भोर-वरंधा, ताम्हिणी घाटाचे रस्ते सुरू करा ! बंद एसटी बससेवाही तातडीने सुरू करण्याची मागणी.

Date:

कोकण कृती समितीचे आमदार शंकर मांडेकर यांना निवेदन

पुणे, दि. ११ : गणेशोत्सवासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमधून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत व्हावा, यासाठी भोर-वरंधा व ताम्हिणी घाट मार्गांची तातडीने दुरुस्ती करून गणेशोत्सवापूर्वी हे मार्ग वाहतुकीसाठी खुले करावेत, तसेच सध्या बंद असलेल्या एसटी बससेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण कृती समिती, पुणे यांच्या वतीने करण्यात आली.

याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शंकर मांडेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी कोकणातील रस्त्यांची सद्यस्थिती, चाकरमान्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि गणेशोत्सवाच्या काळातील संभाव्य वाहतूक कोंडी याबाबत आमदार मांडेकर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

दि. १४ सप्टेंबर २०२६ पासून गणेशोत्सव व गौरी-गणपती उत्सवाला सुरुवात होत आहे. कोकणातील हा पारंपरिक आणि मोठ्या उत्साहाचा सण असल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेले हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जातात. त्यामुळे या काळात कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते.
सध्या ताम्हिणी मार्ग बंद असून भोर-वरंधा घाट मार्गाचीही पावसामुळे दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.
कोकणात जाण्यासाठी पर्यायी मार्ग लांब पल्ल्याचे, वेळखाऊ आणि खर्चिक आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. गणेशोत्सवापूर्वी ताम्हिणी व भोर-वरंधा घाट मार्गांची पाहणी करून युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली.

तसेच गणेशोत्सवाच्या काळात या मार्गांवर २४ तास कर्मचारी, जेसीबी आणि आवश्यक आपत्कालीन यंत्रणा तैनात ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली. दरड कोसळणे, रस्ता खचणे किंवा अन्य कारणांमुळे वाहतूक बंद झाल्यास तातडीने मार्ग मोकळा करता यावा, यासाठी प्रशासनाने विशेष यंत्रणा सज्ज ठेवावी, असे समितीने स्पष्ट केले.

मढेघाट-महाड मार्गही खुला करण्याची मागणी
वेल्हे मार्गे मढेघाट ते महाड या रस्त्याचे काम जवळपास ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा मार्ग पर्यायी रस्ता म्हणून खुला करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

बंद एसटी बससेवा सुरू करण्याचे आदेश
रस्त्यांसोबतच कोकणासाठी सध्या बंद असलेल्या एसटी बससेवाही गणेशोत्सवापूर्वी सुरू कराव्यात, अशी मागणी समितीने केली. पुणे व पिंपरी-चिंचवडमधून कोकणातील विविध भागात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा बससेवा उपलब्ध करून दिल्यास खासगी वाहनांवरील ताण कमी होऊन वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होण्यास मदत होईल, असे समितीने सांगितले.

आमदार शंकर मांडेकरांकडून तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन
कोकण कृती समितीच्या निवेदनाची आमदार शंकर मांडेकर यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यांची आवश्यक कार्यवाही करून मार्ग सुरू करण्याबाबत तातडीने आदेश दिले. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी एसटी बसचे आगाऊ आरक्षण सुरू करून देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
“गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी भोर-वरंधा व ताम्हिणी घाट मार्गांबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच कोकणासाठी एसटी बससेवेचे आगाऊ आरक्षण सुरू करण्याबाबतही संबंधित यंत्रणेला सूचना आमदार शंकर मांडेकर यांनी केल्या.

यावेळी बाबा धुमाळ, तुकाराम जाधव, सचिन दिघे, मुकेश पोटे, प्रकाश यादव, अभिजित महाडिक, रामभाऊ बडंबे, सुनील मोरे, दशरथ माटवणकर, संभाजी गोगावले, राहुल शेलार, परेश अंगणे आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१५ ते १९ सप्टेंबर दरम्यान स्व. शांताबाई जोग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

३१ ऑगस्ट पर्यंत मागविण्यात आले आहेत अर्ज मुंबई,...

युवाशक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य तिरंगा रॅलीला उपस्थिती पुणे, दि....

‘कनेक्टिंग लिंक’वर बुधवारी तीन तास वाहतूक बदल

पुणे, दि. ११ : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग...

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याच्या वितरणाला वेग

जूनमध्ये मिळालेल्या १५० कोटींचे वितरण पूर्ण; १० ऑगस्टला मिळालेल्या...