बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या चर्चेत आहे कारण टायगर 3 , OTT शो शोटाइम आणि आता ग्राउंड झीरो या नव्या चित्रपटात दिसणार आहे. बॉलिवुड OG स्टार इमरान हश्मी आता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटसोबत त्याच्या पुढील प्रोजेक्ट ‘ग्राउंड झिरो’साठी सोबत काम करणार आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या या चित्रपटात इमरान पहिल्यांदाच भारतीय सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.
‘ग्राउंड झिरो’ मध्ये बीएसएफ 2रा कमांड नरेंद्र नाथ धर दुबे याच्या प्रवासाचा इतिहास आहे ज्याची भूमिका इमरानने साकारली आहे. ‘ग्राउंड झिरो’ हा तेजस प्रभास आणि विजय देवस्कर दिग्दर्शित असलेला चित्रपट असून इमरानला कधीही न पाहिलेल्या अवतारात तो दिसणार आहे.
संचित गुप्ता आणि प्रियदर्शी श्रीवास्तव यांनी लिहिलेल्या या चित्रपटात झोया हुसैन, सई ताम्हणकर, मुकेश तिवारी, रॉकी रैना, दीपक परमेश आणि ललित प्रभाकर (बदाणे) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
ग्राउंड झिरो’ हा प्रोजेक्ट इमरान साठी खास ठरणार आहे पण सोबतीला त्याचा अष्टपैलुत्वात भर घालते. कामाच्या आघाडीवर ‘ग्राउंड झिरो’ व्यतिरिक्त, इमरानकडे काही खास प्रोजेक्ट्स सुद्धा आहेत. सारा अली खान स्टारर ‘ए वतन मेरे वतन’मध्ये तो राम मनोहर लोहियाच्या भूमिकेत दिसणार आहे. पवन कल्याण अभिनीत ‘ओजी’ आणि ‘गुडाचारी 2’ या चित्रपटातून तो तेलुगू चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे.