पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 645 ने वाढ:ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 825

Date:

पुणे विभागातील 5 लाख 74 हजार 948 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 96 हजार 914 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि.10 :- पुणे विभागातील 5 लाख 74 हजार 948 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 96 हजार 914 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 825 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 141 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.70 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.32 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 645 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 493, सातारा जिल्ह्यात 64, सोलापूर जिल्ह्यात 50, सांगली जिल्ह्यात 24 तर कोल्हापूर जिल्ह्यात 14 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 90 हजार 1 रुग्णांपैकी 3 लाख 76 हजार 684 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 296 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.31 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.59 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 56 हजार 912 रुग्णांपैकी 54 हजार 421 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 663 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 759 रुग्णांपैकी 49 हजार 317 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 631 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 811 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 217 रुग्णांपैकी 46 हजार 345 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 120 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 25 रुग्णांपैकी 48 हजार 181 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 115 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 729 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 859 आहे. पुणे जिल्हयामध्ये 612, सातारा जिल्हयामध्ये 184, सोलापूर जिल्हयामध्ये 29, सांगली जिल्हयामध्ये 20 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 14 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 38 लाख 925 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 96 हजार 914 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 9 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उज्जैनमध्ये शाही मशिदीच्या काही भागाच्या हटवणीवरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा अश्रुधुराचा वापर

सिंहस्थ २०२८साठी रस्ता रुंदीकरणाचा वाद; मोठा पोलीस बंदोबस्त, उच्च...

खडकवासला निम्म्यावर; चार धरणांच्या साठ्यात 1.35 TMC घट

७ सप्टेंबरला गेल्या वर्षीएवढीच भरलेली धरणे, पण आता साठ्याची...

गणेशोत्सव मंडळांना नियम शिकवू नका’; ढोल-ताशा महासंघाविरोधात मानाच्या दोन गणपती मंडळांची आक्रमक भूमिका

कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी मंडळांचे संयुक्त निवेदन; ‘मंडळांच्या...

युक्रेनने युद्धात उतरवले स्फोटकांनी सज्ज रोबोट सैनिक; ३,००० रशियन सैनिक ठार केल्याचा दावा

‘ऑपरेशन विवाल्डी’अंतर्गत रोबोट-ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर; ५ गावे आणि...