राहुल गांधींना देशात राहण्याचा अधिकार नाही – हेमंत रासने

Date:

उपमहापौरांसह सभागृहनेते ,स्थायी अध्यक्ष आणि भाजप शहराध्यक्ष यांनी केली निदर्शने

पुणे ः सावरकरांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेले विधान चुकीचे आहे. स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या राहुल गांधींना सावरकरांच्या बलिदानाची माहिती नाही. त्यांना देशात राहाण्याचा अधिकार नाही. अशी टीका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली .राहुल गांधी यांच्या विधानाचा मी निषेध करतो. ज्याप्रमाणे सावरकरांनी विदेशी वस्त्रांची होळी केली, त्याप्रमाणे राहुल गांधी यांच्या विचारांची होळी करण्याची वेळ आली असल्याचे आवाहन  सभागृहनेते धीरज घाटे यांनी  केले .कॉंग‘ेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारकाजवळ निदर्शने केली. यावेळी महापालिकेतील पदाधिकारी  बोलतहोते. महापौर मुरलीधर मोहोळ वगळता उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेता धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या सं‘येने उपस्थित होते.

सावरकरांनी प्रत्येक तरुणाच्या मनात क‘ांतिची ज्योत पेटविली. ते क‘ांतिकारकांचे शिरोमणी होते. आमच्यासाठी ते पूजनीय आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्याबद्दल केेलेल्या आक्षेपार्ह विधानाचा आम्ही निषेध करतो. निवडणुकीच्या युद्धातून पळणार्‍या राहुल गांधींना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. अशी टीका भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.भाजपचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांची भाषणे झाली

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी...