फक्त मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. मराठी रूपेरी पडद्यावर मनोरंजक चित्रपटांची फार मोठी परंपरा आहे. याच परंपरेतील एक कुतुब तीन मिनार या धमाल चित्रपटाचा आस्वाद फक्त मराठी वाहिनीवर घेता येणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर रविवार १६ एप्रिलला दुपारी १२.०० वा. आणि सायंकाळी ६.०० वा. फक्त मराठीवर रंगणार आहे.
श्रीमंतीच्या हव्यासापायी कुतुब नामक एका भामटा दोन मुलींना कशाप्रकारे फसवतो याची रंजक कथा म्हणजे एक कुतुब तीन मिनार. या सिनेमात भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहेत. धमाल विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या एक कुतुब तीन मिनार चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर रविवार १६ एप्रिलला दुपारी १२.०० वा. सायंकाळी ६.०० वा. फक्त मराठीवर अवश्य पाहा.
मल्टिप्लेक्समधला सिनेमा बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आता घरबसल्या हा आनंद घ्यायची संधी फक्त मराठी वाहिनीने होम थिएटरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. फक्त मराठीच्या होम थिएटरवर १७ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान रंजक मराठी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना घेता येणार आहे.
‘खबरदार’, ‘जत्रा’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘आई नंबर वन’, ‘जबरदस्त’, ‘सुपरस्टार’ या धमाल चित्रपटांचा आस्वाद फक्त मराठीवर पहिल्यांदाच घेता येईल. दररोज सकाळी ११.३० वा. हे चित्रपट रसिकांना पहाता येतील. फक्त मराठीवर पहिल्यांदाच दाखवण्यात येणारे हे प्रीमियर चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतील.