१५ ते १९ सप्टेंबर दरम्यान स्व. शांताबाई जोग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

Date:

३१ ऑगस्ट पर्यंत मागविण्यात आले आहेत अर्ज

मुंबई, : मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा जपण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ, टिळकनगर यांच्या वतीने सोनल प्रॉडक्शन पुरस्कृत स्वर्गीय शांताबाई जोग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या प्रतिष्ठित स्पर्धेचे ४४ वे वर्ष असून, स्पर्धा १५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे.

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री स्वर्गीय शांताबाई जोग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा गेली चार दशके राज्यभरातील हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाट्यसंस्थांसाठी एक मानाचे व्यासपीठ ठरली आहे. अनेक नामवंत कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांनी या स्पर्धेतून आपल्या कलाप्रवासाची यशस्वी सुरुवात केली आहे.

यंदाच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सर्व हौशी, प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाट्यसंस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, आणि मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेला अधिक बळकटी द्यावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. आप्पा पराडकर यांनी केले आहे. उत्कृष्ट एकांकिकांद्वारे नवोदित कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना आपली कला सादर करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नाट्यसंस्थांनी प्रवेश अर्ज, स्पर्धेचे नियम व इतर माहितीसाठी स्वप्निल ९२२१०००३५५, विशाल ९६१९२५१५७५ यांच्यासमवेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भोर-वरंधा, ताम्हिणी घाटाचे रस्ते सुरू करा ! बंद एसटी बससेवाही तातडीने सुरू करण्याची मागणी.

कोकण कृती समितीचे आमदार शंकर मांडेकर यांना निवेदन पुणे,...

युवाशक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य तिरंगा रॅलीला उपस्थिती पुणे, दि....

‘कनेक्टिंग लिंक’वर बुधवारी तीन तास वाहतूक बदल

पुणे, दि. ११ : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग...