‘मेक इन एमआयटी डब्ल्यूपीयू पॅव्हेलियनचे’ उद्घाटनः ४० विज्ञान आधारित प्रकल्प सादर
पुणे, दि. २० मार्च :“विज्ञान हे एकमेव माध्यम आहे जे आपल्याला दररोज नवनवीन शोधांसाठी प्रेरित करते. विज्ञान आपल्या जीवनातील नाविन्य राखते, आज आपल्याला अशा नवीन शोधांची नितांत गरज आहे, जे आपल्या गरजा कमीत कमी किंवा पर्यावरणाची कोणतीही हानी न करता पूर्ण करतात.” असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित ‘ मेक इन एमआयटी डब्ल्यूपीयू पॅव्हेलियनचे’ उद्घाटन बुधवारी विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व हॅक एमआयटी डब्ल्यूपीयूचे मुख्य संयोजक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पाडे उपस्थित हेाते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित आहे.
इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इनव्हेंशनची संस्कृती वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘ मेक इन एमआयटी डब्ल्यूपीयू पॅव्हेलियन’ मध्ये एमआयटी डब्ल्यूपीयूच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ४० विज्ञान आधारित प्रकल्प होते. विद्यार्थ्यांना स्वतःची कल्पना साकार करून त्याला मुर्तरूप देणे. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया संस्कृती वाढविण्यासाठी याची मदत होणार आहे.
या विज्ञान प्रदर्शनीत वेधशाळेच्या गुंतागुंतीपासून ते रोबोटच्या अचूकते पर्यंत, हायपरलूप प्रोटोटाइपच्या भविष्यवादी दृष्टीकोन ते सौर इलेक्ट्रिकल वाहनाद्वारे ऑफर केलेल्या शाश्वत उपयांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. इतर उल्लेखनीय प्रदर्शनांमध्ये इलेक्ट्रिक फॉर्म्युला स्टुंडंट कार, फिक्स्ड विंग यूएव्ही, हेक्साकॉप्टर, टेलेक्ट्रा, व्होल्टेइक, एमबाज ऑल टेरेने व्हेईकल, इबाज इलेक्ट्रिक ऑल टेरेन व्हेईकल आणि इलेक्ट्रिक गो कार्ट यांचा समावेश होता. त्याच प्रमाणे १९ वर्षाखालील विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारत या थीममध्ये रक्षा कवच सारखा प्रकल्प सादर केला.
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,” माइंड टू मार्केट आणि पेपर टू प्रोडक्ट ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी खूप महत्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव देऊन त्यांना चालना दयावी व त्यांची बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करून त्यांना उद्योजक बनविण्याचे धोरण प्रत्यक्षांत आणण्याच्या हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘ मेक इन एमआयटी डब्ल्यूपीयू पॅव्हेलियनचे’ आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना स्वतःची कल्पना साकार करून त्याला मुर्तरूप दयावयाचे आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया संस्कृती वाढविण्यासाठी याची मदत होणार आहे. ”