फुरसुंगी, येवलेवाडी, उंड्री, पिसोळी, मांजरी, वानवडी, कोंढवा परिसरात कारवाई
पुणे-गेल्या काही वर्षात पुण्याला झालंय तरी काय ? का इथून वाहतो आहे अंमली पदार्थांचा महापूर ३ ते ४ हजार कोटीच्या ड्रग्जच्या साठ्याचा नव्यानेच आलेल्या पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी छडा लावला आणि येथून ड्रग्जचा सागर वाहत असल्याचे निदर्शनास आले.अजूनही हा सागर आटलेला नाही आज आणखी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करुन, एकुण ०५ गुन्हे नोदवुन ७ आरोपी अटक करुन त्यांच्याकडील ३५ लाख रुपयांचे एकुण १७१ ग्रॅम अंमली पदार्थ पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत
झिरो टोलरंन्स टु ड्रग या मोहिमेअर्तगत पोलीस आयुक्तअमितेश कुमार यांनी ड्रग फ्रि पुणे हे अभियान राबवुन पुणे शहरातील अमली पदार्थाचे समुळ उच्चाटण करणे बाबत आदेश निर्गमित केले होते. त्या अनुशंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अभिलेखावरील अंमली पदार्थ गुन्हयातील आरोपीचे चेकींग मोहीम राबविणे चालु आहे.
या मोहीमे अंतर्गत गुन्हे शाखा पुणे शहर यांनी आज रोजी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे व पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली १५ पथके नेमुन ती दि.२०/०३/२०२४ रोजी हडपसर पोलीस स्टेशन व कोंढवा पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रातील फुरसुंगी, येवलेवाडी, उंड्री, पिसोळी, मांजरी, वानवडी, कोढवा या हद्दीमध्ये रवाना करण्यात आली होती. या टिमने रेकॉर्डवरील आरोपी तसेच पेडलर यांना चेक केले. सदर ऑपरेशन दरम्यान एकुण ५ आरोपी यांचे घराची झडती घेतली असता, त्यांचे घरामध्ये अंमली पदार्थ मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले आरोपींची नावे १) आयडोफो फेबिन येनेडयु, रा. रॉयल मेडिकल बाजुची गल्ली, जगदंबा भवन रोड, पिसोळी, पुणे याचेकडे २४ ग्रॅम एम.डी. २) ओलामाईड क्रिस्टोफर कायोदे, रा. तिसरा मजला, सी.एन.जी. पेट्रोल पंपाचे जवळ, हॉटेल अपना जवळ, येवलेवाडी, कोंढवा, पुणे याचेकडे ३० ग्रॅम एम.डी. ३) कोहिंदे सोदीक इद्रीस, रा. गल्ली नं. ३, श्रीनाथ नगर, रंगीचा वाडा, गोपाळपट्टी, मांजरी, पुणे यांचेकडे ३४ ग्रॅम एम.डी. ४) जाहीटी ट्राबी सेव्हेरीन ५) इमॅन्युअल नवातु रा. बांदलवस्ती, लेन नं.१, उंड्री वडाची वाडी रोड, बांदल यांचे बंगल्याजवळ, पुणे यांचेकडे २६ ग्रॅम एम. डी. असा एकुण ११४ ग्रॅम अंमली पदार्थ (एम.डी.) किंमत रुपये २२,००,०००/- चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे. तसेच सदर आरोपीकडुन तीन दुचाकी वाहने कि.१,००,०००/- असा एकुण २३,००,०००/- लाख रुपयेचा मुद्द्माल जप्त करण्यात आला आहे. तसेच वरील आरोपी यांचे घर झडती दरम्यान अनधिकत वास्तव्यास असणारे ११ परदेशी नागरीक यांचेवर योग्य ती पुढील कारवाई करणेत येत आहे.या आरोपींपैकी आरोपी १) आयडोफो फेबिन येनेडयु, २) ओलामाईड क्रिस्टोफर कायोदे, ३) कोहिंदे सोदीक इद्रीस, हे तीन आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असुन, त्यांचेवर पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी ४) जाहीटी ट्राबी सेव्हेरीन ५) इमॅन्युअल नवातु हे ड्रग पेडलरचे काम करीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर आरोपी यांना ताब्यात घेवुन, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी हडपसर पोलीस स्टेशन व कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये एकुण ४ गुन्हे दाखल केलेले आहेत.
तसेच आज दिनांक २०/०३/२०२४ रोजी कोथरुड पोलीस स्टेशन यांनी पेट्रोलिंग करीत असताना, गुणश्री सोसायटी जवळील रिकामे मैदान, किनारा चौक, कोथरुड, पुणे येथे ०२ इसम नामे १) ईर्शाद समशेर खान वय ३१ वर्ष धंदा. मजुरी रा. फ्लॅट नं २०१, ईम्नीस्टी बिल्डींग, नयानगर, मीरा रोड, जि ठाणे (२) ईक्वाल समशेर खान वय ३७ वर्ष धंदा. खाजगी नोकरी रा. फ्लॅट नं २०१, ईम्नीस्टी बिल्डींग, नयानगर, मीरा रोड, जि ठाणे यांना ताब्यात घेवुन, त्यांच्याकडुन ५७ ग्रॅम इतक्या वजनाचे मेफेड्रॉन (एम.डी.) अंदाजे किंमत १२,०००००/- रुपये चा अंमली पदार्थ मिळून आला. त्या अनुषंगाने कोथरुड पोलीस ठाणे येथे वरील नमुद आरोपी यांचे विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आज रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तलायाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करुन, एकुण ०५ गुन्हे नोदवुन ७ आरोपी अटक करुन त्यांचे ताब्यातुन एकुण १७१ ग्रॅम अंमली पदार्थ किंमत रुपये ३५,००,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, . सह पोलीस आयुक्त प्रविण पवार,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ सुनिल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ सतिश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरूड पोलिस स्टेशनचे शाखेकडील ७ पोलीस निरीक्षक १५ सहा, पोलीस निरीक्षक/ पोलीस उप निरीक्षक कोथरुड पो.स्टे. कडील पो. स्टाफ यांनी केलेली आहे.