पुणे- महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचा पुणे महानगरपालिकेतील कालावधी पूर्ण झालेला नसताना त्यांची बदली झाल्याने आज महापालिकेत काही नागरिकांनी निषेध नोंदविण्यासाठी व विरोध दर्शविण्यासाठी घोषणाबाजी करत आंदोलन केले तर माजी विरोधी पक्ष नेते उज्वल केसकर आणि प्रशांत बढे यांनीही या बदलीला आक्षेप घेत ती थांबवावी अशी मागणी केली आहे.
केसकर यांनी या संदर्भात असे म्हटले आहेकी,’मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या सूचनेच्या आणि मार्गदर्शक तत्त्वाच्या आधाराने काही बदल्या करणे प्राप्त होते त्या प्रमाणे त्या झाल्या असतील परंतु श्री विकास ढाकणे हे त्या बदलीच्या निकषात बसतील असे आम्हाला वाटत नाही पुण्यामध्ये कार्यरत असताना थोड्या कालावधीमध्ये अतिशय चांगलं शहराच्या विकासात भर टाकणार काम श्री विकास ढाकणे यांनी केलं आहे पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त नवीन एक अतिरिक्त आयुक्त नवीन आणि फक्त एकच जुने अतिरिक्त आयुक्त बिनवडे साहेब कार्यरत आहेत तसेच महापालिकेतील चार उपायुक्तांच्या देखील बदल्या झालेल्या आहेत या सगळ्या घडामोडीचा शहराच्या विकास कामांवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे विकास ढाकणे यांची झालेली बदली रद्द करून त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये ठेवावे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी श्री विकास ढाकणे यांना कार्यरत ठेवावे अशी मागणी आम्ही केली आहे.