गंगेकाठच्या विद्यापीठात स्त्रियांना मारहाणीने देशाच्या आत्म्याचे आक्रन्दन :डॉ . गणेश देवी

Date:

पुणे :
‘ गांधीजींनी आपल्या कार्यात मानवातील  पुरुषत्वाइतके  स्त्रीत्वाला महत्व दिले होते ,आता मात्र ५६ इंची पिंजरा असलेल्या आणि हृदय नसलेल्यांच्या राज्यात  भारतात पवित्र मानल्या गेलेल्या गंगेकाठच्या विद्यापीठामध्ये स्त्रियांना मारहाण होते ,ते पाहून देशाचा आत्मा आक्रन्दन करून गांधीजींना परत बोलवतो आहे ‘ असे उद्गार आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ डॉ  गणेश देवी यांनी काढले .

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे  सलग ८ व्या  वर्षी आयोजित  ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ सप्ताहाचे उद्घाटन   आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ,  दक्षिणायन सांस्कृतिक चळवळीचे प्रवर्तक प्रा. डॉ . गणेश देवी तसेच सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत झाले. यावेळी डॉ गणेश देवी बोलत होते

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला अभिवादन करून आणि सर्वधर्मीय प्रार्थना करून  सप्ताहास प्रारंभ झाला.
सप्ताहाचे यंदाचे ८ वे वर्ष आहे. दिनांक १ ते ८ ऑक्टोबर २०१७ या कालावधीमध्ये होणाऱ्या  या सप्ताहात विविध कार्यक्रम होणार आहेत.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी) होते.
सप्ताह ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर अभय छाजेड, एम.एस. जाधव, अन्वर राजन, तसेच पं. वसंत गाडगीळ, मौलाना झाएदभाई , पदम ऋषी महाराज, नोएल माजगावकर, चित्रलेखा जेम्स, अमरजितसिंह हे सर्व धर्मीय धर्मगुरु उपस्थित  होते .

डॉ गणेश देवी म्हणाले ,’ गांधीजींनी मानवातील स्त्रीत्वालाही  पुरुषत्वाइतके महत्व दिले . स्त्रीत्वाचे हे महत्व त्यांनी कस्तुरबांच्या सत्याग्रहात पहिल्यांदाच  स्त्री सामील होण्यातून ओळखले . मौन ,असहकार ,मिठाचा सत्याग्रह या स्त्रीत्वाच्या गोष्टी आहेत . कस्तुरबानी गांधींना भयमुक्त केले आणि राजकारणात स्त्रीला केंद्रस्थानी आणण्याचा मंत्र शिकवला .
या पार्श्वभूमीवर सध्याचे नेतृत्व कठोर होऊन जनतेला स्त्री मानून कधी नोटबंदी ,कधी जीएसटी अमलात आणून  छळत आहे .मात्र ते  ज्यांना आदर्श मानून हे प्रयोग करीत आहेत ,त्याला जगाने आधीच पराभूत केले आहे .तरीही  जगभर उजव्या विचारांचा प्रभाव वाढत असताना गांधीविचार प्रभावीपणे सर्वत्र पोहचवला पाहिजे . त्यासाठी तिसऱ्या सत्याग्रहाची गरज आहे .  गांधीजींनी आपल्या कार्यात मानवातील  पुरुषत्वाइतके  स्त्रीत्वाला महत्व दिले होते ,आता मात्र ५६ इंची पिंजरा असलेल्या आणि हृदय नसलेल्यांच्या राज्यात  भारतात पवित्र मानल्या गेलेल्या गंगेकाठच्या विद्यापीठामध्ये स्त्रियांना मारहाण होते ,ते पाहून देशाचा आत्मा आक्रन्दन करून गांधीजींना परत बोलवतो आहे.
गांधी सप्ताहात स्त्रीत्वाला केंद्रस्थानी ठेवून चर्चा आणि उपक्रम केले पाहिजेत ,असेही डॉ  देवी म्हणाले .
यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी च्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ  सप्तर्षी म्हणाले ,’ देशातील वातावरण बदलत असल्याने घाबरलेले लोक ध्रुवीकरणासाठी दंगलींचा वापर करण्याची भीती आहे . मात्र ,आम्ही हिंदू -मुस्लिम दंगल होऊ देण्याच्या विरोधात काम करीत आहोत . यापूर्वी सत्याग्रहातून नेतृत्व  येत  होते ,आता ‘हत्याग्रहातून ‘ नेत्रत्व येता कामा  नये .
 सप्ताहाबद्दल माहिती देताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले , ‘महात्मा गांधींजींची विचारसरणी, त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव नेमका कसा होता हे नव्या पिढीला सांगणे आजही अत्यावश्यक आहे. त्या विचारांचे स्मरण करण्याच्या निमित्ताने महात्मा गांधी सप्ताहात गांधी भवनात विविधांगी कार्यक्रम होत आहेत. गांधी सप्ताहादरम्यान गांधी जयंती (दिनांक 2 ऑक्टोबर) हा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’तर्फे ‘शांती मार्च’चे आयोजन करण्यात येते. हा ‘शांती मार्च’ सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. ‘शांती मार्च’ चा मार्ग सेनापती बापट पुतळा, अलका चौक, कुमठेकर रोड, बाजीराव रोड,  सीटी पोस्ट मार्गे शनिवार वाडा असा असून, शनिवार वाडा येथे समारोप सभा होईल.’
सप्ताह कालावधीत खादी, हातमाग व इतर गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा बाबत संस्थेचे सचिव अन्वर राजन आणि संयोजक संंदीप बर्वे यांनी माहिती दिली.
पुढील कार्यक्रम :
………..
सोमवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८. ३० वाजता शुभांगी मुळे व सहकारी यांचे प्रार्थना व भजन, सकाळी ९ वाजता (सेनापती बापट पुतळा, अलका टॉकीज ते शनिवारवाडा) मार्गे शांती मार्च चे आयोजन, सायंकाळी ४ वाजता ‘महात्मा’ (जीवनपट ),
मंगळवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी शिक्षणतज्ञ अनिल सद्गोपाल यांच्याशी खुला संवाद, दुपारी २ ते ५  ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ चित्रपट , सायंकाळी ५ वाजता ‘शिक्षणक्षेत्रातील समस्या व उपाय’ या विषयावर व्याख्यान,
दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘शेती आणि मेक इन इंडिया’ विषयावर कार्यशाळा : वक्ते विजय जावंधिया (शेतकरी आंदोलनातील कार्यकर्ते , वक्ते आणि लेखक) आणि मिलिंद मुरुगकर (अर्थतज्ञ आणि विश्लेशक ), सायंकाळी ६ वाजता अमरेंद्र धनेश्वर यांचे भक्ती आणि सुफी संगीत,
गुरुवार ५ ऑक्टोबर रोजी  ‘आंतरराष्ट्रीय राजकारण व दशहतवादाचे स्वरूप’ विषयावर कार्यशाळा -वक्ते लक्ष्मीकांत देशमुख (लेखक आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी), सायंकाळी ६ वाजता काव्यांजली कार्यक्रमात कोजागिरीनिमित्त ‘त्रिभाषिक मुशायरा’ -कवी प्रदीप निफाडकर, साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी नझीर फतेहपुरी,सहकारी यांचा सहभाग,
शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राज कुलकर्णी (पंडीत नेहरूंचे अभ्यासक) यांच्याबरोबर चर्चा, सायंकाळी ६ वाजता ‘आधुनिक भारताचे निर्माते’ विषयावर व्याख्यान,
शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिग्नेश मेवाणी (दलितांतवर होणार्‍या हल्ल्यांविरुद्ध लढणारे तरुण नेते, गुजरात), विश्‍लेषक तुषार गांधी (गांधीजींचे पणतू) आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. मिलिंद आव्हाड (जेएनयू, दिल्ली) यांच्याशी चर्चा,  सायंकाळी ६ वाजता   ‘जाती का सवाल और वर्तमान दलित राजनीती’ विषयावर समारोपानिमित्त परिसंवाद,
रविवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते २ ‘लघुपट निर्मिती’ कार्यशाळा :  मार्गदर्शक अशोक राणे (समीक्षक लेखक आणि दिग्दर्शक), दुपारी ३. ३० वा. ‘रोड टू संगम’  चित्रपट, दुपारी ४ वा जादूगार संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग. असे अनेक कार्यक्रम या सप्ताहात होतील.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

समस्त ब्राह्मण संघातर्फे सामूहिक उपनयन सोहळा

पुणे : समस्त ब्राह्मण संघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने...

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ

पुणे-अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या...

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही” महिलांविरोधातील...