‘बापूं’च्या ‘लोककल्याणकारी राज्याची संकल्पना साकारणे’ हीच् सुमनांजली ..! – काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी

Date:



पुणे दि २ आक्टों –
केवळ औपचारिकतेतून व जाहीरातांच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या सारख्या मूल्यवादी व द्रष्ट्या नेत्यांची जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांच्या संकल्पनेतील लोककल्याणकारी व्यवस्था राबवणे आणि त्यांचे विचार व नैतिक मूल्यांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काढले.
“पुणे शहर जिल्हा काँग्रेस तर्फे महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात” ते बोलत होते.


राज्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माध्यमांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करून त्यांना आदरांजली अर्पण केली ही समाधानाचीच बाब आहे. मात्र, एवढेच पुरेसे नाही. सत्य, अहिंसा, स्वदेशी, सत्याग्रह, ग्रामस्वराज्य, नैतिकता या मूल्यांच्या आधारावर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात राजेशाही पद्धती न राहता लोकशाहीच्या आधारावर लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावे, अशी त्यांची भावना होती, हे देखील गोपाळदादा यांनी निदर्शनास आणले.
सध्याच्या काळात लोकशाही मूल्य आणि लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची पायमल्ली होताना दिसून येत आहे. हे प्रकार रोखून महात्मा गांधी यांच्या विचारानुसार आचरण करून त्यांच्या स्वप्नातील भारताची उभारणी करणे, राजकारण्यांसह भारताचे नागरिक म्हणून आपले सर्वांचेच कर्तव्य आहे, असे मत तिवारी यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान पदाची जबाबदारी घेण्यापूर्वी रेल्वेमंत्री असताना एका रेल्वे अपघातातची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता ही बाब सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे अशी अपेक्षाही तिवारी यांनी व्यक्त केली.

यावेळी काँग्रेस विचार विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण डावर, प्रदेश खजिनदार ॲड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, उपाध्यक्ष कैलास गायकवाड, बाळासाहेब मारणे, नीता रजपूत, वैशाली धिमधिमे, डॉ. स्नेहल पाडळे, सीमा सावंत, अनुसया गायकवाड, ऋग्वेदिता सपकाळ, कोमल धिमधिमे, आबा जगताप, लतेंद्र भिंगारे, कृष्णा सोनकांबळे, अण्णा गोसावी, ॲड. बाळासाहेब बाणखेले, दिलीप लोळगे, मनिषा फाटे, राजेंद्र पेशने, हरिदास अडसूळ, विजय तिकोणे, शाबिर तांबोळी, खलील सय्यद, बाबासाहेब पाटील, शंकर वडणे, सुदर्शन खरात, योगेश भोकरे, मदन कोठुळे, आशुतोष पवार, मारूती माने, सागर धावडे, संतोष जोशी, अमित कांबळे, दिपक ओव्‍हाळ, नरसिंह आंदोली आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शास्त्रींजीं चे नेतृत्व ऊत्तरदायीत्वाची भावना जोपासणारे ….प्रशांत जगताप

पुणे दि २ आक्टों -'जय जवान-जय किसान'चा नारा देत...

पीएमआरडीए मुख्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आदरांजली

पिंपरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान...

फ्रिंज एरिया’तील रहिवासी विकासाचा मार्ग मोकळा; ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय!

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांसह ७ नगरपरिषदा व २ नगरपंचायतींलगतच्या...