वारजे परिसरातील घरफोडीचा अवघ्या एका तासात छडा; सराईत चोरट्याला अटक, चोरीतील मुद्देमाल जप्त

Date:

पुणे, दि. २३ जुलै : वारजे माळवाडी पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या एका तासात छडा लावत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील ४० हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून उर्वरित मुद्देमाल आणि साथीदाराचा शोध सुरू आहे.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्त दिगंबर कॉलनी, वारजे जकात नाका, वारजे येथे २३ जुलै रोजी फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दोन लॅपटॉप, एक मोबाईल फोन, एक टॅब आणि एक हेडफोन असा एकूण १ लाख १५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे व त्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात निळे वादळ चौक, रामनगर, वारजे येथून मंजुनाथ बाल्या डी. बी. (वय २३, रा. कर्नाटक) याला ताब्यात घेण्यात आले.

कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीतील एक लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. उर्वरित चोरीचा मुद्देमाल त्याच्या साथीदाराकडे असल्याची माहिती आरोपीने दिली असून त्या साथीदाराचा आणि उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश वनसोडे, पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुवर्णा हुलवान, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, तसेच पोलीस अंमलदार बालाजी काटे, योगेश वाघ, शरद पोळ, अमित शेलार, श्रीहरी कांबळे, सागर कुंभार, अमित जाधव, निखील तांगडे, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे आणि अमोल सुतकर यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी पीजी आणि वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना खोल्या उघड्या न ठेवण्याचे, बाहेर जाताना लॅच लॉक किंवा अन्य सुरक्षित कुलूप व्यवस्था वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच पीजी व होस्टेल चालकांनीही सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खडकवासला धरण ९५ टक्के भरले; आज रात्री ८ वाजता मुठा नदीत ३,८२५ क्युसेकने विसर्ग सुरू

धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; नागरिकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचे पाटबंधारे...

महिलांची सुरक्षा, सन्मान, आणि स्वातंत्र्य ही सामुहिक जबाबदारी- विजया रहाटकर

पुणे, दि. २३: महिलांच्या बाबतीत गंभीर गुन्हे, अपराधांची सुरुवात...