पुणे – रमजान ईद जवळ येत आहे तशी पुणे लष्कर बाजारपेठ गर्दीने फुलली आहे . पुणे लष्कर भागात छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात रमजान ईदसाठी प्रसिध्द असलेला शिरकुर्म्यासाठी शेवया , सुका मेवा खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे . त्यासाठी पूर्वतयारी करण्यासाठी शिरकुर्म्याचे सर्व साहित्य मुस्लिम बांधव खरेदी करतात . या शेवयांमध्ये बनारस , खिमाजी , गाठी , लच्चा , फेणी आदी शेवया ग्राहक खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेतअशी माहिती अन्वर बागवान यांनी दिली .
रमजान ईदसाठी खास अत्तरे देखील बाजारपेठेत दाखल झालेली आहेत . यामध्ये मोखलक मलादी , मालिका अल अरब , कशका , रकान, विसाल , नसीन आदी अरबी अत्तरे ग्राहक घेण्यासाठी पसंत करीत आहेत . त्यानंतर योगो बॉस , डिझायर , कुलवॉटर , पोलो ब्लॅक , वन मॅन शॉप आदी फ्रेंच अत्तरे देखील ग्राहकी पसंत करीत आहेत . अशी माहिती नफीज फ़रफ्युमसचे सुजा कुरेशी यांनी दिली .
मेहंदी आणि बांगड्या , पर्सेस , कपडे घेण्यासाठी महिलां गर्दी करीत आहेत . यामध्ये मेहंदी कोन , नखांची मेहंदी , केसांची मेहंदी , डिलक्स मेहंदी महिला या मेहंदी खरेदी करण्यासाठी पसंती देतात . तसेच सुरमा देखील मागणी असते .
महिला बांगड्या खरेदीसाठी वेलवेट , हैदराबादी सेट , जम्बो सेट , जरीच्या , मोती सेट बांगड्या खरेदी करण्यासाठी जास्त पसंती देत आहेत . यावर्षी ट्यूबलाईट बांगड्याना जास्ती पसंती आहे . अशी माहिती सलमान बॅंगल्सचे संचालक सलमान शेख यांनी दिली न. तसेच पुरुषांनी पठाणी कपडे घेण्यासाठी कपड्यांच्या दुकानात गर्दी करीत आहेत . तसेच अरबी रुमाल व टोपी घेण्यास गर्दी करीत आहेत .
सर्वात गजबजलेला परिसर म्हणजे ईस्ट स्ट्रीटवरील तरुणाईची पसंत असलेली बाजारपेठ म्हणजे ” फॅशन स्ट्रीट ” याठिकाणी कपडे, बूट , चप्पल , बांगड्या , नेकलेस , घड्याळ , टोपी , गॉगल्स , पर्सेस खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे .अशी माहिती फॅशन स्ट्रीटमधील व्यापारी युसूफ शेख यांनी दिली . रमजान ईदपर्यंत पुणे लष्कर भागातील एम. जी. रोड , सेंटर स्ट्रीट , साचापीर स्ट्रीट , ताबूत स्ट्रीट , ईस्ट स्ट्रीट , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड , जान मोहम्मद स्ट्रीट आदी परिसर गर्दीने फुलून गेला आहे .