शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा : अतुल सावे

Date:

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त२ दिवसीय प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

पुणे–शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता राखून योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे २४ व २५ ऑक्टोबरदरम्यान हे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजे उमाजी नाईक आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला भटके-विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्राचे अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, राज्यस्तरीय अशासकीय सदस्य मा. राजेंद्र दोनाडकर, डॉ. संजय पुरी, नरेश पोटे आणि शरद माकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना अतुल सावे म्हणाले की, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. प्रशासकीय नियम व कार्यपद्धतींचे पालन करताना क्षेत्रीय स्तरावरील कामकाज अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यावर भर दिला पाहिजे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक सुसूत्रपणे करण्यास मदत होईल. या शिबिरामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अशासकीय सदस्य, विभागाचे क्षेत्रीय अधिकारी आणि महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले आहेत. विभागाच्या विविध योजना, शासकीय नियम व कार्यपद्धती, प्रशासकीय जबाबदाऱ्या, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि क्षेत्रीय स्तरावरील समन्वय या विषयांवर प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्या समताधिष्ठित विचारांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाशी सुसंगतपणे बहुजन समाजाच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना अधिक गती देणे, हा या प्रशिक्षण शिबिराचा प्रमुख उद्देश आहे. या शिबिराचे आयोजन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालनालय, पुणे आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असल्याची माहिती ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भोरमधील ‘आमराई रिसॉर्ट’वर देहव्यापाराचा पर्दाफाश; १३ महिलांची सुटका, एकाला अटक!

वेळू येथे राजगड पोलिसांचा बनावट ग्राहक पाठवून छापा; वैभव...

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त अन्नकोट

भव्य भजन संध्या आणि महाआरतीचे आयोजनपुणे : श्री महालक्ष्मी...