मुंबई दिनांक २० मार्च २०२४
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई भाजपा कार्यालयात निवडणूक संचलन समितीची तिसरी आढावा बैठक पार पडली.
यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी बैठकीत निवडणूक संचलन समितीतील २२ विभागाच्या प्रमुखांकडून अद्याप केलेल्या कामाचा लेखाजोखा घेतला व तदनंतर त्यांना त्यांच्या दिलेल्या जबाबदारी अनुसार मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितीना निवडणुकीतील सद्यस्थितीतील परिस्थिती व कामाचा आढावा घेतला.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार, भाजपा स्थापना दिनानिमित्ताने होणारे ४०० कार्यक्रम, गुढीपाडव्याला हिंदुत्वाची गुढी तसेच १४ मार्च रोजी बाबासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण अशा आगामी कार्यक्रमांबाबत नियोजन तसेच सखोल चर्चा केली .
यावेळी समितीचे संयोजक आ. अतुल भातखळकर, आ. पराग आळवणी, आ. प्रवीण दरेकर, आ. अमित साटम, आ. पराग शाह, सरचिटणीस संजय उपाध्याय यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.