विश्रांतवाडी जंक्शनवरील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर डिसेंबरअखेर पूर्ण करा – आयुक्त नवल किशोर राम

Date:

मुकुंदराव आंबेडकर चौकातील कामाची पाहणी; मंदिरांचा अडथळा, वाहिन्यांचे स्थलांतर आणि अतिक्रमणाबाबत महिनाभरात निर्णयाचे निर्देश

पुणे : मुकुंदराव आंबेडकर चौक अर्थात विश्रांतवाडी जंक्शन येथे सुरू असलेल्या उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पाची पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी डिसेंबर २०२६ अखेर उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला दिले.

आळंदी रस्ता ते विमानतळ रस्ता या दिशेतील ग्रेड सेपरेटरच्या कामात श्री रामेश्वरशेठ गणपती मंदिराचा काही भाग तसेच श्री महालक्ष्मी देवी मंदिरामुळे अडथळा निर्माण होत असल्याची माहिती आयुक्तांना देण्यात आली. या अडथळ्यांमुळे कामाच्या गतीवर परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावर आयुक्तांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), बांधकाम विकास विभाग, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण विभाग आणि संबंधित जागामालक यांची संयुक्त बैठक व संयुक्त पाहणी करून महिनाभरात प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले.

प्रकल्पाच्या कामामुळे पाणीपुरवठा वाहिनी आणि विद्युत केबल स्थलांतरित कराव्या लागणार असून, त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आळंदी रस्त्यावरील टँक रोड परिसरातील विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचेही पाहणीदरम्यान निदर्शनास आले. ही अतिक्रमणे तातडीने हटवून परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी निश्चित पॉइंट तयार करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले.

वाहतूक वळवल्यानंतर चौक व आळंदी रस्ता बाजूच्या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विश्रांतवाडी चौकातील वाहतूक कोंडी कमी होऊन विमानतळ, आळंदी रस्ता, धानोरी, लोहेगाव आणि नगर रोड परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पाहणीवेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, नगरसेवक सुहास टिंगरे, मुख्य अभियंता दिनकर गोजारे, मुख्य अभियंता राजेश बनकर, उपायुक्त आशा राऊत, उपायुक्त सोमनाथ बनकर, उपजिल्हाधिकारी तथा SRA सक्षम प्राधिकारी अर्चना यादव यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धर्मांतर प्रकरणात ब्रिटिश नागरिक पंकज देवनूर यांना हंगामी अटकपूर्व जामीन

पुणे : धर्मांतराच्या आरोपासंदर्भातील प्रकरणात ब्रिटिश नागरिक पंकज जेम्स...

‘ई-प्रमाण’मुळे नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती आता घरबसल्या

मुद्रांक व नोंदणी विभागातील तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा महसूल मंत्री...

सरकारी नोकरीचे आमिष; २७ तरुण-तरुणींची ४.८८ कोटींची फसवणूक

बनावट नियुक्तीपत्रे, दिल्लीतील कथित मेडिकल आणि सरकारी नोकरीची हमी;...