प्रत्येकानं आपला धर्म आपल्या घरात पाळावा : राज ठाकरे

Date:

पुणे-प्रत्येकानं आपला धर्म आपल्या घरात पाळावा असं सांगत मुस्लीमांनी नमाज घरात पढावा रस्त्यात नाही असं मत मांडताना जातीय निकषांवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेले पाहिजे. सरकार तुमच्या भावनांशी खेळ करते आहे त्यांच्या आश्वासनांना आणि राजकारणाला बळी पडू नका असे आवाहन  मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी  पुण्यामध्ये मनसेच्या मेळाव्यात बोलताना केले .त्यांनी आपल्या भाषणातून मराठा आरक्षणाला …आणि सर्वच जातीय आरक्षणाला आपला विरोध असल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे .

मराठा समाजाने ज्या प्रकारे मोर्चे काढले त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मात्र राजकारण्यांच्या राजकारणाला बळी पडू नका. हकनाक स्वतःचा जीव गमावू नका असे आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केले.काकासाहेब शिंदे या मुलाने नदीत उडी मारली. अशा प्रकारच्या घटना टाळा, जीव गमावून काहीही होणार नाही. जातीच्या आधारावर आरक्षण दिले तर जातीय तेढ निर्माण होईल. एका जातीला आरक्षण दिले तर दुसऱ्या जातीला द्यावे लागेल. मराठी मुला-मुलींनी या मागचे राजकारण काय सुरू आहे ते समजून घ्या असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

नमाज पढायला रस्ते कशाला हवेत तसंच नमाजासाठीची अजान देण्यासाठी भोंगे कशाला हवेत असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला. हे भोंगे तुम्ही कुणाला ऐकवता असा सवाल विचारत ते बंद व्हायला हवेत असं ते म्हणाले. मी मला भेटणाऱ्या मुस्लीमांना सांगतो की सकाळपासून भोंगे कशाला हवेत नमाजासाठी त्यामुळे ते सगळे बंद करा, असं राज म्हणाले.

गुजराती व जैन समाजाचाही उल्लेख राज यांनी केला. मला भेटायला यातली बरीच मंडळी आली होती, परंतु त्यांना मी स्पष्टपणे माझी भूमिका सांगितल्याचे राज म्हणाले. श्रावणामध्ये तसेच पर्युषणामध्ये हे लोक फतवे बंद काढतात की कत्तलखाने बंद करा. कुणी काय खावं काय खाऊ नये हे ज्याचं त्यांनी ठरवावं . आपापला धर्म घरात ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करताना राज ठाकरे यांनी धर्माचं राजकारण बंद व्हायला हवं असं सांगितलं.

लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा मुद्दा भाजपाने पुन्हा समोर आणला आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी सांगितले की निवडणुका होण्यापूर्वी राम मंदिर बांधण्यासाठी पावले उचलू. चार वर्षात तुम्हाला आज राम मंदिर आठवले का? असा प्रश्न विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.  राम मंदिर बांधले गेले पाहिजे का? निश्चितपणे बांधले गेले पाहिजे पण निवडणुका झाल्यावर असे माझे स्पष्ट मत असल्याचेही राज ठाकरेंनी बोलून दाखवले सत्तेवर आल्या आल्याच खरे तर या सरकारने मंदिर बांधायला हवे होते. जय श्रीरामच्या विटांचे काय झाले? सगळ्यांकडून पैसै घेतले विटा घेऊन गेले, गंगाजळ वाटण्यात आले होते. त्या सगळ्याचे काय झाले? असेही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले. देशात प्रगती काय झाली, विकास काय झाला ते सोयीस्करपणे लपवायचे आणि हा राम मंदिराचा विषय समोर आणायचा. म्हणजे काय झाले ते विचारायला कोणी येणारच नाही. जातीय दंगलीत जनतेला गुंतवायचे हा यामागचा डाव आहे. तुमचे घर उभे राहावे, संसार उभा राहावा म्हणून कोणीही करताना दिसत नाही असाही आरोप राज ठाकरे यांनी केला. तुमच्या भावनांशी खेळायचे, त्याचे राजकारण करायचे आणि तुमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे हे सरकारचे धोरण आहे अशीही टीका राज ठाकरेंनी केली.

