Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या भेटीला

Date:

पुणे : राज्याचे उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यात नागरिकांच्या तक्रारी, सूचना, निवेदन स्वीकारणे व त्याचे निराकरण करण्यासाठी विशेष वेळ राखीव ठेवला आहे.

गुरुवारी (दि. 20) रास्तापेठ येथील महावितरणच्या पुणे परिमंडल कार्यालयाच्या आवारात दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात उर्जामंत्री ना. बावनकुळे हे नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्याकडून तक्रारी, सूचना व निवेदन स्वीकारतील व त्याचे निराकरण करणार आहेत. यावेळी महावितरण, महापारेषण तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उर्जामंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते दि. 20 एप्रिलला महावितरण अंतर्गत पायाभूत आराखडा-2 मधील उपकेंद्रांचे उद्‌घाटन, एकात्मिक उर्जा विकास योजना व दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतील उपकेंद्रांचे भूमिपूजन होणार आहे. तसेच लोकप्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत पुणे जिल्ह्यातील वीजविषयक कामांबाबत ते चर्चा करणार आहेत.

महावितरणशी संबंधीत तक्रारी, सूचना किंवा निवेदनाची एक प्रत दि. 18 एप्रिलपर्यंत रास्तापेठ येथील महावितरण ग्राहक सुविधा केंद्रात कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार आहे. तसेच cfcrp@mahadiscom.in या इमेलवर प्रत पाठविता येणार आहे. याशिवाय दि. 20 ला आयोजित कार्यक्रमातही मा. मंत्री महोदयांना तक्रारी, सूचना किंवा निवेदन देता येईल. उर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांची मुख्य उपस्थिती असलेल्या या उपक्रमाचा वीजग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

नवीन वीजजोडणी घेणाऱ्या ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि

ग्राहक नावात बदल करण्यासाठी महावितरणचा ‘विशेष मदत कक्ष’

मुंबई : महावितरणच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी आणि ग्राहक नावात बदल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात ‘विशेष मदत कक्ष’ सुरू करण्यात आला आहे.

महावितरणच्या नवीन ग्राहकांना वीजजोडणी घेताना आणि आपल्या नावात बदल करताना विविध कारणांमुळे अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार अशा ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी हा ‘विशेष मदत कक्ष’ सुरू करण्यात आला आहे.

ग्राहकांना नवीन वीजजोडणी घेताना अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी या कक्षाद्वारे संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करून ग्राहकांना सुलभतेने वीजजोडणी मिळावी यासाठी कार्यवाही करण्यात येईल. याशिवाय ग्राहकांच्या नावात बदल करण्याबाबतच्या तक्रारींचे निराकरणही या विशेष मदत कक्षाद्वारे करण्यात येणार आहे. पैसे भरून नवीन वीजजोडणी न मिळालेल्या ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन अशा ग्राहकांना त्वरीत वीजजोडणी मिळावी, यासाठी या ‘विशेष मदत कक्षा’द्वारे मदत करण्यात येईल.

नवीन वीजजोडणी, नावात बदल व वीजजोडणी न मिळालेल्या ग्राहकांनी आपली तक्रार सोडविण्यासाठी 022-26478989 व 022-26478899 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...