख आदी उपस्थित होते.
दैनंदिन कामकाजाचे योग्य प्रकारे नियोजन करावे. उद्योजकाने प्रत्यक्ष कामात सहभागी न होता आपला मौल्यवान वेळ व्यवसाय वृध्दी, बाजारातील मागणी, नवीन तंत्रज्ञान या बाबींवर लक्ष केंद्रित करून पुढील धोरण निश्चित करण्यासाठी वापरता येईल, यातूनच उद्योजक आपली प्रगती साध्य करून देशाच्या विकासात हातभार लावू शकतात असे दप्तरदार यांनी सांगितले.
सागर शिंदे यांनी इंजिनिअरिंग क्लस्टरच्या कार्याचा आढावा घेतला. अभय दप्तरदार, मॅग्निफिकोचे संचालक राजेश सहस्त्रबुद्धे, सॅम स्क्वेअरचे संचालक प्रदीप कुलकर्णी आणि क्रेडियन्सच्या संचालिका प्राची कुलकर्णी यांनी तांत्रिक बाबींवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सागर शिंदे यांनी आभार मानले.

‘स्त्री कुटुंबाचा कणा’ – तेजश्री मोहिते

पीसीईटीच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझीईन मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

पिंपरी, पुणे (दि. २० मार्च २०२४) स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. तिच्यामध्ये अलौकिक शक्ती, जिद्द, चिकाटी आणि ऊर्जा निसर्गाने दिलेली आहे. संपूर्ण कुटुंबाला ती प्रेमाने घट्ट बांधून ठेवते. म्हणूनच भारतीय संस्कृती मध्ये स्त्री शक्तीचा गौरव करण्यात आला आहे, असे पीसीईटीच्या प्रशासकीय अधिकारी तेजश्री मोहिते यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझीईन मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोहिते बोलत होत्या.
यावेळी एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझीईनचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, एस. बी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, पीसीसीओई संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनुराधा ठाकरे, कल्याणी घारे आदी उपस्थित होते.
स्त्रीला नेहमी क्षमाशील, दयाळू कुटुंबाचा खंबीर आधार म्हणून पहिले जाते, असे डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले.
डॉ. अनुराधा ठाकरे म्हणाल्या स्त्रियांना समानतेसाठी संघर्ष करण्याची गरज नाही. स्त्री ही परिश्रमिक व सकारात्मक विचार करणारी व शांतीचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.
डॉ. महेंद्र सोनावणे म्हणाले, महिलांना जीवनामध्ये सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भविष्यात समान संधी उपलब्ध होतील. स्त्री आणि पुरुष ही कुटुंबाची दोन चाके आहेत. दोघांनी एकमेकांना समजून घेतले तर कुटुंबाची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रगती होईल.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयू चे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्किटेक शिवा शिशोदिया यांनी केले. प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे यांनी आभार मानले.

७२ तासांची मुदत संपली:सार्वजनिक ठिकाणच्या राजकीय जाहिराती तात्काळ काढा,अन्यथा….जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंचा अंतिम इशारा

आचारसंहिता भंग झाल्याचे आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करावेत

पुणे, दि. २०: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी; आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास मालमत्तेच्या विद्रुपीकरण प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली असून आयोगाने सर्व प्रकारच्या माध्यमातून शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतींवरील राजकीय पक्षांच्या जाहिराती, खासगी इमारतींवरील परवानगीशिवाय लावलेल्या जाहिराती, सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणच्या जाहिराती काढण्यास ७२ तासांची मुदत दिली होती.

मुदत पूर्ण झाली असल्याने शासकीय मालमत्तेच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर, पेपर्स किंवा कटइआऊट, होडींग्स, बॅनर्स, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारती तसेच शासकीय बसेवरील पक्षाच्या जाहिराती, रेल्वे स्थानके, बसस्टॅण्ड, विमानतळ आदी सार्वजनिक ठिकाणच्या राजकीय पक्षांच्या जाहिराती तात्काळ काढून घ्याव्यात. अशा जाहिराती आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार गुन्हे दाखल करावे.

पुणे महानगरपालिक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद यांनी महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ नुसार त्यांच्या मालकीच्या व अधिकारक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणच्या तसेच खासगी इमारतींवर विनापरवानगी लावलेल्या जाहिराती, बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज, भित्तीचित्रे आदी काढून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिले आहेत.

पीएमपीएमएल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बसेसवरील जाहिराती काढून टाकाव्यात. पुणे विमानतळाच्या प्रमुखांना तसेच रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे, देहू, खडकी कटकमंडळे तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांनाही आपल्या अधिकार क्षेत्रातील जाहिराती काढून टाकण्याचे आदेश देतानाच ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर असोसिएशनलाही जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपांवरील राजकीय जाहिराती काढून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मुंबई भाजपा निवडणूक संचलन समितीची आढावा बैठक संपन्न

मुंबई दिनांक २० मार्च २०२४

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई भाजपा कार्यालयात निवडणूक संचलन समितीची तिसरी आढावा बैठक पार पडली.

यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी बैठकीत निवडणूक संचलन समितीतील २२ विभागाच्या प्रमुखांकडून अद्याप केलेल्या कामाचा लेखाजोखा घेतला व तदनंतर त्यांना त्यांच्या दिलेल्या जबाबदारी अनुसार मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितीना निवडणुकीतील सद्यस्थितीतील परिस्थिती व कामाचा आढावा घेतला.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार, भाजपा स्थापना दिनानिमित्ताने होणारे ४०० कार्यक्रम, गुढीपाडव्याला हिंदुत्वाची गुढी तसेच १४ मार्च रोजी बाबासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण अशा आगामी कार्यक्रमांबाबत नियोजन तसेच सखोल चर्चा केली .

यावेळी समितीचे संयोजक आ. अतुल भातखळकर, आ. पराग आळवणी, आ. प्रवीण दरेकर, आ. अमित साटम, आ. पराग शाह, सरचिटणीस संजय उपाध्याय यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारात मतदान जनजागृती

पुणे, दि. २० : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील विविध आगारात अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान जागृती मंचाच्यावतीने मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये मतदार जागृती मंचाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील दौंड, शिरूर मंचर व भोर आगार तसेच बारामती कार्यशाळा येथे मतदान जागृती मंचाच्यावतीने मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाची शपथ घेतली. नैतिक मतदानाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना व मित्र परिवाराला मतदानाबाबत जागृत करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमांचे आयोजन

‘उत्सव लोकशाहीचा, अभिमान देशाचा’ या मतदार जनजागृती मोहीमअंतर्गत खेड येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबत समन्वय अधिकारी प्रा. मच्छिंद्र मुळूक व डॉ. प्रभाकर जगताप यांनी मार्गदर्शन केले. तसेच नैतिक मतदानाबाबत विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना जागृत करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली. ही मोहिम उप विभागीय अधिकारी खेड जोगेंद्र कट्यारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शेताच्या बांधावर मतदान जागृती

पुणे, दि. २० : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत असून त्याअंतर्गत तहसीलदार संजय नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव विधानसभा मतदार संघातील स्वीप पथक मतदान जनजागृतीसाठी धामणी गावात शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यासोबत त्यांनी मतदान प्रक्रीयेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास समन्वय अधिकारी सविता माळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणीच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले, शिक्षक वृंद, स्वीप पथकातील सदस्य आदी उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यात वाडी-वस्त्यांवर जावून मतदार जागृती करण्यात येत आहे. मतदारांना मतदार यादीत नाव शोधणे, मतदान केंद्रवारील सुविधा याबाबत माहिती देण्यात येत आहे. मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी अभिनव कल्पनांचा वापर कर्मचारी करीत आहेत. बस थांबा, आठवडे बाजार, गर्दीची ठिकाणे याठिकाणीदेखील फलक घेवून मतदारांना आवाहन करण्यात येत आहे.

स्वीप पथकाद्वारे धामणी गावातून मतदान जनजागृती रॅली व शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी लोकसभा आणि विधानसभेसाठी शंभर टक्के मतदान करण्याची विनंती करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी घोषणांच्या माध्यमातून मतदान जनजागृती संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला.

लोणी आठवडे बाजारात नागरिकांची भेट घेऊन त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. वयोवृद्ध नागरिकांसाठी मतदान केंद्रावर असणाऱ्या सुविधांची त्यांना माहिती देण्यात आली. मतदानाचे आवाहन करणारे फलक कर्मचाऱ्यांनी यावेळी प्रदर्शित केले. पेठ येथील महिला बचत गटाच्या महिलांनाही मतदान करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातही जनजागृती

पिंपरी विधानसभा मतदारसंघात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे म्हाळसाकांत विद्यालय येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील सदस्यांनी न चुकता मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मतदानाची शपथ घेण्यात आली.

विकास ढाकणे यांच्या बदलीला विरोध

पुणे- महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचा पुणे महानगरपालिकेतील कालावधी पूर्ण झालेला नसताना त्यांची बदली झाल्याने आज महापालिकेत काही नागरिकांनी निषेध नोंदविण्यासाठी व विरोध दर्शविण्यासाठी घोषणाबाजी करत आंदोलन केले तर माजी विरोधी पक्ष नेते उज्वल केसकर आणि प्रशांत बढे यांनीही या बदलीला आक्षेप घेत ती थांबवावी अशी मागणी केली आहे.

केसकर यांनी या संदर्भात असे म्हटले आहेकी,’मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या सूचनेच्या आणि मार्गदर्शक तत्त्वाच्या आधाराने काही बदल्या करणे प्राप्त होते त्या प्रमाणे त्या झाल्या असतील परंतु श्री विकास ढाकणे हे त्या बदलीच्या निकषात बसतील असे आम्हाला वाटत नाही पुण्यामध्ये कार्यरत असताना थोड्या कालावधीमध्ये अतिशय चांगलं शहराच्या विकासात भर टाकणार काम श्री विकास ढाकणे यांनी केलं आहे पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त नवीन एक अतिरिक्त आयुक्त नवीन आणि फक्त एकच जुने अतिरिक्त आयुक्त बिनवडे साहेब कार्यरत आहेत तसेच महापालिकेतील चार उपायुक्तांच्या देखील बदल्या झालेल्या आहेत या सगळ्या घडामोडीचा शहराच्या विकास कामांवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे विकास ढाकणे यांची झालेली बदली रद्द करून त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये ठेवावे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी श्री विकास ढाकणे यांना कार्यरत ठेवावे अशी मागणी आम्ही केली आहे.

महापालिकेत बी.पी. पृथ्वीराज नवे अतिरिक्त आयुक्त रुजू

पुणे-पुणे महानगरपालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार . बी.पी. पृथ्वीराज (भा. प्र.से) यांनी डॉ. कुणाल खेमनार (भा.प्र. से) यांचे कडून आज दि. २०/३/२०२४ रोजी स्वीकारला. डॉ. कुणाल खेमनार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पुणे महानगरपालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार . बी.पी. पृथ्वीराज (भा.प्र.से) यांनी स्वीकारल्या नंतर, त्यांनी सांगितले कि, पुणे महानगर पालिकेत काम करण्याची उत्तम संधी मिळालेली आहे, तसेच सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे.या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज ) रवींद्र बिनवडे उपस्थित होते.

भारती विद्यापीठ मधील विद्यार्थीनीच्या आत्महत्येच्या घटनेची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीरपणे दखल; घटनेची सखोल चौकशी करून चार्जशीट दाखल करण्याची पोलीसांना सूचना

विद्यापीठ,वसतीगृहांबाबत शासनाच्या कायद्यांची माहितीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी डॉ नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

पुणे दि.२०: पुण्यात भारती विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या एका विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आहे. याबाबत संबधीत पोलीस अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला असून, अशा घटना घडू नयेत याच्यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे, या घटनेच्या वस्तुस्थितीमध्ये जाऊन त्याबद्दलचे योग्य ते चार्जशीट पोलिसांनी दाखल करावं अशा प्रकारच्या सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत.

भारती विद्यापीठ मधील एका विद्यार्थिनीने रुममेटच्या त्रासाला कंटाळून आणि विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील मुलाच्या एकतर्फी प्रेम प्रकाराला घाबरून स्वतःला पेटून घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

याप्रकरणाची उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी गंभीरपणे दखल घेतली. याबाबत त्यांनी सांगितले की, साधारण चार दिवसांपूर्वी या मुलीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर तिचे दुर्दैवी निधन झाले. या संदर्भात पुणे पोलिसांच्या भारती विद्यापीठाच्या सहायक पोलीस आयुक्त यांच्याशी दूरध्वनीवरून तपशीलवार चर्चा करणेत आलेली आहे. यामध्ये त्या मुलीचे पहिले मृत्यूपूर्व पत्र आहे त्यामध्ये तिने परीक्षेचा ताण असह्य झाल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे म्हटलेले आहे. दुसऱ्या मृत्यूपूर्व पत्रामध्ये रूममेट व कँटीन कर्मचाऱ्यांने त्रास दिला असं म्हटलेलं आहे.

विद्यापीठाच्या वसतिग्रहामध्ये विद्यार्थी जेंव्हा राहतात त्यावेळी त्यांना काही बंधने पाळावी लागतात. तसेच शासनाचे कायदे प्रमाणे सर्वांना वागावे लागते. शासनाच्या छळ प्रतिबंधक कायदा आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिक शोषणाच्या विरोधी कायदा हे सर्व वस्तीगृहाला लागू आहेत. भारती विद्यापीठ हे अत्यंत प्रसिद्ध विद्यापीठ आहे. अशा निवासी वसतिगृहांच्या मध्ये असा कायदा आहे आणि आपल्याला कोणी त्रास दिला तर कोणाकडे तक्रार करायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. विद्यापीठां मधील सुप्रीटेंडंट्स किंवा युवक कल्याणशी अधिकाऱ्यांनी त्यांनी या मुलींना राहायला आल्यावर लगेचच या दोन कायद्यानुसार सविस्तर मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. अनेकदा पालकांचा मुलींवरती आणि मुलांवरती सुद्धा अभ्यासासाठी प्रचंड दबाव असतो. नवीन वातावरण, घराबाहेर राहायची सवय नाही, वसतिगृहात आल्यावर आलेला एकटेपणा या सगळ्यामुळे मुलं-मुली खूप तणावामध्ये असतात. अशा वेळेला कुटुंबीयांनी ही आपल्या पाल्याचे समुपदेशन करणे गरजेचे आहे.

