बेळगाव -गोवा आणि त्यानंतर कर्नाटक -बेळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेच्या शेवटी आपल्या पाचशे हजाराच्या नोटा बंदीमुळे सुरु झालेल्या काळ्या धनाच्या विरोधातील मोहिमेला .. जनतेने प्रसंगी त्रास सहन करून मला आशीर्वाद द्यावा , आणि तो उभे राहून टाळ्या वाजवून द्या.. असे दोन्ही ठिकाणी सांगितले . पणजीत त्यांना जोरदार प्रतिसाद मिळालाच , त्यानंतर बेळगावात त्यांचे लक्ष जन्सामुदायाबरोबर पत्रकारांकडे हि होते . यावेळी संपलेले भाषण त्यांनी पत्रकारांकडे पाहून पुन्हा काही वाक्ये बोलत संपविले.
ते म्हणाले , बहुधा कुठे ही अशा आवाहनानुसार त्यात सहभागी होण्यासाठी पत्रकार उभे राहत नाहीत किंवा तल्या वाजवीत नाहीत , पण इथे पत्रकार उभे राहिले .. तल्या वाजविल्या .. त्यांनी खूप मोठ्ठे काम केले , या पत्रकारांना माझा शतशः प्रणाम शतशः प्रणाम …असे म्हणत त्यांनी त्यांना सल्यूट देखील केला .