राजकारणी तुम्हाला वापरून घेतायत, शहरांचा विकास करायच्या ऐवजी, घरांचे प्रश्न सोडवण्याऐवजी धार्मिक प्रश्नांमध्ये गुंतवून ठेवलं जातं पण त्याला बळी पडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. यावेळी राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार टीका केली असून तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात गुजरात या एका राज्याचे नाही असं त्यांनी सांगितलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आता कंबोडियामध्येही भारतीय पर्यटकांना यूपीआय (UPI) पेमेंटची सोय

मुंबई: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची आंतरराष्ट्रीय शाखा असलेल्या NPCI इंटरनॅशनल...

पुण्यातील एयूएम तीन वर्षांत दुप्पट; महाराष्ट्राच्या म्युच्युअल फंड वाढीच्या प्रवासात पुणे ठरले महत्त्वाचे केंद्र:ए. बालसुब्रमण्यन

पुणे- आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि सीईओ ए. बालसुब्रमण्यन पुणे दौऱ्यादरम्यान म्‍हणाले की, पुणे देशातील सर्वात वेगाने वाढणारी म्युच्युअल फंड बाजारपेठ म्हणून समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत या शहरातील एकूण एयूएम (व्यवस्थापनाखालील मालमत्ता) दुप्पट झाले आहे. बालसुब्रमण्यन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक क्षेत्रात पुण्याची वाढती भूमिका आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीमध्ये गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग निदर्शनास आणले. पुण्यात नेहमी एक मजबूत इक्विटी संस्कृती राहिली आहे, जिथे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणूक, संपत्ती निर्मिती आणि चक्रवाढ व्याजाची ताकद या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत आहेत. "ऐतिहासिकदृष्ट्या पुणे नेहमी उच्च वाढ देणारी बाजारपेठ राहिली आहे. याउलट, मी म्हणेन की, पुण्यातील इक्विटी संस्कृती इतर बाजारपेठांपेक्षा खूप जास्त आहे, कारण येथील व्‍यक्तींना दीर्घकालीन बचतीचे महत्त्व आणि चक्रवाढ व्याजाची ताकद चांगली समजते. पुणे सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ राहिली आहे आणि माझ्या मते, भविष्यातही अशीच वेगाने वाढणारी बाजारपेठ राहील," असे बालसुब्रमण्यन म्हणाले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडसाठी महाराष्ट्र नेहमी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे. उर्वरित महाराष्ट्र आणि गोवा (आरओएमजी) मधील म्युच्युअल फंडाची मालमत्ता आज जवळपास ५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनी सध्या देशभरात अंदाजे ४.७४ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील जवळपास १.२ कोटी ग्राहकांच्या पोर्टफोलिओला सेवा प्रदान करत आहे. बालसुब्रमण्यन यांच्या मते, हा विकासाचा प्रवास आता राज्यातील केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता त्यापलीकडे वेगाने विस्तारत आहे. वाढती आर्थिक घोडदौड, पायाभूत सुविधांचा विकास, एसएमईचा वाढता विस्तार आणि कौटुंबिक उत्पन्नातील वाढ यामुळे इतर उदयोन्मुख केंद्रांमध्येही गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गुंतवणूकदारांच्या वर्तनाबाबत मत व्‍यक्त करत या म्युच्युअल फंड क्षेत्रातील अनुभवी तज्ञ म्‍हणाले की, म्युच्युअल फंड व एसआयपीबद्दल वाढणारी जागरूकता पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. भारत आता जवळपास ४ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडून १० ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना ते म्‍हणाले की, योग्य आर्थिक नियोजन आणि बाजारपेठेशी जोडलेल्या गुंतवणुकीतील सातत्यपूर्ण सहभाग हाच दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी मुख्य आधार ठरेल.

पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

पुणे, दि. १२: पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा...