पुणे : श्रीक्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. 10) महावितरणकडून
नाशिक फाटा येथे स्वागत करण्यात आले. यावेळी वीजसुरक्षा व बचतीबाबत जनजागरण करण्यात आले.
पिंपरी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रभारी मुख्य अभियंता श्री. भालचंद्ग खंडाईत, कार्यकारी अभियंता
श्री. धनंजय औंढेकर, शरद रिनके यांची प्रमुख उपस्थिती होती. महावितरणचे अभियंता व कर्मचार्यांच्या वर्गणीतून
पालखीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना पिण्याचे पाणी व न्याहरीच्या पदाथार्ंची कापडी पिशवी देण्यात आली. या
पिशवीवर वीजबचतीचा संदेश छापण्यात आला आहे. तसेच पुणे लघु प्रशिक्षण केंद्गाने तयार केलेल्या वीजसुरक्षेच्या
माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक भाविकांनी महावितरणच्या अधिकार्यांशी संवाद साधला व
वीजसुरक्षा व बचतीबाबतच्या उपक्रमाचे स्वागत केले. आयोजनासाठी महावितरणचे रवींद्ग खडक्कर, एम. आर. साळुंके,
भाऊसाहेब सावंत, मनोहर कोलते, हरिविजय नाझरकर, मनोज पुरोहित, अनिल गावडा, एस.पी. शिवनेचरी आदींनी
पुढाकार घेतला.