Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

“आर्त” चा आवाज लोकसभेपर्यंत पोहोचणार..

Date:

 

मुंबई – उच्चतम निर्मितीमूल्ये, मोठी स्टारकास्ट, चकचकीत लोकेशन्स, बडे संगीतकार आणि आयटम सॉंग यांच्या जोरावर मराठी सिनेमा “मोठा” आणि “बॉक्स ऑफिस”वर गल्ला कमवतो असा समज आहे, किंबहुना अशा चित्रपटांना मिडीया “हाईप” देखील करत असतो. परंतु नाण्याच्या दोन बाजू असतात तशाच फिल्म इंडस्ट्रीत असे काही फिल्ममेकर्स आहेत, जे चित्रपटाला समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम समजून, सामाजिक जाणीव व सामाजिक समस्यांना प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करतात, डी.एस.फिल्म्स निर्मित (दिलीप शहा), ऋषीराज क्रिएशन कृत, राजेंद्र साळी लिखित आणि राजेंद्र साळी व दत्ता गायकर दिग्दर्शित “आर्त” या मराठी चित्रपटातून अशाच एका देशव्यापी आदिवासी जात- पंचायत रूढी परंपरेबाबत भाष्य करण्यात आले आहे.

नुकताच या चित्रपटाला कल्याण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा” पुरस्कार मिळाला आहे.

शीतल साळुंके, संतोष मयेकर, गणेश यादव, जयराज नायर आणि अजित भगत यात प्रमुख भूमिकेत आहेत, याबाबत दिग्दर्शक राजेंद्र साळी याबाबत सांगतात की, गेली दिड ते दोन वर्ष मी महाराष्ट्र (कसारा, कर्जत, नंदुरबार). गुजराथ, कर्नाटक च्या ग्रामीण भागाचा सखोल अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आले की. आज भारतात महानगरांमध्ये महिला प्रगतीपथावर दिसते आहे, परंतु ग्रामीण भारतात आजही तिला जात पंचायत रूढी मुळे अन्याय सहन करावा लागतो आहे, इतक्या जाचक आणि ह्र्द्यद्रावक शिक्षा मी तिकडे ऐकल्या आहेत की, त्या कल्पनेने देखील अंगावर शहारे येतात. आमच्या “आर्त” चित्रपटातून अशाच महिलेंचा आतला आवाज मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, नुकतेच लोकसभेत “सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा” (जात पंचायतच्या जाचक रूढी विरोधात) निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचे आम्ही समर्थन करत आहोत. लवकरच या चित्रपटाचा विशेष खेळ (इंग्रजी सबटायटल सह) आम्ही विशेष लोकसभा सदस्यांसाठी आयोजित करणार आहोत, जेणे करून “आर्त”चा आवाज लोकसभेपर्यंत पोहचू शकेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारनगरमध्ये ज्योतिषाकडून तरुणीचा विनयभंग

पुणे-एका ज्योतिषाकडून तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सहकारनगर भागात...

पुणे वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराची आत्महत्या:मुलं शाळेतून आल्यावर घरात दिसला वडिलांचा मृतदेह

पुणे-पुणे पोलिस दलातील वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराने गळफास घेऊन...

ना कोयता थांबतोय, ना कट्टा ,ना मॅफेड्रॉन ..पुण्याला बसतोय विळखा

पुणे- राजकारण प्रत्येक पक्षात शिगेला पोहोचलेले असताना ते एकमेकावर...

पुणे शहरातील गणेशोत्सव सर्व दिवस 24 तास खुला राहण्यासाठी आमदार हेमंत रासनेंकडून पाठपुरावा सुरु

पुणे (दि २०): राज्य सरकारकडून गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून...