पुणे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस सेकंडरी स्कूलमध्ये ३२ व्या भूगोल दिनानिमित्त हवामानातील बदल, ओझोनच्या स्तरावर होणारे प्रदूषणाचे परिणाम, तापमान वाढ, जैववैविध्यता, पाण्याचे स्रोत आणि जनजागृती, ऑस्ट्रेलियातील अग्नितांडव, प्राण्यांचे महत्त्व आदी विषयांवरील विद्याथ्यांनी बनविलेले पोस्टर व मॉडेलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महेश आठवले यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या आजीव सदस्या डॉ. सविता केळकर, मु‘याध्यापिका ज्योती बोधे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भूगोल या विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भूगोलाच्या अभ्यासाची समाजामध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था आणि सजग नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. समाजात जागृती भूगोल दिनासार‘या कार्यक‘मांचे आयोजन करण्याची गरज आठवले यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
जागृती महाजनी, सुवर्णा परांजपे, सुनेत्रा वेदपाठक, लक्ष्मी मालेपट्टी, मंजुषा बोरावके, आदिती पवार, स्वाती गिरमे, वैशाली कलशेट्टी, स्वाती जोशी, अमृता खजुरे, निखिल आचार्य या भूगोल आणि कला शाखेच्या शिक्षकांनी प्रदर्शनाचे नियोजन आणि रचना केली.