मी भल्याभल्यांशी पंगा घेतला ,’ते’ मला जिवंत सोडणार नाहीत,बरबाद करतील;पण इमानदारीच्या कामासाठी तुम्ही मला साथ द्या – पंतप्रधान(गोव्यात मोदींचे तडाखेबाज आणि भावनिक भाषण .. पाहावे ऐकावे असेच भाषण -व्हिडीओ)

Date:

पणजी – मला माहिती आहे,मी कोणा कोणाबलाढ्यांशी पंगा घेतला आहे , ‘ते’मला जिवंत सोडणार नाहीत ,मला बरबाद करतील …७० वर्षांचे त्यांचे मी नुकसान करीत आहे ,  पण इमानदारीच्या कामासाठी आपण मला फक्त ५० दिवस साथ द्या, ५० दिवस फक्त मला मदत करा ,   … ७० वर्षांचा हिशेब मला १७ महिन्यात घ्यायचा आहे . असे कधी भावनिक तर कधी तडाखेबाज प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले
गोव्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मोपा विमानतळाचे मोदी यांच्याहस्ते भूमीपूजन संपन्न झाले .यावेळी ते बोलत होते .राहुल गांधींचे नाव न घेता ते म्हणाले , बडे बडे घोटाळे तुम्ही ऐकलेत ज्यांच्या काळात , ४ हजारासाठी रांगेत उभे राहावे लागले कि नाही त्यांना , ५०० हजाराच्या नोटा बंदीने आम जनतेला त्रास होत आहे याची मला कल्पना आहे . पण आणखी ५० दिवस फक्त मला साथ द्या . देशातील इमानदारांना कोणताही त्रास होऊ देणार नाही. काही लोकांना वाटते , खूप येतात, खूप जातात तसा हा हि जाईल , पण मला खुर्चीचा मोह नाही, इमानदारी चे राज्य निर्माण करूनच दाखवेन . काहींना वाटते पाहू यात पुढे … पण त्यांनी मला निट ओळखावे मी स्वातंत्र्य मिळाल्यापासून चा हिशेब मी बाहेर काढणार आहे ,भ्रष्टाचार , बेईमानी याविरोधात अजून खूप योजना आहेत , ज्या पुढे येणार आहेत ,यापुढे मेहनत करणाऱ्या आणि प्रामाणिक माणसांचेच राज्य असेल . शून्य रुपयांची खाती उघडा असे मी सांगितले तेव्हा , २० करोड लोकांनी खाती उघडली आणि तब्बल ४५ हजार करोड रुपये जमा केले . सामान्य लोकांची हि ताकद निश्चितच वाखाणण्याजोगी आहे . पण आता ज्यांनी खाती उघडलीत त्यांना नक्कीच फायदा होईल . २ वर्षाच्या माझ्या कामाचा हिशेब मी गोव्याच्या भूमीवरून सदर करतो असे हि ते यावेळी म्हणाले
खरे तर त्यांचे भाषण वाचण्या ऐवजी ऐकण्यासारखे आणि पाहण्यासारखेच आहे .. ते आपण नक्की पहा …

 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि....

भारतात एका वर्षात 24 अब्जाधीश वाढले: लक्ष्मी मित्तल दररोज ₹274 कोटी कमावून देशातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

नवी दिल्ली-फोर्ब्स वर्ल्ड्स बिलियनेअर्स 2026 च्या यादीनुसार, भारतात एका...

धर्मांतरविरोधी कायदा सर्वात वाईट:असदुद्दीन ओवेसी यांची टीका

मुंबई-महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वरून राजकीय वातावरण...

ट्रम्प यांची रविवारी नाटो (NATO) देशांना धमकी

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील इंधन टॅंकवर हल्ला:अनेक उड्डाणे डायव्हर्ट, ट्रम्प...