मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला गती; ५ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे डिसेंबर २०२६ अखेर सुरू करण्याचे नियोजन

Date:

११ केंद्रांपैकी ४ केंद्रे कार्यान्वित; प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्याची मैलापाणी प्रक्रिया क्षमता ३९६ एमएलडीने वाढणार

पुणे : केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत “पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण करणे” या प्रकल्पातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे आणि मलवाहिन्यांच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाचे (NRCD) सहसचिव झैगम अली खान यांनी पुणे महानगरपालिकेत बैठक घेतली.

बैठकीत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रकल्पातील प्रत्येक मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या कामाची सद्यस्थिती आणि पुढील नियोजनाची माहिती दिली.

चार केंद्रे कार्यान्वित; एकूण क्षमता ८१ एमएलडी

या प्रकल्पांतर्गत एकूण ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारण्यात येत आहेत. त्यापैकी सध्या चार केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून त्यांची एकत्रित क्षमता ८१ एमएलडी आहे.

याशिवाय एकूण २९० एमएलडी क्षमतेची आणखी पाच मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे डिसेंबर २०२६ अखेर सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

तानाजीवाडी केंद्र सप्टेंबर २०२७ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन

तानाजीवाडी येथे १५ एमएलडी क्षमतेच्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्राचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. हे काम सप्टेंबर २०२७ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच बोटॅनिकल गार्डन येथील १० एमएलडी क्षमतेच्या केंद्रासाठी आवश्यक जागेबाबत नुकतेच ना-हरकत पत्र प्राप्त झाले असून, हे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

स्लज प्रक्रियेसाठी प्रायोगिक प्रकल्पाचा प्रस्ताव

केंद्र शासनामार्फत नियुक्त तज्ज्ञ सल्लागारांनी प्रकल्पातील कामांचे सादरीकरण केले. मैलापाणी शुद्धीकरण प्रक्रियेनंतर निर्माण होणाऱ्या स्लजवर पुढील प्रक्रिया करण्यासाठी प्रायोगिक प्रकल्पाचेही सादरीकरण करण्यात आले.

या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास पुणे महानगरपालिका प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यास तयार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

STPसोबत मलवाहिन्यांची कामेही पूर्ण करा

राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाचे सहसचिव झैगम अली खान यांनी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांच्या कामांबरोबरच संबंधित मलवाहिन्यांच्या विकासाची कामेही पूर्ण करण्याच्या सूचना पुणे महानगरपालिकेला दिल्या.

संपूर्ण योजना पूर्ण झाल्यानंतर पुणे शहराच्या मैलापाणी प्रक्रिया क्षमतेमध्ये एकूण ३९६ एमएलडीची वाढ होणार आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीतील प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने या प्रकल्पाला विशेष महत्त्व आहे.

बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर, मलनिस्सारण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१५ ते १९ सप्टेंबर दरम्यान स्व. शांताबाई जोग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

३१ ऑगस्ट पर्यंत मागविण्यात आले आहेत अर्ज मुंबई,...

भोर-वरंधा, ताम्हिणी घाटाचे रस्ते सुरू करा ! बंद एसटी बससेवाही तातडीने सुरू करण्याची मागणी.

कोकण कृती समितीचे आमदार शंकर मांडेकर यांना निवेदन पुणे,...

युवाशक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य तिरंगा रॅलीला उपस्थिती पुणे, दि....