Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तिसर्‍या आंतरराष्ट्रीय ‘लेसर डेन्टीस्ट्री’ परिषदेत 400 तज्ज्ञांचा सहभाग ‘लेसर सर्जरी हे दंतविज्ञानाचे नवे दालन ठरेल’ : परिषदेतील सूर

Date:

1 2
पुणे :
‘दंतोपचारासाठी ‘लेसर तंत्र’ हे नवे वरदान ठरणार असून, त्याद्वारे सुरक्षित, रक्तविरहीत शस्त्रक्रिया कमी वेळेत करणे शक्य होणार आहे. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या पारंपारिक पद्धतीपेक्षा लेसर तंत्राने सोप्या होतील’ असा आशावाद ‘लेसर डेन्टीस्ट्री’ या तिसर्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये व्यक्त झाला.
ही परिषद ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘एम.ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ मध्ये रविवारी आयोजित करण्यात आली होती. परिषदेत 400 आंतरराष्ट्रीय विशेषज्ज्ञांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान  विद्यापीठ (नासिक) चे अधिष्ठाता डॉ. एस.सी.भोयर यांनी परिषदेचे उद्घाटन केले.
डॉ. अन्ड्रीस मोर्तिज (विभाग प्रमुख व्हिएन्ना विद्यापीठ), डॉ. मार्कस लकी, डॉ. ख्रिस्तोफ क्रझमन या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. श्रीलंका, संयुक्त अरब अमिरात, मध्यपूर्वेतील देशातील प्रतिनिधीही सहभागी झाले होते.
डॉ. रमणदीप दुग्गल (एम.ए.रंगूनवाला डेंटल महाविद्यालयाचे अधिष्ठाता), आर.ए.शेख (रजिस्ट्रार), डॉ. विवेक हेगडे (उप प्राचार्य) यांनी स्वागत केले.
डॉ. प्रविण कुडवा (अध्यक्ष, इंडियन सोसायटी ऑफ पेरियो डोंटोलॉजी), डॉ. बालाजी मनोहर (सचिव, सोसायटी ऑफ लेसर अ‍ॅप्लीकेशन) यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. गिरीश ब्याकोड, डॉ. संजय जैन, डॉ. समीर जाधव, डॉ. समीर ठुकराल, डॉ. अन्वर शेख, डॉ. नासिर खान, डॉ. लिशा गंगवाल, डॉ. श्रीलता, डॉ. अमीर गोडील, डॉ. श्रेया शहा (एम.ए.रंगूनवाला डेंटल महाविद्यालयातील प्राध्यापक) आदी उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...