पुणे- दि.4: चाकण टप्पा क्र.5 मधील शेतजमीन दरनिश्चितीच्या सहमतीबाबत शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रया लेखी स्वरुपात कळवाव्यात अशा सूचना, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी आज दिल्या.
पीडीसीसी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह, येथें श्री. काळे यांच्या अध्यक्षतेखाली चाकण टप्पा क्र.5 दरनिश्चितीबाबतची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस भूसंपादन अधिकारी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
एकूण दोन सत्रात बैठक पार पडली पहिल्या सत्रात आंबेठाण, बिरदवडी, रोहकल येथील शेतकऱ्यांना एमआयडीसी मार्फत शासनाच्या नियमांना अनुसरुन 55 लाख प्रति एकर व दुस-या सत्रात गोनवडी, वाकीखुर्द, चाकण येथील शेतकऱ्यांना 65 लाख प्रति एकर दर निश्चित केलेला आहे, अशी माहिती देवून या बैठकीत शेतकऱ्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या तसेच या दरांत सहमत असलेल्या व नसलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रया लेखी स्वरुपात कळवाव्यात, लवकरात-लवकर त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिली.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.