बेळगाव – पाचशे आणि हजाराच्या नोटा बंदीच्या आपल्या निर्णयाला साथ द्या असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगावच्या सभेत बोलताना कचरा वेचताना ५७ हजार रुपयांच्या नोटा सापडल्यानंतर त्या पोलिसात द्यायला गेलेल्या कचरावेचक महिलेचा कौतुकाने उल्लेख केला . बेईमानांना सजा देण्यासाठी माझी मदत करा अशी विनंती करीत कोन्ग्रेस्वर जोरदार हल्ला केला ,त्यांनी चार आणे( चवन्नी) बंद केले होती . त्यांची तेवढीच ताकद होती . मी कधीच कोणती गोष्ट लपवून ठेवली नाही , पाच वर्षापूर्वीच सभेत सांगितले होते हजाराच्या नोटा बंद करेल म्हणून .. आज हि त्याबाबतचे व्हिडीओ फिरत आहेत . जे लोक गंगेत चवन्नी टाकत नव्हते , ते आता हजार पाचशेच्या नोटा फेकत आहेत . फेकतील तर वाचतील ते .. पण जर अन्य मार्गाने काळे पैसे पांढरे करण्याचा प्रयत्न करतील तर मात्र खैर नाही . एसी मध्ये बसून बेइमाणांची वकिली करणाऱ्यांनी पाहावे कि सारी इमानदार जनता माझ्या सोबत आहे .
बेळगावातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची हि झलक नक्की पहा आणि ऐका …