Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

श्री हनुमान जयंती निमित्त एमआयटीमध्ये कुस्ती स्पर्धा – खुल्या गटात नानाजी (मुन्ना) झुंझुरके विजेता, स्पर्धेत 65 मल्लांचा सहभाग

Date:

पुणे- विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे तर्फे श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून पुण्यातील मल्लांसाठी एमआयटीच्या व्यायाम शाळेमध्ये कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेमध्ये 65 मल्ल सहभागी झाले होते. विजेत्या मल्लांना रोख रक्कमेची बक्षिसे देण्यात आली. 86 किलो वजन गटातील मारूती वरपे व नवनाथ शेप यांची उद्घाटनाची कुस्ती झाली. त्यामध्ये मारूती वरपे विजयी झाले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांनी एमआयटी परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त महापूजा  केली. त्यानंतर त्यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले.
यावेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, श्री.अजित गोसावी, माईर्स एमआयटीचे उप कुलसचिव श्री.अभय बिरारी, प्रा. पी. जी. धनवे व प्रा. महेश आबाळे हे उपस्थित होते.
या कुस्त्यांचे पंच म्हणून पैलवान बबनराव काशिद, पैलवान सुभाष मोहोळ, पै.चंद्रकांत मोहोळ, निलेश सातपुते, ज्ञानेश्‍वर माने व बाळू सणस यांनी काम पाहिले.
या प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “ आज या कुस्ती स्पर्धेमध्ये बाल मल्लांचा सहभाग मोठा होता, याचा मला आनंद वाटतो. कारण एमआयटीत बांधण्यात आलेल्या तालिमिचे आज सार्थक झाले. कुस्तीमुळे शक्ती आणि युक्तीचा विकास होतो. तर चारित्र्यसंवर्धन ही घडले जाते.”
खुल्या गट  – विजेता नानाजी (मुन्ना) झुंझुरके  -उपविजेता आकाश साळुंके
86 किलो – विजेता मारूती वरपे-  उपविजेता नवनाथ शेप
74 किलो- विजेता श्रीकांत काशिद-  उपविजेता रोहित तांदळे
70 किलो – विजेता संदिप चामनार- उपविजेता निकुंज उभे
65 किलो- विजेता सचिन पांढरे  –  उपविजेता अमन बिगानिया
61 किलो- विजेता सचिन पाटील –  उपविजेता प्रकाश जरारे
57 किलो- विजेता दीपक बगळे-  उपविजेता अभिषेक ननपुरे
53 किलो – विजेता सौरभ उभे –  उपविजेता चेतन हुलावळे
47 किलो- विजेता प्रेम बोडके –  उपविजेता दिनेश शिंदे
42 किलो- विजेता राज नाकते    –  उपविजेता वरद इंगुळकर
  32 किलो – विजेता सार्थक शिंदे     –  उपविजेता यश केशावर
वरील सर्व कुस्त्या चितपट झालेल्या आहेत. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले बाल मल्ल.
प्रा.पी.जी धनवे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी परिसरातील असंख्य भाविक उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...