सध्या या घटनेबाबत पोलीस तपशीलवार चौकशी करत आहेत आणि रूममेटने त्रास दिला तर त्याच्यामध्ये तिने प्रथम तक्रार किंवा माहिती कोणाकडे केली असेल तर त्याची माहिती पुरावे गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच तिच्या मानसिक आरोग्याबाबत तिने पूर्वी कोणाला माहिती दिली होती का ? आणि कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन असेल तर त्याची ही सखोल चौकशी करावी असे ही स्पष्ट करण्यात आलेले आहे असे डॉ नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे लेखी निवेदन निर्देश दिले आहेत. ज्या मित्र किंवा मैत्रीणीना तिच्या मानसिक अवस्थे बाबत काही माहीत असेल त्याची नावे गुपित ठेवून व त्यांना आवश्यक संरक्षण पुरवून माहिती गोळा करावी. अशा प्रकारच्या सूचनाही मी पोलिसांना दिलेल्या आहेत. वस्तीगृहात नव्याने रहावयास आल्यावर विद्यार्थ्यांना आवश्यक संरक्षण देण्याबाबत सूचना यापूर्वीच शिक्षण विभागाने घेतलेला आहे. यामध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी अनेक सूचना दिलेल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास संवेदनशील अधिकारी करत असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

लक्ष्मीनारायण जवळ उड्डाणपुलावर मध्यरात्री सोनसाखळी हिसका मारून पळविली

पुणे- उड्डाण पुलांवर आणि खाली देखी सीसी टीव्ही कॅमेरे किती जरुरीचे आहेत हे जाणवेल अशी चोरी लक्ष्मीनारायण सिनेमागृहा नजीक काल मध्यरात्री घडली .बिबवेवैत राहणारा एक २४ वर्षीय तरुण या उड्डाणपुलावरून जात असताना बरोबर मध्यभागी त्याला गाठून मोथर सायकलवरून आलेल्या दोघांनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारून पळविली .पोलिसांनी सांगितले हि जबरी चोरी रात्री पावणेबाराच्या सुमारास झाली . फौजदार येवले या प्रकरणी अधिक तपास करत आहेत .

 इमरान हाश्मी फरहान अख्तरसोबत या प्रोजेक्ट्स साठी करणार काम 

 बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या चर्चेत आहे कारण टायगर 3 , OTT शो शोटाइम आणि आता ग्राउंड झीरो या नव्या चित्रपटात दिसणार आहे. बॉलिवुड OG स्टार इमरान हश्मी आता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटसोबत त्याच्या पुढील प्रोजेक्ट ‘ग्राउंड झिरो’साठी सोबत काम करणार आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या या चित्रपटात इमरान पहिल्यांदाच भारतीय सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

‘ग्राउंड झिरो’ मध्ये बीएसएफ 2रा कमांड नरेंद्र नाथ धर दुबे याच्या प्रवासाचा इतिहास आहे ज्याची भूमिका इमरानने साकारली आहे. ‘ग्राउंड झिरो’ हा तेजस प्रभास आणि विजय देवस्कर दिग्दर्शित असलेला चित्रपट असून इमरानला कधीही न पाहिलेल्या अवतारात तो दिसणार आहे. 
संचित गुप्ता आणि प्रियदर्शी श्रीवास्तव यांनी लिहिलेल्या या चित्रपटात झोया हुसैन, सई ताम्हणकर, मुकेश तिवारी, रॉकी रैना, दीपक परमेश आणि ललित प्रभाकर (बदाणे) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
ग्राउंड झिरो’ हा प्रोजेक्ट इमरान साठी खास ठरणार आहे पण सोबतीला त्याचा अष्टपैलुत्वात भर घालते. कामाच्या आघाडीवर ‘ग्राउंड झिरो’ व्यतिरिक्त, इमरानकडे काही खास प्रोजेक्ट्स सुद्धा आहेत. सारा अली खान स्टारर ‘ए वतन मेरे वतन’मध्ये तो राम मनोहर लोहियाच्या भूमिकेत दिसणार आहे. पवन कल्याण अभिनीत ‘ओजी’ आणि ‘गुडाचारी 2’ या चित्रपटातून तो तेलुगू चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे.