‘राजा’ चित्रपटाचे शानदार संगीत अनावरण

Date:

उत्साहात आणि झगमगाटात संपन्न झालेल्या राजा या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात शब्द-सुरांची अनोखी मैफल सजली. गायक सुखविंदर सिंग यांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात चांगलेच रंग भरले. खासदार प्रीतमताई मुंडे, डॉ. अजिंक्य पाटील (अध्यक्ष,डी.वाय.पाटील ग्रुप), सुरेंद्र पांडे (पोलीस अप्पर महासंचालक, महाराष्ट्र राज्य), प्रवीण घुगे (अध्यक्ष बालहक्क आयोग महाराष्ट्र शासन), संजय मुखर्जी (अतिरिक्त महानगर आयुक्त), संजय खंदारे (अतिरिक्त आयुक्त एमएमआरडीए), उद्योजक प्रवीण तलरेजा, प्रसिद्ध गायक शान आणि उदित नारायण अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत ‘राजा’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. दीपप्रज्वलन झाल्यानंतर या सिनेमाचं म्युझिक लाँच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या २५ मे ला ‘राजा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

या संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटातील गाण्याची झलक या निमित्ताने सगळ्यांनी अनुभवली. उपस्थित मान्यवरांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. हा संगीतमय चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास निर्माता व दिग्दर्शकांनी यावेळी व्यक्त केला. ‘सत्यसाई मल्टीमिडीया प्रा.लि’ या चित्रपट निर्मिती संस्थेचे निर्माते प्रवीण काकड यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून संवाद मिलिंद इनामदार व शशिकांत देशपांडे यांनी लिहिले आहेत.

‘राजा’ या संगीतमय चित्रपटात ‘गावचा राजा’, ‘झन्नाटा’, ‘हंडीतला मेवा’, ‘जो बाळा जो जो रे’, ‘याद तुम्हारी आये’, ‘दगडाचे मन’, ‘हे मस्तीचे गाणे’, ‘आज सुरांना गहिवरले’ अशा वेगवेगळ्या जॉनरच्या आठ सुमधुर गाण्यांचा नजराणा आहे. वलय मुळगुंद, केदार नायगावकर, मिलिंद इमानदार यांच्या लेखणीने या चित्रपटातील गाणी सजली आहेत. सुखविंदर सिंग, शान, उदित नारायण या हिंदीतील दिग्गज गायकांसोबत रोहित राऊत, सौरभ साळुंखे, उर्मिला धनगर, सायली पडघन, मिलिंद शिंदे यांनी यातील गाणी गायली आहेत. या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे.

पॉप सिंगरच्या आयुष्यावर ‘राजा’ ची कथा बेतली आहे. सौरदीप कुमार, स्वरदा जोशी, निशिता पुरंदरे या तीन नव्या चेहऱ्यासह  शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, पौरस आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत.

‘राजा’ २५ मे ला प्रदर्शित होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...