सर्व समाजांच्या आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास देहत्यागाचा इशारा

Date:

‘सेवाग्राम’ संस्थेचे विनायकराव पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
 
पुणे: 
 
राज्यातील सर्व जाती-धर्माच्या हितासाठी मराठा, मुस्लिम व इतर समाजाचे आरक्षणासाठी निघत असलेले मोर्चे थांबवावेत व आरक्षणासंबंधीत निवेदनामध्ये दिलेल्या मागण्यावर त्वरीत निर्णय घ्यावा अन्यथा दिनांक 26 जानेवारी 2017 पासून सेवाग्राम, कवठा ता. उमरगा, जि. उस्मानाबाद येथे जातीधर्माच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन अमरण उपोषण व देहत्यागाचा इशारा पत्रकाद्वारे ‘सेवाग्राम’ संस्थेचे संस्थापक विनायकराव पाटील यांनी दिला. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
 
मागील चार-पाच महिन्यांपासून सर्व जातीचे लाखो लोकांचे मोर्चे प्रत्येक जिल्ह्यात निघत आहेत पक्ष सरकार म्हणवणारी संस्था आणि त्यांचे प्रमुख हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. सरकारवर या मोर्च्याच्या काहीही परिणाम झालेल्या दिसत नाही. या उलट देशाच्या इतिहासामध्ये नोंद व्हावी असे विराट मोर्चे निघुन सुद्धा मोर्चेवाले आमचे (सरकारचे) काहीही करू शकत नाहीत. अशा आवेशात व गुर्मीत सरकार व त्यांचे लोक आहेत. सत्ताधारी पक्ष जातीमध्ये फुट पाडून भविष्यातील मोर्चे विफल करण्याचा प्रयत्न करत आहे व जाती -जातीमध्ये संघर्ष निर्माण करून पाहत आहेत. म्हणून सर्व जातीधर्माच्या लोकांनी या सरकारपासून सावध राहिले पाहिजे.
 
सरकारने मराठा व मुस्लिम समाजाच्या आरक्षणासंबंधी मागण्या मान्य केल्या नाही व काही ठोस निर्णय घेतले नाहीत तर जाती-जातीमध्ये संघर्ष निर्माण होऊन अराजकता माजण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जीवन जगणे कठीण होईल. प्रत्येक जिल्ह्यात मराठा व मुस्लिम लोकांनी रस्त्यावर उतरून शांततेने मोर्चे काढून सरकारला सर्व माध्यमातून मागण्यांचे निवेदन दिले. राज्यामध्ये कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. एवढे होऊन सुद्धा जर सरकार याची दखल घेत नसेल तर आता सरकारला जागे करण्यासाठी कोणाच्या तरी बलिदानाशिवाय पर्याय नाही. 
 
सरकार जागे व्हावे. राज्यात जाती-जाती मध्ये उद्रेक होण्याच्या आत निर्णय घ्यावा म्हणूनद ‘मी विनायक पाटील (अमन का जिहादी) सेवाग्राम कवठा, येथे माझा देहत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सर्व मागण्या महानगरपालिका व जिल्हापरिषदेच्या निवडणूकीनंतर 27 फेब्रुवारीस सदर पत्रकात सुचविल्याप्रमाणे राज्यसरकार करण्यास तयार असेल तर तशा प्रकारचे लेखी आश्‍वासन आम्हास द्यावे.
 
सरकारने लेखी आश्‍वासन दिले तर 26 जानेवारीपासून सेवाग्राम, कवठा, ता.उमरगा, जि. उस्मानाबाद येथे सर्व जाती-धर्माच्या हजारो कार्यकर्त्यांसह उपोषणास बसून मी देहत्याग करणार आहे. यामध्ये सरकारने काही अडथळे निर्माण केले तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.
 
मी कोणत्याही पक्षाचा किंवा संघटनेचा कार्यकर्ता नाही. मी महात्मा गांधीजींच्या विचारावर चालणारा व अण्णा हजारे यांना मानणारा सामाजिक कार्यकर्ता आहे. 
 
आपण राज्याचे प्रमुख आहात म्हणून मराठा व मुस्लिम समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात व राज्यातील सर्व जातीधर्माचे लोक सुखा समाधानाने नांदावेत असे मला वाटते. पण आपण मराठा व मुस्लिम समाजाच्या मागण्या मान्य करत नाहीत म्हणून मी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून या निर्दयी सरकारला जाग यावी व सर्व जाती धर्माचे लोक सुखा समाधानाने एकत्र राहावेत ही इच्छा आहे. मला स्वत:साठी काही साध्य करायचे नाही. मी समाजासाठी स्वत:चे सर्वस्व त्याग करून काम करणारा सामाजिक कायर्ंकर्ता आहे, ’ असे या पत्रात नमूद केले आहे.
 
स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन नांदणार्‍या महाराष्ट्रात जाती-धर्म मधील मतभेद वाढत आहेत. मराठा-व मुस्लिम समाज आरक्षणासाठी मोर्चे काढत आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा-व मुस्लिम समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत. त्यामध्ये लाखो लोक सहभागी होत आहेत. जिल्हा स्तरावरील मोर्चे संपल्यानंतर या मोर्च्याचे लोण तालुकापातळीपर्यंत गेले आहे. तसेच इतर जातीच्या समुदायाचे लोक सुद्धा आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चे काढत आहेत. हे सर्व मोर्चे शांततेने निघत आहेत. त्यासाठी सर्व जातीच्या मोर्चेकर्‍यांचे कौतुक केले पाहिजे. मराठा-व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मोर्च्यांमधून त्या जातीमधील तरूण मुला मुलींचा आक्रोश समोर येत आहे.
 
मागण्या पुढीलप्रमाणे
 
1. सर्वप्रथम  मराठा-व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून स्थगिती घेतली आहे. त्यांना याचिका मागे घेण्यास सांगावे. किंवा  मराठा-व मुस्लिम समाजाच्या आरक्षणासंबंधी कोर्टात पुरावे देत बसण्यापेक्षा पूर्वीच्या सरकारने घेतलेला निर्णय स्थगित करावा. त्यामुळे न्यायालयात दाखल केलेले खटले आपोआप रद्द होतील व  मराठा-व मुस्लिम समाजास सुधारित नविन आरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी 27 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवावे किंवा मंत्रीमंडळाची विशेष बैठक घेऊन  मराठा-व मुस्लिम समाजास आरक्षण देण्यासंबधी नविन अध्यादेश काढावा.
 
2. राज्यात सर्व जातीचे आरक्षणासाठीचे मोर्चे निघत आहेत. त्यामुळे राज्यातील सामाजिक सद्भाव बिघडत चालला आहे. म्हणून राज्यातील सर्व जाती-धर्माच्या बांधवांना त्यांचे प्रस्तावित मोर्चे थांबविण्यास सांगावे व 26 जानेवारीच्या आत मराठा, मुस्लिम व ओबीसी समुदायाच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना कालबद्ध कार्यक्रम घ्यावा. 
 
3. शेतकर्‍यांच्या शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू कराव्यात. 
 
4. देशाचे रक्षण करत असताना सिमेवर शहिद झालेल्या जवानांच्या मुलांसाठी व आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शिक्षणामध्ये व नोकरीमध्ये वेगळे आरक्षण ठेवावे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...