पुणे :’सनी मानकर मित्र परिवार ‘आणि ‘अंघोळीची गोळी ‘ संस्था यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोथरूड येथील ४० झाडांना खिळेमुक्त केले.जवळपास ३२५ खिळे रविवारी झालेल्या अभियानात काढण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सनी मानकर,राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे कोथरूड प्रमुख शुभम माताळे, सौ.साळुंके, सौ.बावकर, सरिता कबाडी,विकास उगले,प्रमोद शेवाळे,आशिष कांबळे ,अमोल बोरसे,तेजश्री निखार ,गौरव कोचरे आणि इतर सहभागी होते.
पुढील रविवारपासून सनी मानकर मित्र परिवार आणि अंघोळीची गोळी यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूडमधील झाडांना आळी करण्याचे काम घेण्यात येणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सनी मानकर असे म्हणले कि ‘जगदीश बोस यांनी संशोधन करून असे सिद्ध केले आहे कि झाडांनासुद्धा संवेदना असतात म्हणून झाडांना खिळे मारणे चुकीचे आहे
.झाडांना वेदनामुक्त करून अजितदादांचा वाढदिवस विधायक कामातून साजरा केल्याचे समाधान ‘अंघोळीची गोळी ‘ संस्थेच्या “खिळेमुक्त झाडे” अभियानातून मिळाले.
अंघोळीची गोळी ‘ संस्थेचे माधव पाटील म्हणाले कि राष्ट्रीय हरित लवादाच्या २८ जुलै २०१५ च्या आदेशाप्रमाणे ह्या झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असते.
डांबर,काँक्रीट,पेव्हर ब्लॉकमुळे झाडांच्या मुळांना पाणी पोहचत नाही आणि ते ठिसूळ होतात व त्यामुळे पावसाळ्यात त्यांची पडण्याची शक्यता अधिक असते.
एक झाड टिकल्यामुळे तेथील जैव-विविधता टिकून राहते. तेथे अनेक पक्षी, प्राणी येतात आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो. एक जुने झाड जगवणे म्हणजे १००० नवीन झाडे लावणे, असेही ते म्हणाले.